हरित क्रांतीचे जनक Pioneer of Green Revolution

हरित क्रांतीचे प्रणेते स्‍व. वसंतराव नाईक यांची जीवनयात्रा

1 जुलै 1913
:
यवतमाळ जिल्‍हातील पुसद तालुक्‍यातील गहुली येथे बंजारा जमातीच्‍या सधन शेतकरी कुटुंबात जन्‍म.
1933
:
नागपूर येथील नील सिटी हायस्‍कूलमधून मॅट्रिक परीक्षा उत्‍तीर्ण.
1937
:
मॉरिस कॉलेज, नागपूर (सध्‍याचे वसंतराव नाईक सामाजिक विज्ञान संस्‍था) येथून बी.ए. पदवी परीक्षा उत्‍तीर्ण.
1940
:
नागपूर विद्यापीठ विधी महाविद्यालयातून एल.एल.बी पदवी उत्‍तीर्ण.     
1941
:
प्रारंभी अमरावतीचे प्रख्‍यात वकील कै. बॅ. पंजाबराव देशमुख हयांच्‍या बरोबर व नंतर पुसद येथे स्‍वतंत्रपणे वकिली व्‍यवसायास प्रारंभ.
:
पुसद तालुक्‍यातील आदर्श ग्राम चळवळीत पुढाकार.
:
त्‍यांच्‍या प्रयत्‍नांमुळे व तळमळीमुळे त्‍यांचे स्‍वत:चे गाव गहुली हे
आदर्श गाव बनले.
6 जुलै 1941
:
प्रतिष्ठित ब्राम्‍हण घराण्‍यातील कु. वत्‍सला घाटे यांच्‍याशी विवाह केला. हा वि‍वाह आंतरजातीय असल्‍यामुळे त्‍यांच्‍या बंजारा समाजात मोठी खळबळ उडाली. काही दिवस त्‍यांना वाळीत देखील टाकण्‍यात आले.
1946
:
पुसद नगरपालिकेच अध्‍यक्ष म्‍हणून निवड. जुन्‍या मध्‍यप्रदेश राज्‍यात उपमंत्री म्‍हणून 1952 मध्‍ये नियुत्‍की होईपर्यत याच पदावर होते. हया अवधीत सुधारणाविषयक अनेक कामे केली.
1950
:
पुसद हरिजन मोफत वसतिगृहाचे व दिग्रस राष्‍ट्रीय मोफत छात्रालयाचे अध्‍यक्ष.
1951
:
विदर्भ प्रदेश कॉंग्रेस समितीचे व कार्यकारिणीचे सदस्‍य.
1952
:
पहिल्‍या सार्वत्रिक निवडणुकीत मध्‍यप्रदेश मंत्रिमंडळात महसूल खात्‍याचे उपमंत्री म्‍हणून नियुक्‍ती.
:
हयाच काळात मध्‍यप्रदेश गृहनिर्माण मंडळाचे अध्‍यक्षपद भूषविले.
:
मध्‍यप्रदेश भू-सुधार समितीचे उपाध्‍यक्ष व मध्‍यप्रदेश सरकारच्‍या मेट्रिक समितीचे अध्‍यक्ष होते.
1956
:
राज्‍य पुनर्रचनेनंतर जुन्‍या मुंबई राज्‍यात सहकार, कृषी, दुगधव्‍यवसाय या खात्‍यांचे मंत्री म्‍हणून नियुक्‍ती.
:
अखिल भारतीय कॉंग्रेसचे तसेच महाराष्‍ट्र विभागीय कॉंग्रेस समितीचे व तिच्‍या कार्यकारिणीचे तेव्‍हापासून सदस्‍य.
1957
:
सार्वत्रिक निवडणुकीत विधानसभेत पुसद मतदारसंघातून दुस-यांदा निवड झाली. महाराष्‍ट्र मंत्रिमंडळात कृषिमंत्री म्‍हणून नियुक्‍ती.
:
इंडिया कौन्सिल ऑफ अॅग्रिकल्‍चरल फायनान्‍स सोसायटीचे सभासद म्‍हणून निवड.
1958
:
जपानला गेलेल्‍या आंतरराष्‍ट्रीय राईस कमिशनच्‍या भारतीय शिष्‍टमंडळात समावेश व जपानला भेट, टो‍कीयो येथे एफ.ए.ओ.च्‍या बैठकांना हजर.
1959
:
पुसद येथे फुलसिंग नाईक कॉलेज ची स्‍थापना. चिनी सरकारच्‍या शेतकी संघटनेच्‍या निमंत्रणावरुन चीनला भेट.
