पोलिस भरतीसाठी अगोदर लेखी परिक्षा द्यावी लागेल. नवीन Gr काय आहे, नक्की वाचा…!

महाराष्ट्र पोलिस शिपाई भरती 2019

Maharashtra Police Bharti 2019

 

राज्यातील गृह विभागाच्या अखत्यारीतील पोलिस दलातील  महाराष्ट्र पोलिस शिपाई सेवाप्रवेश नियम, 2011 मध्ये सुधारणा करण्यासाठी खालीलप्रमाणे नियम करीत आहे.
  • महाराष्ट्र पोलिस शिपाई सेवाप्रवेश सुशारणा नियम, 2019 असे संबोधण्यात यावे.
  • महाराष्ट्र पोलिस शिपाई सेवाप्रवेश नियम, 2011 मधील नियम 4 चे उपखंड 1 ,2,3 खालीलप्रमाणे सुधारीत करण्यात येत आहेत.
लेखी परीक्षा (100 गुण) :
लेखी परीक्षेमध्ये खालीलप्रमाणे विषयांचा समावेश असेल.
  1. मराठी व्याकरण
  2. अंकगणित 
  3. बुध्दिमत्ता
  4. सामान्य ज्ञान
लेखी चाचणीचा कालावधी 90 मिनिटांचा असेल व लेखी चाचणी मराठी भाषेत घेण्यात येईल. सर्व प्रश्न बहुपर्यांयी राहतील.
शारीरिक चाचणी (50 गुण) :
जे उमेदवार लेखी चाचणीत किमान 35% (मागास प्रवर्गातील उमेदवारांच्या बाबतीत 33%) गुण मिळवून लेखी परिक्षा उत्तीर्ण होतील, त्यापैकी गुणवत्ता क्रमानुसार प्रसिध्द केलेल्या  जाहिरातीत प्रवर्गनिहाय नमूद केलेल्या पदसंख्येच्या 1:5 या प्रमाणात प्रवर्गनिहाय उमेदवारांना खालिलप्रमाणे शारिरीक चाचणीसाठी पात्र ठरविण्यात येईल.

 

पोलिस भरती शारिरीक चाचणी 2019

 

पुरूष उमेदवारासाठी शारिरीक चाचणी एकूण 50 गुणांची असेल.
1
1600 मीटर धावणे
30 गुण
2
100 मीटर धावणे
10 गुण
3
गोळा फेक
10 गुण
एकूण
50 गुण

 

Police Bharti Physical Test Marks 2019

 

महिला उमेदवारासाठी शारिरीक चाचणी एकूण 50 गुणांची असेल.
1
800 मीटर धावणे
30 गुण
2
100 मीटर धावणे
10 गुण
3
गोळा फेक
10 गुण
एकूण
50 गुण

Maharashtra Police Bharti 2019

जे उमेदवार लेखी चाचणीत किमान 35%  (मागास प्रवर्गातील उमेदवाराबाबत 33%) गुण मिळवून लेखी परिक्षा उत्तार्ण होतील, त्यांच्यापैकी गुणवत्ता क्रमाणुसार प्रसिध्द केलेल्या जाहिरातीत प्रवर्गनिहाय नमूद केलेल्या पदसंख्येच्या 1:5 या प्रमाणात प्रवर्गनिहाय उमेदवारांना शारिरीक चाचणीसाठी पात्र ठरतील.

 

पोलिस भरतीचा नवीन GR Downloda करण्यासाठी Click करा.

Police Bharti gr Download

 

तुमच्या मित्रांना पण शेयर करा. खालिल Comment Box  तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कळवा.