या लेखात, मी तुम्हाला एकदम सोप्या पध्दतीने मराठी व्याकरण कसे अभ्यासतात ते सांगणार आहे. सुरवात करण्यापूर्वी तुम्हास आवर्जून सांगू इच्छितो की, सोप्या व सहज पद्धतीने मराठी व्याकरण शिकायचे असेल तर माझे शॉर्टकट मराठी व्याकरण पुस्तक नक्की वाचून पहा, जे की सर्व बुक सेंटर वर उपलब्ध आहे. ते नक्कीच तुम्हाला संजीवनी बनून यशस्वी बनवेल.
अलंकार : कोणतेही गद्य वा काव्य श्रवणीय वा रसपूर्ण करण्यासाठी वापरला जाणारा (काव्यात्मक) साचा म्हणजे अलंकार होय.
अलंकाराचे दोन प्रकार पडतात : शब्दालंकार व अर्थालंकार
( थोडक्यात – शब्दालंकारात शब्दांची किंवा अक्षरांची पुनरुक्ती होते ).
❇ यमक : कवितेच्या चरणात ठरावीक ठिकाणी एक किंवा अनेक अक्षरे वेगळ्या अर्थाने परंतु उच्चारात समानता असेल व त्यामुळे नाद निर्माण होऊन कवितेच्या चरणाला सौंदर्य प्राप्त होत असेल तर यमक हा शब्दालंकार होतो.
★ यमक अलंकार याची तुलना आपण रामदास आठवले सर यांच्याशी करूया, जेणे करून परीक्षेत त्यांच्या कविते सारखे चरणे विचारले की, डोळे झाकून आपण यमक अलंकार हा पर्याय निवडतोल.
❇ श्लेष : एकच शब्द वाक्यात दोन अर्थांनी वापरल्याने जेव्हा शब्दचमत्कृती साधते तेव्हा श्लेष अलंकार होतो.
★ श्लेष अलंकार याची तुलना आपण दादा कोंडके यांच्याशी करूया, जेणे करून परीक्षेत विचारलेल्या चरणात एकाच शब्दाचे दोन अर्थ निघत असतील तर आपण डोळे झाकून श्लेष अलंकार हा पर्याय निवडतोल.
❇ अनुप्रास : कवितेच्या चरणात किंवा वाक्यात एकाच अक्षराची पुनरावृत्ती होऊन त्यातील नादामुळे जेव्हा त्याला सौंदर्य प्राप्त होते, तेव्हा अनुप्रास अलंकार होतो.
★ अनुप्रास अलंकार याची तुलना आपण शाहरुख खान यांच्याशी करूया, जेणे करून परीक्षेत विचारलेल्या चरणात एकाच अक्षराची पुनरावृत्ती होत असताना दिसली की, आपण डोळे झाकून अनुप्रास अलंकार हा पर्याय निवडतोल.
बाकी अलंकार अशाच मजेशीर स्वरूपात आपण पाहणार आहोत. अधिक माहिती साठी, तुम्ही माझे शॉर्टकट मराठी व्याकरण पुस्तक अभ्यासू शकता ज्यामध्ये सर्व घटक मजेशीर स्वरुपात समाविष्ट केलेले आहेत, पुस्तक बाजारात उपलब्ध आहे. आगामी पोलीस भरतीत आशा प्रकारे स्मार्ट पद्धतीने अभ्यास केलात तर, यश नक्कीच तुमच्या पायाशी लोटांगण घालेल यात काहीच शंका नाही…!