- दशमान पध्दतीमध्ये 0 ते 9 अशा अंकांच्या 10 खुणा आहेत. 9 नंतर येणा-या 10 या संख्येत 1 या अंकाची स्थानिक किंमत 10 आहे असे मानले जाते.
-
त्यामुळे 10 या संख्येचे वाचन “एक दशक” असे करणे अधिक योग्य ठरेल. मात्र आपण व्यवहारात या संख्येचे वाचन “दहा” असेच करतो.
-
याप्रमाणेच 10 च्या पुढील संख्यांचे वाचन करता येईल –
-
11 = एक दशक, एक एकक
-
12 = एक दशक, दोन एकक
-
35 = तीन दशक, पाच एकक
-
97 = नउ दशक, सात एकक
-
-
मात्र व्यवहारात 1 ते 100 या संख्यांसाठी वेगवेगळी नावे आहेत. उदा. 11 = अकरा, 12 = बारा, 35 = पस्तीस, 97 = सत्याण्णव.
-
ही व्यावहारिक नावे म्हणत असतानाच या संख्यांची किंमत दर्शविणारी नावेही लक्षात ठेवावित.
संख्यावाचन 1 ते 1000
-
99 ही दोन अंकी सर्वात मोठी संख्या आहे.
-
99 = 9 दशक, 9 एकक.
-
यानंतरची संख्या 100. यात 1 या अंकाची स्थानिक किंमत 100 किंवा “1 शतक” एवढी आहे.
-
शतकी संख्यांचे वाचन करताना शतकस्थानच्या अंकापुढे “शे” जोडून दशक-एकक स्थानच्या अंकांनी मिळून बनलेली संख्या त्यापुढे वाचतात.
-
उदा.शतकदशकएककसंख्येचे वाचन321तीनशे एकवीस592पाचशे ब्याण्णव902नउशे दोन
संख्यावाचन 1 ते 100000
-
999 ही तीन अंकी सर्वात मोठी संख्या आहे.
-
999 = 9 शतक, 9 दशक, 9 एकक.
-
यानंतरची संख्या 1000. यात 1 या अंकाची स्थानिक किंमत “एक हजार” एवढी आहे.
-
9999 ही चार अंकी सर्वात मोठी संख्या आहे.
-
9999 = 9 हजार, 9 शतक, 9 दशक, 9 एकक.
-
यानंतरची संख्या 10000. यात 1 या अंकाची स्थानिक किंमत “दहा हजार” एवढी असते.
-
संख्यांचे वाचन करताना “दहा हजार” व “हजार” या स्थानांवरील संख्यांचे एकत्रित वाचन केले जाते.
-
उदा.
दहा हजारहजारशतकदशकएककसंख्येचे वाचन24532चोवीस हजार पाचशे बत्तीस9002नउ हजार दोन35012पस्तीस हजार बारा -
9002 = 9 हजार, 0 शतक, 0 दशक, 2 एकक. यामध्ये शतक व दशक स्थानचा अंक 0 असल्याने त्याचे वाचन होत नाही. मात्र मनामध्ये ही संख्या वाचताना नउ हजार, शून्यशे, शून्य-दोन अशी वाचणे फायद्याचे ठरेल.
संख्यावाचन 1 ते 10000000
-
99,999 ही पाचअंकी सर्वात मोठी संख्या आहे.
-
99,999 = 9 दहा हजार, 9 हजार, 9 शतक, 9 दशक, 9 एकक.
-
यानंतरची संख्या 1,00,000. यात 1 या अंकाची स्थानिक किंमत “एक लाख” एवढी असते.
-
9,99,999 ही सहा अंकी सर्वात मोठी संख्या आहे.
-
9,99,999 = 9 लाख, 9 दहा हजार, 9 हजार, 9 शतक, 9 दशक, 9 एकक.
-
यानंतरची संख्या 10,00,000 असते. यात 1 या अंकाची स्थानिक किंमत “दहा लाख” एवढी असते.
-
संख्यांचे वाचन करताना “दहा लाख” व “लाख” या स्थानांवरील अंकांचे वाचन एकत्र केले जाते.
-
उदा.
दहा लाखलाखदहा हजारहजारशतकदशकएककसंख्येचे वाचन2142927एकवीस लाख, बेचाळीस हजार, नउशे सत्तावीस9200025ब्याण्णव लाख पंचवीस7401002चौ-यात्तर लाख एक हजार दोन -
9200025 – ़
92000259200 025 -
यानंतर मनात वाचन करताना ही संख्या ब्याण्णव लाख, शून्य-शून्य हजार, शून्यशे पंचवीस अशी वाचावी. प्रत्यक्ष वाचन करताना शून्य किंमत असणा-या स्थानांचे वाचन करु नये