रॉकीज पर्वत:
ही रांग उत्तर अमेरिकेच्या पश्चिम भागातून आलास्का पासून दक्षिणेकडे पसरलेली आहे. ४८३० किमी लांबीची एवढी रांग आहे. रॉकीज पर्वतातील माउंट मॉकिल्ये (६१९४ मीटर) हे सर्वात उंचीचे शिखर आहे. या पर्वतीय भागात कोलेरॅडोचे पठार आहे. कोलेरॅडो या नदीने जगातील सर्वात मोठी घळई ग्रँड कॅन्यॉन निर्माण केली आहे.
अपालीचेन पर्वत :
ही पर्वतश्रेणी उत्तर अमेरिके च्या पूर्वेकडे अटलांटिक महा सागराला समांतर अशी जाते. माउंट मिटचेल हे येथील सर्वात मोठे शिखर आहे. या पर्वतश्रेणीत लोखंडाचे साठे मोठय़ा प्रमाणात आढळतात.
मिसीसीपी मिसुरी :
ही नदी जवळजवळ अमेरिकेतील २५ राज्यांतून जाते. या नदीने बर्डफूट डेल्टा तयार केला आहे.
सेंट लॉरेन्स नदी :
जगप्रसिद्ध नायगरा धबधबा या नदीवर आहे. उत्तर अमेरिकेतील अंतर्गत जलवाहतुकी साठी ही महत्त्वाची नदी आहे.
कोलंबिया नदी :
ही अमेरिकेतील सर्वात लांब नदी असून, ही नदी पॅसिफिक समुद्रापर्यंत जाते.
ग्रॅड कोली हे महत्त्वपूर्ण धरण या नदीवर आहे.
रीओ ग्रँडी नदी ही नदी अमेरिका व मेक्सिको यांची सीमा तयार करते.
हवामान :
हिवाळ्यात उत्तरेस जानेवारी महिन्यात – २८ अंश इतके तापमाण असते तर नर्ऋत्ये कडे अॅरिझोना वाळवंटी प्रदेशात तापमान जास्त व पाऊस अतिशय कमी अशी परिस्थिती असते. संयुक्त संस्थांच्या पूर्व किनाऱ्याकडे वाहणाऱ्या गल्फ उष्ण प्रवाहामुळे येथील तापमान उष्ण असते. तर पश्चिम किनाऱ्या वरील कॅलिफोíनया थंड सागरी प्रवाहामुळे येथील तापमान पूर्व किनाऱ्यापेक्षा कमी असते.
वनस्पती :
हवामानातील फरकामुळे या खंडातील उत्तरेकडील व दक्षिणेकडील वनस्पतीमध्ये विविधता आढळून येते. या खंडाच्या उत्तर भागात प्रामुख्याने अलास्का या भागात शेवाळ नेचे इ. टुंड्रा प्रदेशीय वनस्पती आढळून येतात. याच्या दक्षिणेला सूचीपर्णी अरण्य आहेत. जेथे पाईन, स्प्रुस, फर, इ. वनस्पती आढळतात. मध्यवती मदान गवताळ प्रदेश म्हणून प्रसिद्ध आहे. त्यालाच प्रेअरी प्रदेश म्हणतात. तर दक्षिणेकडे वाळवंटी प्रदेशात काटेरी झुडपे आढळतात.
उत्तर अमेरिकेची खनिज संपत्ती :
- खनिज तेल, दगडी कोळसा या उत्पादना बाबत उत्तर अमेरिका हा जगातील अग्रेसर खंड आहे. जगातील एकूण िझक उत्पादनापकी ३५ % उत्पादन उत्तर अमेरिकेत होते.
- चांदीच्या उत्पादना साठी मेक्सिको हा प्रमुख देश आहे.
- जगातील एकूण उत्पादना पकी ५० % उत्पादन एकटय़ा अमेरिकेत होते.
- गहू हे या भागातील प्रमुख पीक असल्याने या भागाला गव्हाचे कोठार म्हणतात.
- न्यूफाउंड लँडजवळ उष्ण पाण्याचा व शीत पाण्याचा प्रवाह एकत्र आल्याने या ठिकाणी माशांच्या वाढीसाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झालेली आहे. म्हणून या ठिकाणातील ग्रँड बँक हा मासेमारी साठी जगप्रसिद्ध प्रदेश तयार झालेला आहे.
महत्त्वाचे मुद्दे :
- अमेरिकेतील सर्वात लहान राज्य – ऱ्होड आयर्लंड
- अमेरिकेतील सर्वात जास्त लोकसंख्येचे राज्य – कॅलिफोíनया
- अमेरिकेतील सर्वात लांब नदी – मिसीसीपी मिसुरी
- अमेरिका व मेक्सिको यांच्या दरम्यान सीमारेषा तयार करणारी नदी – रीयो ग्रँड
- संगणक क्षेत्रातील मायक्रो सॉफ्टचे ऑफिस – सियाटेल
- भूमध्य सागरी हवामान – कॅलिफोíनया
- जगातील सर्वात जास्त तेलाची आयात करणारा देश -अमेरिका
- एकूण वीज निर्मितीत सर्वात जास्त जलविद्युत निर्मितीचा वाटा असणारा देश – कॅनडा
- अमेरिकेतील सर्वात उष्ण व सर्वात शुष्क ठिकाण – डेथ व्हॅली (Death Valley)
- कॅनडामध्ये सर्वात मोठे शहर – टोरँटो
- कॅनडा हा पेपर उद्योगासाठी प्रसिद्ध आहे.
- वॉिशग्टन डीसी हे पोटोमॅक या नदीकिनारी आहे.
- प्रसिद्ध वूव्हर धरण हे कोलोरॅडो या नदीवर आहे.
- पीटस्बर्ग याला लोखंड व स्टील उद्योगाची जगाची राजधानी म्हणतात.
- अमेरिकेतील सर्वात खोल ठिकाण – डेथ व्हॅली
- सॅन फ्रॉन्सिस्को या शहराला सिटी ऑफ गोल्डन गेट असे म्हणतात.
- कापूस उत्पादनासाटी टेक्सास हा प्रांत प्रसिद्ध आहे.
- हवाई या द्वीपसमूहाची राजधानी होनूलूलू ही आहे
- न्यूयॉर्क हे शहर हडसन नदीवर आहे. तसेच शिकागो हे शहर शिकागो नदीवर आहे.