महाराष्ट्रातील पंचायत राज महत्वाचे प्रश्न

आधूनिक महाराष्ट्राचे शिल्पकार वसंतराव नाईक यांच्या अथक , लोककल्याणकारी व पारदर्शक विचारकृतीमधुन जन्मास आलेले पंचायत राज……..सध्या संपूर्ण राज्यात चर्चेस आहे.

1. कोणत्या संस्थांना ‘लोकशाहीचा पाळणा’ म्हणून ओळखतात ?
> स्थानिक स्वराज्य संस्था

2.  राष्ट्रीय विस्तार कार्यक्रमाची (National Extension Programme) सुरुवात कधी झाली होती ?
> 2 ऑक्टोबर 1953

3. बलवंतराय मेहता समितीची केंद्र शासनाने नेमणूक कधी केली ?
> 16 जानेवारी 1957

4. बलवंतराय मेहता समितीच्या शिफारशीवर विचार करून त्यावर अहवाल सादर करण्यासाठी राज्य सरकारने कोणत्या समितीची नियुक्ती केली होती ?
> वसंतराव नाईक समिती

5. वसंतराव नाईक समिती कधी नेमली गेली होती ?
> 27 जून 1960

6.  वसंतराव नाईक त्याकाळी कोणत्या पदावर कार्यरत होते ?
> महसूल मंत्री

7.  वसंतराव नाईक समितीने एकूण किती शिफारसी केल्या होत्या ?
>226

8. वसंतराव नाईक समितीने कोणत्या स्तराला सर्वाधिक महत्त्व देण्याची शिफारस केली होती. त्याचा परिपाक म्हणून महाराष्ट्रातील पंचायतराज व्यवस्था वेगळ्या धाटणीची ठरली ?
> जिल्हा परिषद

9. पंचायत राज व्यवस्थेत एकूण किती स्तर आहेत ?
> तीन (ग्रामपंचायत-पंचायत समिती-जिल्हा परिषद)

10. महाराष्ट्रात पंचायत राजव्यवस्थेचा प्रारंभ कधी झाला ?
>  1  मे 1962

11. ‘महसुली खेड्या’ची व्याख्या कोणत्या कायद्यान्वये करण्यात आली आहे ?
> महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम,1966

12. महाराष्ट्रात ग्रामपंचायतींची सदस्य संख्या किती असते ?
> 7 ते 17

13.  ग्रामपंचायतींची सदस्य संख्या किती असावी हे राज्यशासनाच्या वतीने कोण ठरविते ?
>जिल्हाधिकारी

14. ग्रामपंचायतींचे आरक्षण ठरविण्याचा अधिकार कोणाला आहे  ?
> जिल्हाधिकारी

15. ग्रामपंचायतीचा कार्यकाळ किती असतो ?
> 5 वर्षे

16. ग्रामपंचायतीचा कार्यकाळ  कधी पासून मोजला जातो ?
> पहिल्या सभेपासून

17. ग्रामपंचायतीच्या पहिल्या बैठकीचे अध्यक्ष/पीठासन अधिकारी कोण असतात?
> तहसीलदार

18. सरपंच/उपसरपंच यांच्या निवडणूकीबाबतच्या वादावर अंतिम निर्णय कोण घेते ?
> विभागीय आयुक्त

19. उपसरपंच आणि इतर ग्रामपंचायत सदस्य आपला राजीनामा कोणाकडे देतात ?
> सरपंच

20. सरपंच आपला राजीनामा कोणाकडे देतात ?
>पंचायत समिती सभापती

21. पुरुष सरपंच/उप-सरपंच यांच्यावरील अविश्वास ठराव पारित होण्यासाठी किती बहुमताची आवश्यकता असते ?
> दोन तृतीयांश (2/3)

22. महिला सरपंच/उप-सरपंच यांच्यावरील अविश्वास ठराव पारित होण्यासाठी किती बहुमताची आवश्यकता असते ?
> तीन चतुर्थांश (3/4)

23. पंचायत समिती उप-सभापती आणि इतर पंचायत समिती  सदस्य आपला राजीनामा कोणाकडे देतात ?
> पंचायत समिती सभापती

24. पंचायत समिती सभापती आपला राजीनामा कोणाकडे देतात ?
> जिल्हा परिषद अध्यक्ष

25. जिल्हा परिषद सदस्य आपला राजीनामा कोणाकडे देतात ?
> संबंधित विषय समिती सभापती

26. जिल्हा परिषद उपाध्यक्ष आणि विषय समितींचे सभापती आपला राजीनामा कोणाकडे देतात ?
> जिल्हा परिषद अध्यक्ष

27. जिल्हा परिषद अध्यक्ष आपला राजीनामा कोणाकडे देतात ?
> विभागीय आयुक्त

28. कोण ग्रामपंचायतीचा सचिव असतो मात्र ग्रामपंचायतीचा नोकर नसतो ?
> ग्रामसेवक

29. ग्रामसेवक कोणाचा नोकर असतो ?
> जिल्हा परिषदेचा

30.  ग्रामसेवकाचे वेतन कशातून दिले जाते ?
> जिल्हा परिषदेच्या जिल्हानिधी तून

31. ग्रामीण भागात ‘बालविवाह प्रतिबंधक अधिकारी’ म्हणून कोण कार्य पाहतो ?
> ग्रामसेवक

32. ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्र कोठे आहेत ?
> शिंदेवाही (चंद्रपूर) आणि मांजरी (पुणे)

33. ग्रामपंचायतीचे कर निश्चित करण्याचा अधिकार कोणाला आहे ?
> राज्यशासनाला

34.  सरपंच समितीचा पदसिध्द सचिव म्हणून कोण काम पाहते ?
> विस्तार अधिकारी

35.  गटविकास  अधिकारी कोणत्या खात्याचा अधिकारी आहे  ?
> ग्रामविकास खाते

36. जिल्हा नियोजन मंडळाचे अध्यक्ष कोण असतात ?
> जिल्ह्याचे पालकमंत्री

37. जिल्हा नियोजन मंडळाचे सचिव कोण असतात ?
> जिल्हाधिकारी

38. जिल्हा परिषदेच्या एकूण किती समित्या असतात ?
> दहा (स्थायी+9 विषय समित्या)

39. जिल्हा परिषदेच्या  समित्या  कोणत्या आहेत ?
> स्थायी, कृषी,समाजकल्याण, शिक्षण, बांधकाम, वित्त, आरोग्य, पशुसंवर्धन व दुग्धविकास, महिला व बालकल्याण, जलसंधारणपेयजल पुरवठा

40. जिल्हा परिषदेच्या स्थायी समितेचे पदसिध्द अध्यक्ष  कोण असतात ?
> जिल्हा परिषद अध्यक्ष

41.महाराष्ट्र पंचायत राजचे जनक कोण आहे.?
> वसंतराव नाईक