परीक्षेचे विषय – मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बुद्धिमापन, आणि अंकगणित.
दर्जा – माध्यमिक शालान्त परीक्षा
माध्यम – इंग्रजीसाठी इंग्रजी व इतर विषयासाठी मराठी
एकूण प्रश्नसंख्या २००
एकूण गुण – ४००
कालावधी – दोन तास
प्रश्नपत्रिकेचे स्वरूप – वस्तुनिष्ठ बहुपर्यायी
अभ्यासक्रम :
मराठी – व्याकरण, सोपी वाक्यरचना, आणि नेहमीच्या शब्दाचा वापर.
इंग्रजी – व्याकरण, सोपी वाक्यरचना, आणि नेहमीच्या शब्दाचा वापर
सामान्य ज्ञान – दैनंदिन घटना, नेहमीचे अनुभव, धर्म साहित्य, राजकारण, शास्त्र, सामाजिक व औद्योगिक सुधारणा, क्रीडा या क्षेत्रातील महान व्यक्तीची कार्ये, सर्वसाधारणपणे भारताच्या विशेषतः महाराष्ट्राच्या इतिहासाची व भूगोलाची रूपरेषा यावरील प्रश्न.
बुद्धिमापन विषयक प्रश्न – उमेदवार किती लवकर व अचूकपणे विचार करू शकतो हे अजमावण्यासाठी प्रश्न.
अंकगणित – बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, दशांश अपूर्णांक व टक्केवारी.