पृथ्वीच्या अंतररंगाबद्दल माहिती

पृथ्वीच्या आंतरंगाचे तीन भाग महत्वाचे मानले जातात.

    1. भूकवच

 

    1. प्रावरण

 

  1. गाभा
  • भूकवच व त्यालगतचा प्रावरणाचा भाग यांस शिलावरण असे म्हणतात.  शिलावरणाची जाडी सुमारे १०० सेमी आहे.
  • भूकवचाची जाडी सर्वत्र सारखी आढळत नाही.(सरासरी जाडी ३० सेमी.)
  • भूकवचाच्या वरच्या भागाला सियाल असे म्हणतात. या खडकांमध्ये प्रामुख्याने सिलिका व अल्युमिनिअमचे प्रमाण आढळते.
  • सियालच्या खालील थरास सायमा असे म्हणतात. बहुतांश सागरतळ या थराने बनलेला आहे. या थरातील खडक सिलिका व मेग्नेशिम च्या संयुगाने बनलेले आहे. यास सिमा म्हणतात.
  • भूकवचाच्या खालील प्रावरणाच्या थराची जाडी २८७० किमी आहे. प्रावरण लोह व मॅग्नेशियमच्या संयुगाने तयार झालेले आहे. प्रावरणालाच मध्यावरण असे म्हणतात. पृथ्वीचा ८०% भाग प्रावरणाने व्यापला आहे.
  • प्रवरणाच्या खाली गाभा असून त्याची जाडी ३४७१ किमी आहे. या थराचे बाह्यगाभा वअंतर्गाभा असे दोन भाग पडतात. बाह्य गाभा द्रवरूप तर अंतर्गाभा घनरूप आहे. अंतर्गाभ्यामध्ये निकेल व लोहखनिजाचे प्रमाण जास्त आढळत असल्यामुळे यास NIFE असे म्हणतात. पृथ्वीचा १९% भाग गाभ्याने व्यापला आहे. पृथ्वीच्या एकूण वस्तुमानापैकी एक तृतीयांश वस्तुमान गाभ्याने व्यापले आहे.
  • भूकवचाला पृष्ठावरण हे सुद्धा नाव आहे.
  • १९६० मध्ये हेरीहेसने पृथ्वीच्या अंतरंगासंदर्भात सिद्धांत मांडण्याचा प्रयत्न केला.
  • १९६५ मध्ये ह्युजो विल्सनने सिद्धांत मांडला. त्यास प्लेटविवर्तनिकी सिद्धांत असे म्हणतात.
यानुसार एकूण ६ मोठ्या प्लेट्स व १४ छोट्या प्लेट्स आहेत.  ‘अस्थेनोस्फीअरस’ या द्रव्यावर्ती या प्लेट्स तरंगत आहेत. या प्लेट सरासरी एका वर्षाला १० सेमी सरकत असतात.
    • अमेरिकन प्लेट

 

    • पॅसिफिक प्लेट

 

    • युरेशिअन प्लेट

 

    • आफ्रिका प्लेट

 

    • इंडो-ऑस्ट्रेलिया प्लेट

 

  • अटलांटिक प्लेट
  • २०० दशलक्ष वर्षापूर्वी सर्व प्लेट्स एकत्रित होत्या. त्याला त्यांनी ‘पँजिया’ हे नाव दिले होते. त्याच्या बाजूला असणाऱ्या समुद्राला ‘पॅन्थालस’ हे नाव देण्यात आले होते.
  • १८० दशलक्ष वर्षापूर्वी पँजियाचे विभाजन झाले. उत्तरेकडे अंगारालैंड व दक्षिणेकडे गोंडवानालैंड असे दोन भूभाग झाले. दोघामधील दरीला ‘टेथिस दरी’ असे नाव देण्यात आले.
  • भारत हा त्यावेळी दक्षिण गोलार्धात होता. दरवर्षी भारतीय भूमी उत्तरेकडे १० सेमी सरकत आहे.
  • याचमुळे १२० दशलक्ष वर्षापूर्वी बृहदहिमालयाची निर्मिती झाली. २५ ते ४५ दशलक्ष वर्षापूर्वी मध्य हिमालयाची निर्मिती झाली. २ ते १२ दशलक्ष वर्षापूर्वी शिवालिक टेकड्यांची निर्मिती झाली.
  • पृथ्वीचे तापमान दर ३० मी खोलीला १°C ने वाढते.