1960
:
महाराष्‍ट्र राज्‍य स्‍थापनेनंतर राज्‍याच्‍या प‍हिल्‍या मंत्रिमंडळात महसूल मंत्री म्‍हणून नियुक्‍ती. हया वेळी शासनाने महत्‍वपूर्ण असा कमाल जमीन धारणा क्षेत्रासंबंधीचा कायदा संमत केला.
:
आपल्‍या मंत्रीपदाच्‍या कारकीर्दित त्‍यांनी लोकशाही विकेंद्रीकरण समितीचे अध्‍यक्ष म्‍हणूनही काम केले व महाराष्‍ट्रात पंचायती राज्‍याची मुहूर्तमेढ रोवली.
1962
:
सार्वत्रिक निवडणुकीत महाराष्‍ट्र विधानसभेवर यवतमाळ जिल्‍हातील पुसद मतदारसंघातून तिस-यांदा निवड होऊन पुन्‍हा महसूल मंत्री म्‍हणून नियुक्‍ती आणि मुख्‍यमंत्री होईपर्यत हेच खाते त्‍यांच्‍याकडे राहिले.
5 डिसेंबर 1963
:
महाराष्‍ट्राचे मुख्‍यमंत्री झाले.
1964
:
युगोस्‍लाव्हियाचा दौरा.
1965
:
1 मे 1965 रोजी आंतर भारती, मुंबई (इंडियन अॅकॅडमी ऑफ लेटर्स) संस्‍थेचे उद् घाटन.
:
भारत-पाक संघर्ष सुरु होताच 9 ते 11 सप्‍टेंबरला मुंबईत स्‍फूर्तिदायक व मार्गदर्शक भाषणे दिली. त्‍यामुळे महाराष्‍ट्रात चैतन्‍यदायी वातावरण निर्माण झाले. नंतर काही महिने युध्‍दसज्‍जतेसाठी महाराष्‍ट्राचा दौरा केला.
:
शेती उत्‍पादनाच्‍या नव्‍या कार्यक्रमाचा प्रचार करण्‍यासाठी महाराष्‍ट्रातील 25 जिल्‍हांचा दौरा.
1966 
:
अवर्षणामुळे भयंकर परिस्थिती निर्माण झाली होती. संकटात सापडलेलया शेतक-यांना हिंमत देण्‍यासाठी राज्‍यातील दुष्‍काळी जिल्‍हयांत झंझावती दौरा.
1967
:
सार्वत्रिक निवडणुकीच्‍या प्रभावी प्रचारासाठी महाराष्‍ट्रात दौरा. या निवडणुकीत महाराष्‍ट्र विधानसभेवर पुसद मतदारसंघातून चौथ्‍यांदा निवड होऊन 6 मार्च 1967 ला महाराष्‍ट्राच्‍या मुख्‍यमंत्री पदावर दुस-यांदा एकमताने निवड.
:
महाराष्‍ट्र-कर्नाटक सीमाप्रश्‍नाबाबत महाराष्‍ट्र विधानसभेत भाषण (17-11-1967)
1970 
:
अमेरिकी शासनाच्‍या निमंत्रणावरुन अमेरिकेचा दौरा व युरोपिय देशांना भेटी.
1972
:
सार्वत्रिक निवडणुकीच्‍या प्रचारासाठी महाराष्‍ट्रात दौरा. या सार्वत्रिक निवडणुकीतून पुसद मतदारसंघातून पाचव्‍यांदा निवड होऊन 14 मार्च 1972 ला महाराष्‍ट्राच्‍या मुख्‍यमंत्रीपदी तिस-यांदा निवड झाली.
:
महाराष्‍ट्रात गंभीर स्‍वरुपाचा दुष्‍कह पडला होता. राज्‍यातील नऊ जिल्‍हांतील दुष्‍काळ हा देशातील इतर कोणत्‍याही भागातील दुष्‍काळापेक्षा अधिक तीव्र स्‍वरुपाचा होता; प्रत्‍येक जिल्‍हयात फिरुन त्‍यांनी दुष्‍काळी कामाला जोराने चालना दिली.
20 फेब्रु 1975
:
महाराष्‍ट्राच्‍या मुख्‍यमंत्री पदाचा राजीनामा.
12 मार्च 1977
:
वाशिम लोकसभा मतदारसंघातून खासदार म्‍हणून निवड
18 ऑगस्‍ट 1979
:
सिंगापुर येथे 66 व्‍या वर्षी निधन
vasantrao%2Bnaik%2Bempsckida