महत्वाची सूत्रे
- पहिली संख्या * दुसरी संख्या = ल. सा. वि. * म. सा.वि
- पहिली संख्या = मसावि * लसावि / दुसरी संख्या
- दुसरी संख्या = मसावी * लसावि / पहिली संख्या
- मसावि = पहिली संख्या * दुसरी संख्या / लसावि
- लसावि = पहिली संख्या * दुसरी संख्या / मसावि
- लसावी / मसावी = असामायिक अवयवांचा गुणाकार
- मोठी संख्या = मसावि * मोठा असामायिक अवयव
- लहान संख्या = मसावि * लहान असमायिक अवयव
सोडवलेली उदाहरणे :
प्रश्न १ : दोन संख्यांचा मसावि १५ व लसावि २२५ आहे , एक संख्या ७५ असल्यास दुसरी संख्या काढा?
उत्तर :
सूत्र : पहिली संख्या * दुसरी संख्या = ल. सा. वि. * म. सा.वि
दुसरी संख्या = मसावी * लसावि / पहिली संख्या
दुसरी संख्या = १५ * २२५ / ७५
= ४५
प्रश्न २ : दोन संख्यांचा मसावी ३ व लसावि १०५ आहे तर , त्यापैकी लहान संख्या काढा?
- १५
- २१
- २५
- १८
उत्तर :
सूत्र १ : लसावी / मसावी = असामायिक अवयवांचा गुणाकार
१०५ / ३ = असामायिक अवयवांचा गुणाकार
३५ = असामायिक अवयवांचा गुणाकार
७ * ५ = असामायिक अवयवांचा गुणाकार
सूत्र २ : लहान संख्या = मसावि * लहान असमायिक अवयव
लहान संख्या = ३ * ५ = १५
सूत्र ३ :मोठी संख्या = मसावि * मोठा असामायिक अवयव
मोठी संख्या = ३ * ७ = ३५
MPSC English Grammar Free Mock Test -1
https://www.mpsckida.in/2020/05/mpsc-english-grammar-mock-test-1.html
मराठी व्याकरण आॅनलाईन Free Mock Test -1
https://www.mpsckida.in/2020/05/marathi-Vyakran-mock-test-1.html
मराठी व्याकरण आॅनलाईन Mock Test -2 मोफत सोडवा
https://www.mpsckida.in/2020/05/mpsc-marathi-mock-test-2.html
MPSC Combine Sarav Paper Mock Test -1
https://www.mpsckida.in/2020/05/mpsc-combine-sarav-paper-1.html