प्राचीन व पौराणिक समुद्रास मागे हटण्याचा आदेश देणारी पौराणिक कथा चितारणारे चित्र पौराणिक कथेनुसार कोकण प्रदेशाची निर्मिती श्री विष्णुचा सहावा अवतार असलेल्या श्री परशूरामाने केली. परशूरामाने एकवीस वेळा पृथ्वी नि:क्षत्र केल्यावर, त्याने जिंकलेली सर्व भूमी ऋषी कश्यपांना दान केली. स्वत: परशूराम दक्षिण पर्वतांवर निघुन गेले व तेथे त्यांनी शूर्पारक देशाची निर्मीती सागरा पासुन केली असा उल्लेख महाभारताच्या शांतिपर्वात आढळतो. पौराणिक कथेनुसार परशूरामाने स्वत:च्या वास्तव्यासाठी नवीन भूमी तयार करण्याचा निश्चय केला आणि त्या प्रमाणे सिंधु सागराला (अरबी सुमद्राला) मागे हटण्याचा आदेश दिला. सागराने परशूरामाच्या बाणाच्या टप्प्या पर्यंत मागे हटण्याचे मान्य केले. त्याप्रमाणे परशूरामाने सह्याद्री वरून शरसंधान केले व कोकणची भूमी निर्माण केली. त्या नंतर परशूराम सध्या उत्तर कर्नाटकात असलेल्या गोकर्ण क्षेत्री वास्तव्य करू लागले. कोकणस्थ ब्राम्हणांची निर्मीती देखिल परशूरामाने केली अशी पौराणिक कथा प्रसिद्ध आहे. पण गोमंतकातील (गोव्यातील) गौड सारस्वत व केरळ मधील नंबूथिरी ब्राम्हणांच्या उगमा संदर्भात देखिल याच प्रकारच्या परशूराम कथेवर आधारित आख्यायिका आहेत. कोकणात अनेक ठिकाणी या आख्यायिकेला अनुरूप असे पुरावे सापडतात. रत्नागिरी जिल्ह्यात चिपळूण जवळ लोटे परशूराम हे प्रसिद्ध परशूराम क्षेत्र व प्राचीन मंदिर आहे. गोव्यात पैगिनिम (इंग्रजी:Painguinim) या गावी एक प्राचीन परशूराम मंदिर आहे.
- उत्तरेकडील दमणगंगेच्या खो-यातून दक्षिणेकडे तेरेखोल खाडीपर्यंतचा ७२० कि.मी. लांबीचा प्रदेश म्हणजे कोकण किनारा होय. याची सरासरी रूंदी ४० ते ८० कि.मी. आहे.
- अरबी समुद्रालगतच्या सखल भागास म्हणतात – खलाटी
- कोकणातील डोंगराळ व उंच भाग – वलाटी
- कोकण किना-यावर आसणारी एकूण बंदरे – ४९
- रायगड जिल्यात त्यार करण्यात आलेले अत्याधुनिक बंदरे – जवाहरलाल नेहरु (न्हावाशेवा) सहाय्य – कॅनडा
- कोकण किना-यावर सर्वाधिक किनापट्टी लाभलेला जिल्हा (२४०कि.मी.) रायगड असून मासेमारीत आघाडीवर जिल्हा – रायगड
- महाराष्ट्राच्या मत्स्योत्पादनापैकी खा-या पाण्यातील मासे – मुंबई
- राज्यातील पहिले मत्स्यालय – तारपोरवाला (मुंबई)
- राज्यातील नवे प्रस्तावित मत्स्यालय – वार्सोवा
- कोकण किना-याजवळील तेल क्षेत्रे – बॉम्बे हाय व वसई हाय
- कोकणातील नैसर्गिक वायुवर आधारीत औष्णिक विद्युत प्रकल्प – उरण (रायगड)
- कोकण किना-यावरील बेटे – मुंबई, साष्टी, खंदेरी-उंदेरी, धारापूरी व अंजदिव
- दक्षिण कोकणाचे भूस्वरुप – सडा
- कोकण किना-यावरील प्रमुख नद्या – वसई, धरमतर, महाड, चिपळूण, दाभोळ, जयगड, राजापूर व विजयदुर्ग, दातीवरा मनोरी, मालाज, माहिम, पनेवेल, बालकोट