PSI मुकेश गायकवाड यांची घेतलेली मुलाखत कशी होती?

 

Mukesh%2BGaikwad%2BPSI%2B2018

 

मु.- मानेजवळगा. ता.-निलंगा. जि- लातूर
निवड -पोलीस उपनिरीक्षक (PSI) SC Rank- 52.
मुलाखत 40 पैकी 32 मार्क्स (karmveer mpsc class latur)

 

पॅनल – पटेल सर आणि sp उज्जवला वानकार मॅडम. दोघांना ही good morning केल (वेळ 11:50 am)

पोलीस उपनिरीक्षक पदासाठी मुलाखतीमध्ये विचारले गेलेले प्रश्न खालिल प्रमाणे.

  • पटेल सर.- तुमचे पदवीचे शिक्षण कोणत्या विद्यापिटातून झाले .
  • मी- यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक येतून झाले .
  • पटेल सर – यशवंतराव चव्हाण यांनी केंद्रात कोकोणते खाती सांभाळे होते.
  • मी- सर त्यांनी केंद्रात संरक्षण,गृह आणि वित्त मंत्री म्हणून काम केले आहेत
  • पटेल सर- यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीटाची स्थापना केंव्हा झाली
  • मी- 1989
  • Sp मॅडम- तुमची पदवी 2013 ला पूर्ण झाली कुठे तुम्ही नोकरी चा प्रयत्न केला नाही का
  • मी- मॅडम मी 2013 पासूनच  mpsc ची तयारी करत आहे
  • मॅडम – लातूर मध्ये 800 मी चा ट्रक आहे का / तुम्ही ग्राउंड ची तयारी कोठे केलात
  • मी- मॅडम मी ग्राऊंडची तयारी क्रीडा संकुल लातूर येथे  केली तेथे 800 मी चा ट्रक नव्हता .म्हणून time काढण्यासाठी पोलीस मुख्यालय बाभळगाव येथे जात होतो.
  • पटेल सर- तुम्ही अभ्यास करताना  grup discussion  करत होता का /त्याचा फायदा होतो का
  • मी-हो सर करत होतो. ग्रूप discussion चा खूप फायदा होतो त्यामुळे केलेला अभ्यास दीर्घ काळासाठी स्मरणारत राहतो आणि स्टेज डेरिंग पण येते
  • पटेल सर- तुम्हाला अभ्यास करताना बोर झाल्यानंतर काय करता  होता
  • मी- मित्र मैत्रणीशी गप्पा मारत होतो
  • पटेल सर -तुम्ही मुलाखती साठी काय वाचून आलात
  • मी- IPCआणि मुंबईपोलीस कायदा
  • पटेल सर- IPC महिलांच्या सुरक्षित ते साठी कुठले कलमे आहेत
  • मी- कलम 326(a),498,376
  • पटेल सर-मुंबई पोलीस कायद्यात कोणत्या कलमात सांगितले आहे की पोलीस 24 तास कामावर राहतो म्हणून
  • मी- कलम -28
  • पटेल सर-तुमची राज्यशास्त्र या विषयात पदवी झाली आहे . तर सांगा धन विधेयक प्रथम लोकसभेतच का मांडले जाते .
  • मी- सर लोकसभा प्रत्यक्ष जनतेला जबाबदार असते आणि संसद लोकसभेला जबाबदार असते. लोकसभेला धन विधेयक बाबत जास्त अधिकार आहेत.म्हणून…
  • पटेल सर- महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थेत सद्या50%आरक्षण आहे . तुम्हाला काय वाटते की महिलांना लोकसभा आणि विधान सभेत आरक्षण असायला पाहिजे का आणि त्याचा फायदा काय होईल
  • मी- सर जागतिक पातळीवर वेगवेगळे अहवाल/ इंडेक्स जाहिर केले जातात महिलांचा संसदेतील सहभाग वाढला तर त्या इंडेक्स मध्ये भारताची रँक वाढेल आणि जगाचा भारताकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलेल
  • मॅडम- भारतात तसा प्रयत्न सुरु आहे का / पूर्वी काय केले आहेत का?
  • मी- सर upay च्या काळात 108 वे घटनादुरुस्ती विधेयक आणले होते ते राज्यसभेत मंजूर झाले होते परंतु लोकसभेत कोणत्याही पक्षस स्पष्ट बहुमत नसल्यामुळे ते पारित होऊ शकले नाही
  • पटेल सर – तुम्हाला psi होण्यासाठी कोणाकडून प्रेरणा भेटली/ तुम्ही psi  का होणार आहात
  • मी- सर माझे वडील 4थी पर्यंत शाळा शिकले आहेत नंतर ते आमच्या गावातील शेतकऱ्याकडे गुरे,ढोरे राखण्यास नोकरीला होते त्या  घरातील एक व्यक्ती psi पदावर कार्यरत होते . त्यांचे राहणीमान, गावातील प्रतिष्टा पाहून माझ्या वडिलांना पण माझा मुलगा psi झाला पाहिजे असे वाटायचे, म्हणून मला माझ्या वडिलांसाठी psi होयाचेआहे. आणि मला माझ्या  वडिलाकडूनच प्रेरणा मिळाली
  • पटेल सर- बर कोण्ही ठरवते की किंवा तुम्ही ठरवला का की पहिला पगार आल्यानंतर तुम्ही त्या पगारीच काय करणार आहात
  • मी- सर माझं गाव महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर आहे आणि गावात mpsc  चा गंध नाही . माझी mpsc तुन निवड झालेले पाहून माझ्या गावातील मुलांना प्रेरणा मिळेल आणि सर माझ्या गावातील तरुण वेसनाकडे खूप आकर्षित झाला आहे . म्हणून सर मी माझ्या पहिल्या पगारीतून गावातील किमान 4 मुलांनातरी  पुस्तके घेऊन देणार आहे
  • मॅडम-तुम्ही पोलिस स्टेशन चे मुख्य आहात आणि पो. स्टेशनवर वर जमाव दगड फेक करत आहेत तर तुम्ही काय कराल
  • मी-मॅडम मी सर्वप्रथम माझ्या वरिष्ठ अधिकारी सर याना काळवेन तसेच माझ्याकडे जेवढे अधिकार आहेत त्याचा वापर कारेन
  • पटेल सर- बर तुम्ही येवू शकता
  • मी – दोघानाही thank you  बोलून बाहेर आलो.