पोलीस भरती स्पेशल – मराठीत पैकीच्या पैकी मार्क्स मिळवा (भाग – 1)

मराठी विषयात आपण कशा प्रकारे पैकीच्या पैकी मार्क्स मिळवू शकतो व ते पण मजेशीर स्वरूपात अभ्यास करून, ते आपण या लेखात पाहणार आहोत.

Police%2BBharti%2BMahiti%2BMarathi%2BGrammar%2BPart%2B1

पोलीस भरतीची जाहिरात कळताच सर्व विध्यार्थ्यांत आनंदाचे व काही प्रमाणात अभ्यासाबद्दल गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. आजचा हा लेख पोलीस भरती करणाऱ्या विध्यार्थ्यांसाठी संजिवनी ठरेल अशी अपेक्षा करतो.

क्लिक करून तुमच्या मित्रांना नवरात्रीच्या शुभेछा पाठवा..

आपण आज या लेखातून, मराठी व्याकरण कसे सोप्या व गमतीदार पद्धतीत अभ्यासू शकतो, हे पाहणार आहोत. तत्पूर्वी आपण हे पाहू की, पोलीस भरती मध्ये मराठी व्याकरण मधील कोणते घटक परीक्षेत विचारतात.

मराठी व्याकरण ( 25 गुण ) : शब्दसिद्धी, शब्दांच्या जाती, प्रयोग, समास, अलंकार, मराठी भाषा, उगम, वर्ण, म्हणी, वाक्यप्रचार, समानार्थी व विरुद्धार्थी शब्द, शुद्धलेखन

वरील घटकातील शब्दसिद्धी हा घटक कसा मजेशीर स्वरूपात तोंडपाठ होतो ते पहा ! परीक्षेत काही शब्द दिली जातात व ते कोणत्या प्रकारचे आहेत ते विचारले जातात. जर आपल्याला त्या त्या प्रकारचे शब्द त्या प्रकारानुसार लक्षात ठेवण्यास कठीण जात असेल तर त्या साठी आपण त्या शब्दांची गोष्ट बनवली तर किती मजेशीर होईल ना ?

मी माझ्या शॉर्टकट मराठी व्याकरण पुस्तकात आशा स्वरूपात मजेशीर गोष्टी बनवल्या आहेत. जेणे करून गोष्ट वाचली की ते शब्द कायमस्वरूपी लक्षात राहतात. चला आपण पोर्तुगीज शब्द कसे गोष्टी नुसार पाठ होतात ते पाहू..!

पोर्तुगीज शब्द : मेस्त्री , पाद्री , बायको , कोष्टी , खमीस , इस्त्री, चावी, कोबी, बटाटा ,भोपळा, अननस, पपई , फणस , लोणचे, आचार, हापूस, नाताळ, पगार,  तिजोरी,  बिजागरी,  अलमारी, बोगदा, बटवा, पैसा,  पसार,  कर्नल,  पुरावा, पिस्तोल, काडतुस,  बशी,  पाव, बिस्कीट, परात, रोटी,  वार , घमेले,  साबूदाणा, फालतू , तंबाखू ,  पिंप , बंब,  बुच , बादली, सोडत, साबण , कोरडा, टिकाव,  जुगार , आरमार,  व्हरांडा , पायरी,  लिलाव,  मेज

वरील सर्व शब्द खालील गोष्टीत समाविष्ट आहेत.

पोर्तुगीज ट्रिक्स / गोष्ट : मेस्त्रीची पाद्री बायको कोष्टीला खमीसला इस्त्री करण्यास  सांगते  व ती चावी घेऊन कोबी, बटाटा, भोपळा, अननस, पपई, फणस व लोणचे किंवा आचार करण्यास हापूस खरेदी करण्यासाठी जाते.
कोष्टी हा मिस्त्रीच्या घरी काम करत असतो व त्याला नाताळच्या सुट्टीचा पगार मिळत नाही म्हणून, तो तिजोरीची बिजागरी तोडून व अलमारीला बोगदा पाडून बटवा व पैसा घेऊन पसार होतो.
कर्नल पुरावा शोधण्यास पिस्तोल व काडतुस घेऊन येतो.

पुरावे शोधावेत म्हणून बायको कर्नलला बशीत पाव, बिस्कीट व परातीत रोटी खाण्यास देते, परंतु कर्नलला देवाचा वार असतो म्हणून त्याला घमेले भरून साबूदाणा देते.

फालतू कर्नल तंबाखू चोळत पिंपातील पाणी बंबात सोडतो व बंबाचे बुच उघडून बादलीत पाणी सोडतो व साबण लावून अंघोळ करतो व कोरडा होऊन साबूदाणा खातो.

कर्नलला चोरीचे पुरावे मिळत नाहीत व त्याचा टिकाव लागत नाही म्हणून तो नाराज होऊन जुगार खेळतो. जुगारात हरल्यामुळे आरमार व घराचा व्हरांडा , पायरी यांचा लिलाव करतो व मेज ( पार्टी ) करतो.

वरील ट्रिक्स वाचताना  ती एक गोष्ट आहे असे समजून डोळ्या समोर चित्र निर्माण करा, गोष्ट :- एक स्त्री कोष्टी नावाच्या माणसाला इस्त्री करण्यास सांगून घराच्या बाहेर जाते व कोष्टीला पगार न मिळाल्याने तो तिजोरी फोडून पैसे घेऊन पळून जातो. चोराचा शोध लावण्यास कर्नल पिस्तोल घेऊन येतो, कर्नलने पुरावे शोधावेत म्हणून ती स्त्री त्याला चांगले खायला देते. परंतु फालतू कर्नल पुरावे शोधणे सोडून तंबाखू खात बसतो. पुरावे न मिळाल्याने तो नाराज होऊन जुगारी बनतो व घराचा लिलाव करतो.

याचा फायदा कसा होतो ते पहा : समजा परीक्षेत असा प्रश्न विचारला की, कर्नल व तंबाखू हे कोणत्या प्रकारचे शब्द आहेत ? जेव्हा तुम्ही असा प्रश्न वाचता तेव्हा लगेच तुम्हाला कर्नल ची गोष्ट आठवते व तो कर्नल तंबाखू खात असतो हे तुमच्या डोळ्या समोर येईल. या नुसार तुम्हाला लगेच लक्षात येईल की हे पोर्तुगीज गोष्टीतील शब्द होते, व तुम्ही अचूक उत्तर देताल.

विचार करा जर सर्व मराठी व्याकरण अश्या गोष्टी व मजेशीर ट्रिक्स नुसार पाठ केले तर आपण पैकीच्या पैकी मार्क्स घेऊ.

मी आपल्या शॉर्टकट मराठी व्याकरण पुस्तकात आशा स्वरूपात सर्व गोष्टी टाकल्या आहेत. तुम्हाला त्या नक्कीच फायदेशीर ठरतील.

© लेखक – राजेश मेशे सर
पुस्तक – शॉर्टकट मराठी व्याकरण