प्रतिमा ओळखणे उपक्रम
-
विद्यार्थ्यांना आरसा स्वतः वापरून सुरवातीला …अंक , इंग्रजी अद्याक्षर , भुमीती आकृत्या कशा दिसतात याचे निरीक्षण करायला लावावे.
-
प्रत्यक्ष आकार व आरश्यातील किंवा पाण्यातील प्रतिमा …नेमका बदल शोधने
-
आरश्यात जसेच्या तसे दिसणारे अक्षर शोधणे …मुले आवडीने हा उपक्रम करतील.
एकूण 11 अक्षरे आहेत जे आरश्यात बदलत नाहीत .
> A , H , I , M , O , T , U , V
W , X Y
👆🏼👆🏼👆🏼👆🏼 हे अक्षर असेच आरश्यात दिसतील .
_______________________________
घड्याळ वेळ आरश्यात
उदाहरणार्थ – घड्याळात 4: 40 ही वेळ आरश्यात पाहिली तर किती दिसेल ??
स्पष्टीकरण –
यासाठी अगदी सोपे सुञ आहे . दिलेली वेळ 11:60 मधुन वजा करणे.
11 : 60
– 4 : 40
————-
7 : 20
म्हणून 4: 40 ही वेळ आरश्यात 7:20 अशी दिसेल.
————————————————–
दोन आरश्यात प्रतिमा किती
दोन आरश्यातील कोन दिला जातो व प्रतिमा किती तयार होतील असा प्रश्न विचारतात .
सुञ –
आरश्यातील एकूण प्रतिमा
360°
= ———————– – 1
दोन आ. कोन
उदाहरणार्थ –
दोन आरश्यात 30° चा कोन असेल तर एकूण प्रतिमा किती मिळतील ?
स्पष्टीकरण –
एकूण प्रतिमा संख्या
360
= ———————- – 1
दोन आ. कोन
360
= —————- – 1
30
= 12 – 1 = 11
म्हणून 11 प्रतिमा तयार होतील.