पोलिस प्रशासन बद्दल माहिती
ई-चालान प्रणाली सुरू करण्यात आलेले महाराष्ट्रातील पहिला जिल्हा – नागपुर ग्रामीण पोलीस.
ई-चालान प्रणाली म्हणजे वाहतुकीचे नियम मोडणार्यांना देण्यात येणारे कागदी चालान ऐवजी ई-चालान प्रणालीचा माध्यमातून पावती देण्यात येईल.
भारतात ई-चालान प्रणाली सर्वप्रथम कर्नाटक येथे बंगळुरू पोलिसांनी सुरू केली होती.
नाशिक विभाग सीआयडी पोलीस अधिक्षक – प्रदिप देशपांडे
पोलिस भरतीसाठी अगोदर लेखी परिक्षा द्यावी लागेल. नवीन Gr काय आहे, नक्की वाचा…!
महाराष्ट्रातील पहिले सीसीटीव्ही शहर बनले आहे – पुणे
महाराष्ट्र शासनाने नक्षलवाद विरोधी अभियानचे मुख्य केंद्र नागपूर येथे उभारले आहे.
भारतात सर्वाधिक महिला पोलीस संख्या असणारे राज्य – महाराष्ट्र – 10.5 टक्के
देशात सर्वाधिक एकूण राज्याच्या पोलीसामध्ये महिला पोलिसांची टक्केवारी सर्वाधिक असणारे राज्य – तमिळनाडू – 12.4 टक्के.
लॉक नसलेले लॉकअप असणारे महाराष्ट्रातील एकमेव पोलीस स्टेशन – शनी शिंगणापूर ता. नेवासा, जि. अहमदनगर.
शनी शिंगणापूर हे गाव चोरी न होणारे, दरवाजे नसणारे गाव म्हणून ओळखले जाते.
नक्षलवाद विरोधी अभियान चे विशेष पोलीस महानिरीक्षक – श्री. राजवर्धन
मुंबई/मुंबई शहर/बृहन मुंबई चे नवे पोलीस आयुक्त बनले – अहमद जावेद (8 सप्टें. 2015 पासुन) (यांच्यापूर्वी राकेश मारीया होते.)
अहमद जावेद हे मुंबईचे 39 वे पोलीस आयुक्त बनले.
गृहरक्षक दलाचे नवे पोलीस महासंचालक बनले – राकेश मारीया. (8 सप्टें. 2015 पासुन) (यांच्या पूर्वी अहमद जावेद होते.)
महाराष्ट्रात सीआयडी/राज्य गुन्हे अन्वेशन विभागाचे औरंगाबाद, पुणे, नागपुर व अमरावती हे चार विभाग आहेत.
केंद्रीय गृह मंत्रालयाचे सुरक्षा सल्लागार – के विजयकुमार
केंद्रीय पोलीस संशोधन आणि विकास संस्थेचे महासंचालक – एन.आर. वासन
सरदार वल्लभभाई पटेल नॅशनल पोलीस अकॅडमी – हैद्राबाद येथे आहे.
सीसीटीएनएस/क्राईम अँड क्रिमिनल ट्रॅकिंग नेटवर्क अँड सिस्टीम चे महराष्ट्रातील सर्व 1041 पोलीस स्टेशन आणि 638 वरिष्ठ पोलीस अधिकारी कार्यालये जोडण्याचा शुभारंभ 15 सप्टेंबर 2015 रोजी नागपुर येथे करण्यात आला.
या प्रकल्पांतर्गत 1998 पासुन चा सर्व गुन्हेगारांचा लेखाजोखा ऑनलाईन उपलब्ध आहे.
ऑनलाईन पोलीस स्टेशन एसएसटीएनएस यंत्रणेच्या माध्यमातून करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे.
राज्याचे कायदा आणि सुव्यवस्था विशेष पोलीस महानिरीक्षक – प्रभात कुमार
कॉम्रेड गोविंद पानसरे हत्येप्रकरणी चौकशी करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या विशेष तपास पथकाचे/एसआयटी चे प्रमुख आहेत- संजय कुमार
महाराष्ट्रचे नवे पोलीस महासंचालक बनले – प्रवीण दिक्षित (30 सप्टेंबर 2015 पासुन) (यांच्यापूर्वी संजीव दयाळ हे होते.)
पोलीस महासंचालकांनी आपली पहिली भेट/दौरा गडचिरोली जिल्ह्याचा केला.
पोलीस महासंचालक हे महाराष्ट्र पोलीस दलाचे सर्वोच्च अधिकारी असतात.
लाचलूचपत प्रतिबंधक विभाग/एसीबी महाराष्ट्र महासंचालक बनले – विजय कांबळे (30 सप्टेंबर 2015 पासुन) (यांच्यापूर्वी प्रवीण दिक्षित होते.)
गृहरक्षक दल, महासमादेशक – संजय पांडे
अप्पर पोलीस महासंचालक व कारागृह महानिरीक्षक – भूषणकुमार उपाध्याय
बिनतारी संदेश विभाग पोलीस महासंचालक – एस. जनन्नाथ
सांगली जिल्ह्यात असणारे पोलीस प्रशिक्षण केंद्र – तुरची, ता.तासगाव, जि. सांगली.
अतिरीक्त पोलीस महासंचालक पोलीस प्रशिक्षण व खास पथके – डॉ.के. व्यंकटेशन
नक्षलविरोधी अभियानाचे पोलीस महानिरीशक – दिपांशू काबरा.
दिल्लीचे पोलीस यंत्रणा केंद्र सरकारच्या नियंत्रणाखाली आहे.
21 ऑक्टोबर हा दिवस भारतात पोलीस स्मृती दिन म्हणून पाळला जातो.
21 ऑक्टोबर 1959 रोजी जम्मू काश्मिरमधील लड्डाख भागात भारत व चीन सीमेवर चीनी सैनिकांच्या हल्ल्यात 10 केंद्रीय राखीव पोलीस दलाचे जवान शहीद झाले होते. त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ हा दिवस साजरा केला जातो.
भारत बटालियन, औरंगाबाद समादेशक – निस्सार तांबोळी.
मुदखेड जि. नांदेड येथे केंद्रीय राखीव पोलीस प्रशिक्षण केंद्र आहे.
महाराष्ट्राच्या पोलीस लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने 23 ते 31 ऑक्टोबर 2015 दरम्यान दक्षता जनजागृती सप्ताह साजरा केला होता.
महाराष्ट्रात असणारे एकूण तुरुंग – 53 (9 मध्यवर्ती तुरुंग, 29 जिल्हा तुरुंग, 11 खुले तुरुंग)
औरंगाबाद, येरवडा-पुणे , मुंबई, ठाणे, नागपूर, अमरावती, तळोजा- नवी मुंबई, कोल्हापूर हे प्रमुख नऊ मध्यवर्ती तुरुंग/जेल महाराष्ट्रात आहेत.
औरंगाबाद विभाग लाचलूचपत प्रतिबंधक विभाग पोलीस अधिक्षक – डॉ. डी.एस. स्वामी.
एटिस/अॅन्टी टेररिझम स्कॉडचे नवे प्रमुख – विवेक फणसाळकर
नियोजन व समन्वय विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक – राजेंद्र सिंह
विशेष पोलीस महानिरीक्षक पुणे राज्य राखीव पोलीसदल – सुरेश मेखला
विशेष पोलीस महानिरीक्षक पुणे सीआयडी – रितेशकुमार