UPSC Success Story: Ghanshyam Meena & Anita Yadav
लग्नानंतर अभ्यास होईल का? नवरा घर सासु-सासरे सह सर्व परिवार यातून अभ्यासाला वेळ मिळेल का? नेहमी बोले जाते लग्नानंतर अभ्यास विसरावा लागतो का? या सर्व प्रश्नांची सांगड घालून ठेवलीय या अधिकारी जोडप्याने. सध्या फिरोजाबाद मध्ये नगर आयुक्त पदावर कार्यरत असलेल्या घनश्याम मीना व त्यांच्या पत्नी उत्तर प्रदेश मधिल आयोध्या शहरात मुख्य विकास अधिकारी या पदावर कार्यरत आहेत.
Ghanshyam Meena and Anita Yadav
म्हणतात ना ‘त्याच नात्यांची जास्त चर्चा होते, ज्या नात्यांमध्ये प्रेम, आपुलकी व विश्वासाची सद्भावना निखळ असते’. आणि अशा प्रेमळ जोडप्याची कथा ही तेवढीच आवडू लागते. हि एक अशा जोडप्याची कथा आहे ज्यांनी भारतीय प्रशासकिय सेवेत (आईएएस) अधिकारी बनले आहेत.
दोघांनी मिळून सिव्हिल सेवा परिक्षेची तयारी सूरू केली आणि शेवटी नवरा-बायको या नात्याने नविन आयूष्य दिलं. नवऱ्याने अगोदर स्वत:ला आईएएस अधिकारी म्हणून स्थानापन्न झाला आणि नंतर बायकोला पुढे जाउन अधिकारी बणवन्यास प्रेरित केले. आता हे दाम्पत्य उत्तर प्रदेश मधिल कैडर मध्ये अधिकारी पदावर आहेत. घनश्याम मीना हे 2015 च्या आईएएस बैच मधले आहेत. त्याची पत्नी अनिता यादव या 2017 च्या आईएएस बैच मधल्या आहेत. यांच्या यशामागे प्रेरणादायी कहानी आहे.
सात भाउ-बहिन असणाऱ्या परिवारातून घनश्याम मीना यांचे नेहमी अभ्यासावर लक्ष केंद्रित असायचे. त्याचे वडील एक अतिरिक्त आयुक्त होते, त्यांचा अभ्यासावर भर असायचा. आरोग्य, इंजिनियरिंग आणि लेखन अशा विविध क्षेत्रात उत्कृष्ठ कामगिरी असणाऱ्या सात भाउ-बहिनींचा हा परिवार घनश्याम मीना यांच्यासाठी एक आदर्श होता.
घनश्याम मीना शैक्षणिक जिवन –
घनश्याम मीना यांची इंजिनिअरिंग 2009 मध्ये पूर्ण झाली. आर्थिक मंदिच्या करणात्सव त्यांना नोकरी मिळाली नाही. त्यांनी संघ लोकसेवा आयोग (यूपीएससी) च्या परिक्षा द्यायचे ठरवले. यूपीएससी ची परिक्षा तयारी करण्यासाठी ते दिल्लीला आले. प्रथम त्यांनी राजस्थान पीसीएसचा फार्म भरला आणि पहिल्या प्रयत्नात ते पास झाले. राजस्थान मधिल जोधपूर शहरात त्यानी अधिकारी पद धारण केले. तिथे त्यांची भेट अनिता यादव सोबत झाली त्या यूपीएससी ची तयारी करत होत्या.
प्रामाणिक प्रयत्नांनंतर यश प्राप्त होतेच!
2013 मध्ये यूपीएससी प्रीलिम्स पास करणारी अनिता पहिल्या प्रयत्नात मेन्स परिक्षेत अपात्र ठरली. घनश्याम यांनी त्यांन मार्गदर्शन केले, पुन्हा नव्याने अभ्यास करण्यास प्रेरणा दिली. 2014 मध्ये त्यांनी राजस्थान पीसीएस कैडर हे पद प्राप्त केले. दिवस 2014 मध्ये घनश्याम यांनी अभ्यासात अमुलाग्र बदल केले, कठोर परिश्रम केले, दिवस-रात्र अभ्यास करून शेवटी त्यांना राजस्थान पीसीएस परिक्षेत यश मिळाले.
2015 मध्ये अनिता यांनी यूपीएससी मेन्स परिक्षा पास केली. त्यांना कठोर परिश्रम करावे लागले. 8 डिसेंबर ला यूपीएससी मेन्स परिक्षा झाली आणि 22 नोव्हेंबर ला त्यांनी लग्न केले. अनिता यादव यांनी 2017 मध्ये 350च्या रैंक मध्ये स्थान मिळवूण भारतीय प्रशासकिय सेवेत (यूपीएससी) अधिकारी पद प्राप्त केले.
घनश्याम मीना म्हणतात कि, यूपीएससी परिक्षेची तयारी करणाऱ्यांनी ‘कठोर परिश्रम, एकाग्रता आणि प्रामाणीक प्रयत्न’ या गोष्टी लक्षात ठेउन प्रयत्न केल्यास यश तुमच्ये आहे.