महाराष्ट्र पोलिस भरती 2019 साठी झाला मोठा बदल
पोलिस भरतीसाठी अगोदर लेखी परिक्षा द्यावी लागेल. नवीन Gr काय आहे, नक्की वाचा…!
पोलीस भरती निवड प्रक्रिया
अ) पाञता
- उमेदवार इ.१२ वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे .
- माजी सैनिकासाठी शैक्षणिक अर्हतेची अट शिथिल असते.
- पोलिस बँड पथकासाठी इ.१० उत्तीर्ण आवश्यक.
- नक्षलग्रस्त भागातील उमेदवारांसाठी इ.७ वी उत्तीर्ण.
ब)वयोमर्यादा
- सर्वसाधारण उमेदवार (Open)-१८ ते २५
- मागासवर्गीय उमेदवार (OBC/SC/ST/NT-VJ)-१८ ते ३० वर्षे.
- प्रकल्पग्रस्त/भुकंपग्रत – उमेदवार १८ ते ३५ वर्षे
- माजी सैनिक उमेदवार – सैन्यदलातील सेवा + ३ वर्षे.
क) शारीरिक पाञता
- पुरूष – उंची १६५ से.मी.
- छाती न फुगवता -७९ से.मी.,फुगवुन ५ से.मी.
- स्त्री – उंची १५५ से.मी., वजन ४८ कि.ग्र.
शारीरिक पात्रतेतील सवलत
1] नक्षलग्रस्त भागासाठी
- उंची २.५ से.मी. पुरूष व महिला यांना सवलत .
- छातीच्या मोजमापाची आवश्यकता नाही .
2] पोलिस बँड पथक
- उंची २.५ से.मी. पुरूष व महिला यांना सवलत .
- छाती २ से.मी. न फुगवता व फुगवुन १.५ से.मी.
- खेळाडूला – उंचीत महिला व पुरूषांना २.५ से.मी. उंचीची सवलत.
ड) आरक्षन
- SC 13%,ST 7%,VJ-A 3%,NTB 2.5%,NTC 3.5%
- NTD 2%,SBC 2%,OBC 27%
विशेष आरक्षन
माजी सैनिक १५%,अपंग व्यक्ती ३%,महिला ३०%, प्रकल्पग्रस्त व भुकंपग्रत ५%,खेळाडु ५%,होमगार्ड ५%.
★ पोलीस भरती निवड ★
अ) शारीरिक चाचणी (मैदानी) १०० गुण
ब) लेखी परीक्षा १०० गुण
——–
२00 गुण
क) मुलाखत घेतली जात नाही.
अ] शारीरिक चाचणी ( पुरूष उमेदवारासाठी )
१) १६०० मी. धावणे
( वेळ अंदाजे ६ मीनीटे, फिक्स नाही.) २० गुण.
२) १०० मी. धावणे
* ११.५० सेकंद किंवा त्यापेक्षा कमी वेळ लागल्यास २० पैकी २० गुण.
*१७.५० सेकंदापेक्षा जास्त वेळ लागल्यास ० गूण.
३) गोळा फेक(७.२६० कि.ग्र. वजनाचा गोळा)
* ८.५० मी. फेकल्यास २० पैकी २० गुण.
* ३.१० मी. पेक्षा कमी फेकल्यास ० गुण.
४) लांब उडी
* ५ मी. किंवा जासत गेल्यास २० गुण.
* २.५० मी.पेक्षा कमी गेल्यास ० गुण.
५)पुलप्स ( पाय न वाकवता न झगडता पुलप्स काढल्यास )
* १० पुलप्स काडल्यास २० गूण.
* ५ पेक्षा कमी पुलप्स काढल्यास ० गुण.
महिला उमेदवारांसाठी
१) १६०० मी. धावणे
( वेळ अंदाजे ६ मीनीटे, फिक्स नाही.) २५ गुण.
२) १०० मी. धावणे
* १४ सेकंद किंवा त्यापेक्षा कमी वेळ लागल्यास २५ पैकी २५ गुण.
*२० सेकंदापेक्षा जास्त वेळ लागल्यास ० गूण.
३) गोळा फेक(४ कि.ग्र. वजनाचा गोळा)
* ६ मी. फेकल्यास २५ पैकी २५ गुण.
* ४ मी. पेक्षा कमी फेकल्यास ० गुण.
४) लांब उडी
* ३.८० मी. किंवा जासत गेल्यास २५ गुण.
* १.७० मी.पेक्षा कमी गेल्यास ० गुण.
निवड प्रक्रियेतील टप्पे
अ) शारीरिक पात्रताः प्रथम उमेदवाराची उंची/वजन/छाती मोजन्यात येते.( पहिला टप्पा )
ब) प्रमाणपत्र तपासणी ( दुसरा टप्पा ) उमेदवार शारीरिक चाचणीत पात्र ठरल्यास त्याच्या मुळ प्रमाणपत्राची तपासणी होते.
क) मैदानी चाचणी १०० गुण (तिसरा टप्पा )
ड) लेखी परीक्षा १०० गुण ( चौथा टप्पा )