मार्च २०१०अखेर देशातील ६४,७५५ कि.मी लोहमार्गंपैकी राज्यातून ५,९८३ कि.मी ९९.४%) लांबीचे रेल्वे मार्ग जातात.
महाराष्ट्रात प्रमुख सहा लोहमार्ग जातात.
महाराष्ट्रातील ७२.७% मार्गाचे विद्युतीकरण झाले आहे.
राज्यातील लोहमार्गांची घनता १९.४४ कि.मी. असून महाराष्ट्र भारतात घनतेच्या बाबतीत चौदाव्या क्रमांकावर आहे. सर्वाधिक घनता सोलापूर जिल्ह्यात आहे. (भारताची रेल्वेची घनता १९.६९ कि.मी. इतकी आहे.)
कोकण रेल्वे कोकणातील सर्व जिल्ह्यातून जाते. तिच्या ८४३ कि.मी. लांबी महाराष्ट्रात आहे.
कोकण रेल्वे औपचारिक उद्गघाटन १ मे १९९८ रोजी झाले. या मार्गावर ताशी १६० कि.मी. वेगाने जाणा-या वेगाने जाणा-या बुलेटनची चाचणी घेण्यात आली.
मुंबई रेल्वे विकास महामंडळाची स्थापना – १९९८
तीनही प्रकारचे रेले मार्ग एकत्र येतात – मिरज
महाराष्ट्रातील दुमजली गाडी – सिंहगड एक्स्प्रेस (पुणे-मुंबई)
महाराष्ट्र एक्सप्रेस कोल्हापूर व गोंदिया दरम्यान धावते.
मध्य रेल्वेने राज्यात पर्यटनाचा विकास होण्यासाठी १६ जाने. २००४ पासून डेक्कन ऑडिसी ही लक्झरी पर्यटन रेल्वे सुरु केली आहे. ही रेल्वे मुंबई-जयगड-गणपती पुळे-रत्नागिरी-भाट्ये बीच-सिधुदुर्ग-तरकारली-सावंतवाडी-गोवा-पुणे-औरंगाबाद-अजिंठा व वेरुळ आणि नाशिक इ. स्थळांची सफर घडविते.
महाराष्ट्रात सरासरी ६००० व्यक्तींना एक टपाल कचेरी सेवा पुरविते हे प्रमाण २५.७७ चौ.कि.मी. क एक टपाल कचेरी इतके आहे.
भारतातील पहिले उपग्रह दळणवळण केंद्र– आर्वी (जुन्नर-जि.पुणे) येथे १९७१ मध्ये स्थापन झाले. तर दुसरे केंद्र १९७६ मध्ये डेहराडून येथे स्थापन करण्यात आले आहे.
आंतरराष्ट्रीय संपर्क सेवेत सुसूत्रता आणण्यासाठी राज्यात केंद्राने उभारलेली केंद्रे – नागपूर व मुंबई
नियततालिकांच्या प्रसारणाच्या बाबतीत उतरता क्रमांक – १) उत्तर प्रदेश २) दिल्ली ३) महाराष्ट्र
महाराष्ट्र राज्य लोक साहित्य मंडळाची स्थापना – १९५६
मराठी भाषा व साहित्याचा सर्वांगिण विकास करणे तसेच इतिहास व कला क्षेत्रातील वारसा जपण्यासाठी १९६० रोजी महाराष्ट्र राज्य साहित्य परिषदेची स्थापना झाली.
महाराष्ट्रातील नियोजित उपग्रह स्थानक – न्हावाशेवा (रायगड)
राज्य शासन छोट्या ४८ बंदरांचा विकास करण्यासाठी बांधा, मालक व्हा, चालवा व हस्तांतरित करा या तत्वाचा वापर करणार आहे. त्यासाठी १९६६ मध्ये महाराष्ट्र मेरी टाईम बोर्डाची स्थापना करण्यात आली. या अंतर्गत रेवस आवारे हे बहुउपयोगी बंदर व दिघी हे बंदर रासायनिक पदार्थांचे स्थान म्हणून विकसित करण्यात येणार आहे.