शिक्षण भरतीसाठी मराठी व इंग्रजी माध्यमातून २०० गुणांची राज्यस्तरीय समान काठिण्य पातळी चाचणी परीक्षा घेतली जाईल.इयत्ता पहिली ते आठवीमधील शिक्षक पदाकरिता महाराष्ट्र खाजगी शाळांमधील कर्मचारी (सेवेच्या शर्ती) नियमावली, १९८१ मधील शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता धारण केलेले तसेच ‘शिक्षक पात्रता परीक्षा’ (टीईटी) उत्तीर्ण उमेदवार परीक्षेस अर्ज करण्यास पात्र ठरतील.