पोलिस भरतीची प्रक्रिया साधारणपणे 45 ते 60 दिवसांत पूर्ण होऊ शकते. मित्रांनो, तुम्ही नियोजनपूर्वक अभ्यास करा तरच यश मिळू शकते. सर्वप्रथम गणित, बुद्धीमापन व मराठी हे विषय पक्के झालेत का बघा. या विषयात पैकीच्या पैकी गुण घेता येतात. सामान्य ज्ञानावरती अधिक भर न देता चालू घडामोडी घटकावरती भर द्या. प्रत्येक घटकासाठी संदर्भ पुस्तक वापरा.
पेपरचा सराव : तुमचे सकाळी शारीरिक तयारी झाल्यानंतर सकाळच्या सत्रात यापूर्वी झालेला पोलिस भरतीचा प्रश्न सोडवा. 100 पैकी किती गुण पडतात बघा व कुठे चुकले ते बघा. संध्याकाळच्या सत्रात सराव पेपर एक सोडवा. सध्या जास्तीत जास्त भर प्रश्नभपत्रिका सोडविण्यावर द्या. तुम्ही ज्या जिल्ह्यासाठी अर्ज केला आहात, त्या जिल्ह्याचा संपूर्ण अभ्यास करा.
सराव : जितका अधिक सराव कराल तेवढे यश तुमचेच असेल. सराव वेळ लावून करा. प्रश्नाधची उत्तरे चुकल्यास तत्काळ संदर्भ काढून पहा व मगच पुढची प्रश्न्पत्रिका सोडवा. प्रश्ने सोडवत असताना चारी पर्यायांचा विचार करा व अधिकाधिक चिंतन करा.
शैक्षणिक पात्रता:
- किमान उच्च माध्यमिक परीक्षा – 12 वी उत्तीर्ण किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे.
- उमेदवार माजी सैनिक असल्यास शासकीय निर्णयानुसार शैक्षणिक पात्रतेची अट शिथिल,
- पोलिस बँड पथकासाठी 10 वी उत्तीर्ण
- वयोमर्यादा – सर्वसाधारण गटासाठी 18 ते 28 वर्षे, मागासवर्गीय – 18 ते 33 वर्षे, माजी सैनिक – सैन्यात भरतीचे वय सैन्यातील एकूण सेवा 3 वर्षे, प्रकल्प व भूकंपग्रस्तासाठी – 18 ते 28 वर्षे, मागासवर्गीय 5 वर्षे शिथिल.
लेखी परीक्षा : 100 गुणाची व 90 मिनिटांची. लेखी परीक्षा वस्तुनिष्ठ स्वरूपाची असते. तुम्ही 2014 पासून पोलिस भरतीची तयारी करत असणार यात शंका नाही. त्यामुळे जास्तीत जास्त सरावाला महत्त्व द्या.
अंकगणित (25 गुण) : यामध्ये बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, सरळव्याज सरासरी, टक्केवारी, अपूर्णांक, काळ-काम-वेग, नफा-तोटा, वर्गमूळ व इतर. घटकांचा समावेश असतो.
बुद्धीमत्ता चाचणी (25 गुण) : यामध्ये अक्षरमाला, सांकेतिक लिपी, अंकमालिका, बेन आकृती, सहसंबंध, दिशा, कूटप्रश्नक व इतर. घटकांचा समावेश.
मराठी व्याकरण (25 गुण) : मराठी भाषा, उगम, शब्दांच्या जाती, प्रयोग, समास, शब्दसिद्धी, म्हणी, वाक्यप्रचार, समानार्थी, विरुद्धार्थी, शुद्धलेखन यांचा समावेश असतो.
सामान्यज्ञान व चालू घडामोडी (25 गुण) : यामध्ये महाराष्ट्र, भारत व जगाच्या भूगोलाचा तसेच समाजसुधारक, इतिहास, पंचायत राज, राज्यघटना, चालू घडामोडी व जिल्हा यावर प्रश्न अपेक्षित असतात.