लिंग व त्याचे प्रकार – मराठी व्याकरण
मराठी व्याकरणांमध्ये एखादा शब्द पुल्लिंगी अथवा स्त्रीलिंगी का आहे हे सांगण्यासाठी विशिष्ट नियम नाहीत. मराठी व्याकरणातील लिंग विचार केवळ त्या भाषेशी होणाऱ्या परिचयातून समजून घ्यावे लागते.
Type of Gender in Marathi
एखाद्या नामावरून ती वस्तू पुरुषजातीची, स्त्रीजातीची किंवा भिन्न जातीची आहे हे कळते त्याला त्या नामाचे लिंग असे म्हणतात. लिंगाचे एकूण ३ प्रकार आहेत.
पुल्लिंग : ज्या नामावरून ती वस्तू पुरुषजातीची आहे असे समजते, तेंव्हा त्या नामाचे लिंग पुल्लिंग समजावे.
- उदाहरण – मुलगा, घोडा, कुत्रा
स्त्रीलिंग : ज्या नामावरून ती वस्तू स्त्रीजातीची आहे असे समजते, तेंव्हा त्या नामाचे लिंग स्त्रीलिंग समजावे.
- उदाहरण – मुलगी, घोडी, कुत्री
नपुंसकलिंग : ज्या नामावरून ती वस्तू पुरुषजातीची किंवा स्त्रीजातीची आहे हे समजत नाही, तेंव्हा त्या नामाचे लिंग नपुसंकलिंग समजावे.
- उदाहरण – मुल, पिल्लू, पाखरू
एखाद्या नामावरून बोलणारा , ज्याच्याशी बोलायचे तो व ज्याविषयी बोलयचे त्या सर्व नामाला पुरुषवाचक सर्वनामे म्हणतात. पुरुषवाचक सर्वनामाचे ३ प्रकार आहेत.
प्रथम पुरुषवाचक : बोलणारा किंवा लिहिणारा स्वतःचा उल्लेख करण्यासाठी ज्या सर्वानामाचा उपयोग करतो त्या सर्वनामाला प्रथम पुरुषवाचक सर्वानाम म्हणतात.
द्वितीय पुरुषवाचक : ज्याच्याशी बोलायाचे त्या व्यक्तीचा किंवा वस्तूचा उल्लेख करण्यासाठी ज्या सर्वानामाचा उपयोग करतात त्या सर्वनामाला द्वितीय पुरुषवाचक सर्वानाम म्हणतात.
तृतीय पुरुषवाचक : ज्याच्या विषयी बोलायचे त्या व्यक्तीचा किंवा वस्तूचा उल्लेख करण्यासाठी ज्या सर्वानामाचा उपयोग करतात त्या सर्वनामाला तृतीय पुरुषवाचक सर्वानाम म्हणतात.
वचन म्हणजे काय?
एखाद्या नामावरून ती वस्तू एक आहे का अनेक आहेत हे कळते त्याला वाचन असे म्हणतात. वाचनाचे एकूण २ प्रकार आहेत.
एकवचन : ज्या नामावरून त्या वस्तूची संख्या एक आहे असे समजते, तेंव्हा त्या नामाचे वचन एकवचन मानले जाते.
- उदाहरण – अंबा, घोडा, पेढा
अनेकवचन : ज्या नामावरून त्या वस्तूची संख्या एकपेक्षा जास्त आहे असे समजते, तेंव्हा त्या नामाचे वचन अनेकवचन मानले जाते.
- उदाहरण – अंबे, घोडे, पेढे
पुल्लिंग व स्त्रिलिंग वर आधारीत उदाहरणे |
|
मुलगा | मुलगी |
घोडा | घोडी |
कुत्रा | कुत्र |
खोंड | कालवड |
जनक | जननी |
मोर | लांडोर |
वर | वधू |
बालक | बालिका |
युवक | युवती |
कवी | कवयित्री |
दास | दासी |
हंस | हंसी |
वानर | वानरी |
देव | देवी |
नायक | नायिका |
उंट | सांडणी |
पुरुष | स्त्री |
वाघ | वाघीण |
लेखक | लेखिका |
बैल | गाय |
विद्वान | विदुषी |