कोकण किनारपट्टी
महाराष्ट्र पच्छिम भागात दक्षिणोत्तर पसरलेली लांब व चिंचोळी किनारपट्टी कोकण आहे. तर पश्चिमेस अरबी पसरलेला आहे. सह्यान्द्री पर्वत व अरबी समुद्र यांच्या दरम्यान असलेल्या या लांबट चिंचोळ्या सखल भागाला कोकण असे म्हणतात.
कोकणची निर्मिती
महाराष्ट्रच्या पश्चिमेला व अरबी समुद्राला लागून असलेल्या प्रस्तरभंग होऊन कोकण किनारपट्टी तयार झाली. तसेच मुंबई जवळील जलमग्न अरण्याचा प्रदेश असे दर्शवतो की किनारपट्टीवर समुद्राची पातळी उंचावली गेली असावी. म्हणजेच किनाऱ्याचे निमज्जन (खचणे) झालेले आहे. ज्वालामुखी क्रियेचे अवषेस गरम पाण्याच्या रूपाने आढळतात. उदा वज्रेश्वरी येथील गरम पाण्याचे झरे. कोकण किनारपट्टीची दक्षिणोत्तर लांबी सुमारे ७२० कि मी उत्तरेस डहाणूपासून वेगुर्ल्यापर्यंत उत्तरेस दमणगंगा नदीपासून दक्षिणेस तेरेखोल नदीपर्यंत त्याचा विस्तार आहे.सरासरी रुंदी ३० ते ६० कि मी आहे. उत्तरेस काही भागात किनारपट्टी ९० ते ९५ कि मी रुंद आहे. कोकणचे भोगोलिक क्षेत्रफळ सुमारे ३०३९४ चौ.कि.मी आहे.
कोकणची प्राकृतिक रचना
कोकणचा सर्वच भाग हा म्हणजे एक सलग भाग मैदान नाही. हा डोंगरदऱ्यानी व्यापलेला परंतु कमी उंचीचा सखल भाग आहे. किनाऱ्यापासून पूर्वेकडे सह्यांद्रीच्या पायथ्यापर्यंत ही उंची सुमारे२५० मीटरपर्यंत वाढते.प्रदेशाचा सर्वसाधारण उतार पूर्व पश्चिम दिशेने आहे. पश्चिमेस अरबी समुद्राच्या सखल भागाला खलाटी असे म्हणतात. समुद्र सपाटीपासून उंची फार कमी आहे. खलाटीच्या पूर्वेस जो डोंगराळ भाग आहे. त्याला (वलाटी) असे म्हणतात. या प्रदेशाची उंची २७५ ते ३०० मीटरपर्यंत आहे.
खाडी
भरतीचे पाणी नदीच्या मुखात जेपर्यंत आत शिरते तेवढ्या नदीच्या भागाला खाडी असे म्हणतात. मुंबईच्या उत्तरेस दातिवरे व वसईची खाडी आहे. तर वसईच्या दक्षिणेस जयगडपर्यत धरमतर, राजकोट, बाणकोट, दाभोळ व जयगडच्या खाड्या आहेत. दक्षिणेस विजयदुर्गची खाडी कार्लीची खाडी व कोकणच्या दक्षिण सरहद्दीजवळ तेरेखोलची खाडी आहे. कोकणची किनारपट्टी रिया प्रकारची आहे. किनार्यावरील खडकात मालवण व हरणे दरम्यान गुहा आढळतात.
सागरी किल्ले – वसईचा किल्ला, जंजीरा, सुवर्णदुर्ग, विजयदुर्ग, आणि सिंधुदुर्ग हे समुद्री किल्ले आहेत.
बंदरे – महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर मुंबई हे एक नैसर्गिक बंदर आहे. मुंबई हे आंतरराष्ट्रीय महत्त्वाचे बंदर आहे. मुंबई ताण कमी करण्याच्या दृष्टीने न्हावाशेवा हे अत्याधुनिक बंदर आहेत.
सहयाद्री पर्वत किंवा पश्चिम घाट
भारताच्या पश्चिम किनारपट्टीस सहयांद्री समांतर पर्वत आहे. हा पर्वत दख्खनच्या पठाराची सरहद निच्छित करतो. उत्तरेस सातमाळा डोंगरापासून दक्षिणेस कन्याकुमारीपासून सह्यांद्री पसरलेला आहे. त्यांची लांबी सुमारे १६०० कि मी आहे. यापैकी महाराष्ट्रात ४४० कि मी लांबीचा पर्वत आहे. यास पश्चिम घाट या नावानेही संबोधले जाते. त्याच सरासरी उंची ९१५ ते १२२० मीटर आहे.
महाराष्ट्रामध्ये सह्यान्द्रीची उंची उत्तरेकडे वाढत जाते. तर दक्षिणेकडे कमी होत जाते.काही ठिकाणी १००० मी पर्यत आहे. पश्चिमेस एकदम तीव्र आहे. पूर्वेकडून पहिल्यास पठारावर सह्यांद्रीच्या उतार इतका मंद आहे. कि ते एक डोंगराची रांग आहे. वैतरणा व सावित्री नद्याच्या उगमाच्या क्षेत्राजवळ सह्यांद्री कंकणाकृती झालेला आहे. सह्यान्द्री पर्वत रंगामुळे अरबी समुद्रास मिळणाऱ्या पश्चिमवाहिनी नद्यांच्या आणि बंगालच्या उपसागरात मिळणाऱ्या पूर्ववाहिनी नद्यांचे जलविभाग वेगवेगळे झालेले आहेत. सह्यांद्रीच्या घाटमाथ्यची उंची निरनिराळी आहे आणि प्रत्येक ठिकाणी ती जलविभाजक आहेच नाही.
सह्यान्द्री पर्वताच्या डोंगररांगा किंवा डोंगराळ प्रदेश
सह्यांद्री पर्वताच्या मोठ्या डोंगररांगा सह्यान्द्रीपासून सर्वसाधारणपणे पूर्वेकडे जातात. तापी पूर्णाच्या दक्षिणेस रांगा पसरलेल्या आहेत. स्थानिक आधारतल रेषेच्या वर डोंगराची उंची २०० ते ३०० मी दरम्यान आहे. बऱ्याच ठिकाणी डोंगरास तीव्र कडे आहेत. शंभूदेव डोंगररांग सह्यांद्रीच्या पर्वतापासून रायरेश्वरापासून शिंगणापूर पर्यंत पसरलेल्या रांगेलाशंभूदेव डोंगररांग म्हणतात. या डोंगररांगा सातारा सांगली जिल्ह्यातून पुढे कर्नाटकात जातात. भीमा नद्याच्या खोऱ्यात दक्षिणेस शंभू महादेव रांग आहे. यामुळे भीमा व कृष्णा या नद्यांची खोरे वेगवेगळी झालेली आहेत. महाराष्ट्र पठारावरील सर्वात मोठी शंभूदेव डोंगररांग आहे. उदा. वाईजवळील पाचगणी व महाबळेश्वर (टेबल लैड) असे म्हणतात.
हरिश्चंद्र-बालाघाट