आयुष्यात यशस्वी करणारी ही कठोर वाक्ये तुम्हाला – यशस्वी बनवतील!

आयुष्यात कोणत्याही गोष्टीची नव्याने सुरूवात करताना या तथ्थ्याची जाणीव असली पाहिजे..

आयुष्यात यशस्वी करणारी ही कठोर वाक्ये तुम्हाला - यशस्वी बनवतील!

या जगात प्रत्येकजन आपल्या आयुष्यात यशासाठी खूप काही करण्याची तयारी ठेवतो. खडतर मेहनत घेतो, खूप प्लान्स बनवतो, विचार करतो. कधीकधी मेहनतीची पावती मिळते आणि कधी कधी आपण निराश होतो. त्यातून नव्या उमेदीने उभं राहण्यासाठी तुम्हाला ह्या काही गोष्टी नेहमी माहित असायला पाहिजेतच.

जगात कुणीच आणि कधीच “खूप व्यस्त” नसतं!
  • तरुण तरुणींचा टिपिकल प्रॉब्लम – एखाद्या मुलाने / मुलीने तुमच्याशी बोलावं म्हणून आटापिटा करत असता. किंवा – तुम्ही ज्यांच्याकडे नोकरीसाठी येरझाऱ्या मारताय, त्यांनी तुमच्या मेल ला उत्तर द्यावं म्हणून वाट बघत असता. तुमच्या आयुष्यातील काही मित्र परिवार जो तुम्ही आपणहून सुरु केलेल्या संभाषणाला दाद देत नाही. ही सगळी मंडळी इतके व्यस्त नक्कीच नसतात जेणेकरून तुम्हाला उत्तरदेता येणार नाही..

तात्पर्य एवढंच – की अश्या लोकांना कितपत किंमत द्यायची हे ठरवा आणि/किंवा ते तुमच्यात इंटरेस्टेड नाहीत हे ओळखा. ह्या माणसांना दूर सारून चांगल्या माणसांसाठी तुमच्या आसपास जागा बनवा.

सगळेजण स्वार्थी असतात!

  • ह्या जगात कोणीही संपूर्ण निस्वार्थी नाही. प्रत्येकाला आपले स्वार्थ प्रिय असतात. अगदी तुमच्या बॉस – ज्याने त्याच्या वाट्याची कामं तुमच्यावर सोपवण्याचा सपाटा लावलाय, पासून ते तुम्हाला जिवलग मित्र म्हणणाऱ्या पण कामझाल्यावर ओळख न दाखवणाऱ्या मित्रपरीवारापर्यंत सगळे स्वार्थी असतात. प्रत्येक जण तुमच्याकडून जेवढं जमेल तेवढं काम काढून घेण्याच्या प्रयत्नात असतो. शेवटी तुम्हाला कुणाच्या स्वार्थाला बळी पडायचं हे तुम्हीच ठरवू शकता.
  • स्वतःच्या कामाला महत्वं द्या. यशस्वी माणसे “नाही” म्हणण्याची हिम्मत ठेवतात. तुमच्या दयाळूपणाला, समाजसेवेला आणि मदतनीस स्वभावाला कुंपण घाला. लोकांना तुमचा वापर करून घेऊ देऊ नका. शेवटी मदत करणे आणि वापर करून घेणे ह्यातला फरक कळला पाहिजे.

सगळ्यांना खुश ठेवणं – अशक्य!

  • तुम्हाला खूप दिवसांपासुन मित्रांसोबत मुव्ही ला जायचं पण तेव्हाच कुणा नातेवाईकाकडे लग्न आहे. तुमचा मित्र तुमची वाट बघतोय पण तुमचा बॉस तुम्हाला मदत मागत आहे. दैनंदिन आयुष्यात ह्या अश्या गोष्टी नेहमी येतात जिथे आपल्याला एक निर्णय घ्यावा लागतो जिथे कुणाला ना कुणाला दुखवावं लागतं..तुम्ही सगळ्यांना खुश ठेवू शकत नाही. तुम्ही प्रयत्न जरूरकरू शकता पण त्याने तुमचं आयुष्य बेढब, अस्ताव्यस्त आणि त्रासदायक होईल..

ह्या जगात तुम्हाला फुकट काहीच मिळणार नाहीये!


  • तुमच्यात भरपूर गुण आहेत जसे की वक्तृत्व, नेतृत्व, कला. त्या गुणांना छान पैलू पडून त्यांचा वापर करून दाखवत नाही, तोवर लोकांना कसे कळणार?.तुम्हाला नेहमीच दोन पर्याय उपलब्ध असतात. एकतर तुम्हाला तुमच्या क्षमतेपेक्षा कमी मिळालं म्हणून रडत बसा किंवा उतरा मैदानात आणि जे हवाय ते तुमच्या कलागुणांच्या जोरावर मिळवा.

बहाणे? तुम्ही स्वतःला फसवताय!

  • नेहमीसारखे तुम्ही कट्ट्यावर बसलात आणि नेहमीचा राग आळवताय, मला हे नाही मिळालं मला ते नाही मिळालं. तुमच्याकडे पैसा, घर, गाडी, साधने नाहीत म्हणून रडत बसता. पण इथे प्रत्येकाजवळ आपल्या अपयशासाठी एक तरी योग्य कारण असतंच. आणि ह्या बहाण्यांनी आपण स्वतःला फसवत असतो..
  • यशस्वी लोक असा कांगावा करत बसत नाहीत. ते आपल्या आवडत्या गोष्टींसाठी वेळ काढतात, अडचणींवर मात करण्याचे उपाय शोधतात..

विचारांपेक्षा कृती महत्वाची!

  • तुम्ही घरात बसून मोठमोठ्ठी स्वप्ने बघताय, मोठी उद्दिष्टे ठेवताय. मोठ्या गोष्टींबाबत विचार करणे चूक नाही, उलट मोठ्या ध्येयांसाठी ते पोषकच आहे. पण नुसतं विचार करणे कितपत यश देऊ शकेल?.त्या सगळ्या आखलेल्या प्लान्स वर काम करण्यासाठी कृती करणे देखील तेवढेच महत्वाचं आहे ना? विचार आणि कृतीला व्यवस्थित गुंफता आलं की यश मिळतं. नाहीतर नुसते विचार वायाच जातात.

तुमच्या आयुष्यात जादु करणारे तुम्हीच आहात!

  • आपल्याला एक नेहमीच वाटत असतं की काहीतरी जादू होईल आणि सगळं कसं मस्त होईल. आपल्याला एक परफेक्ट जोडीदार मिळेल, नोकरीचा कॉल आपोआप येईल. आयुष्यातल्या अडचणी जादूने संपून जातील आणि आटपाट नगरीसारखं सगळं आलबेल होऊन जाईल. पण तसं नसतं. जे लोक पुढे जातात त्यांना हे माहित असतं की आपल्या आयुष्यात ज्या काही अडचणी आहेत त्या दूर आपल्यालाच करायच्या आहेत. जर काही बदलायचं असेल तर त्यासाठी आपणच झटायला हवं. जे साध्य करायचं ते स्वतःलाच करावं लागणार. कुणी येऊन जादूची काडी फिरवणार नाहीये.
  • जेव्हा जेव्हा तुम्हाला हरल्यासारखं वाटायला लागेल, तेव्हा हे परत वाचा! नवी उमेद मिळेल!
 मित्रांनो तुम्हाला हा लेख कसा वाटला ते खाली कमेंट करून नक्की सांगा. पुढे मित्रांना पाठवा.