 

Earth image mpsckida

पृथ्वीचे अंतर रंग भूकंपलहरींची माहिती

प्राथमिक लहरी

  • अनुतरंग लहरी, अपकर्षण लहरी, अनुप्रस्थ लहरी, P-Waves
  • दिशा आडव्या दिशेतून
  • सर्वाधिक वेग ८ ते १४ किमी/सेकंद
  • सर्वात कमी विध्वंसक
  • घन व द्रव्य माध्यमातून प्रवास करतात
  • प्राथमिक लहरी ध्वनी लहरी प्रमाणे सम्पीडन लहरी असून, कणाचे कंपन संचलन दिशेने होते.

दुय्यम लहरी

  • अवतरंग, अनुलंब, S-Waves
  • उभ्या दिशेने प्रवास करतात
  • याचा वेग ४ ते ८ किमी/सेकंद
  • फक्त घन माध्यमातून प्रवास करतात
  • या लहरी प्राथमिक लहरीपेक्षा जास्त विध्वंसक परतू भूपृष्ठ लहरीपेक्षा कमी विध्वंसक असतात.

भूपृष्ठ लहरी

  • पृष्ठ तरंग, रेखावृत्तीय लहरी, L-Waves
  • या पृथ्वीच्या पृष्ठभागावरून सागराच्या लहरीप्रमाणे प्रवास करतात.
  • भूपृष्ठापासून अधिक खोलीतून प्रवास करत नाहीत.
  • आरपार जात नाही तर पृथ्वी गोलाला फेरी मारतात.
  • याचा आयाम उच्च असतो.
  • भूपृष्ठ लहरीचे दोन प्रकार पडतात. १.लेरे २.लव्ह

शिलावरण

  • पृथ्वीच्या सर्वात वरचा भाग.
  • शिलावरणाची जाडी सुमारे १६ ते ४० किमी आहे.
  • याचा २९% भाग जमिनीने तर ७१% भाग जलाने व्याप्त आहे.
  • पृथ्वीच्या एकूण घनफळापैकी १% घनफळ शिलावरणाचे आहे.
  • याचे दोन भाग पडतात सियाल व सायमा
  • सियाल व सायमा यांच्यात कोनराड प्रकारची विलगता आहे.

सियाल

  • भूकवचाच्या वरील भागाला सियाल असे म्हणतात.
  • या खडकामध्ये प्रामुख्याने सिलिका व अलुमिनिअम चे प्रमाण आढळते.
  • सियाल मध्ये ग्रेनाइट प्रकारचा खडक असतो.
  • सियाल पासून भूमी खंडे बनतात.
  • या थरात भूकंपाच्या प्राथमिक लहरी दर सेकंदाला ५.६ किमी तर दुय्यम लहरी दर सेकंदाला ३.२ किमी पेक्षा कमी वेगाने प्रवास करतात.

सायमा

  • सियालच्या खालील थरास सायमा म्हणतात.
  • बहुतांश सागरथळ या थराने बनलेला आहे.
  • या थरातील खडक सिलिका व मेग्नेशिअमच्या संयुगाने बनलेले असते.  यांस सीमासुद्धा म्हणतात.
  • याच्यात बेसाल्ट व गाब्रो प्रकारचे खडक आढळतात.
  • भूकंपाच्या दुय्यम लहरीचा वेग – ३.२ किमी/सेकंद ते ४ किमी/सेकंद
  • सायमा थरावर सियाल तरंगत आहे.
  • सायमापासून महासागराची निर्मिती झाली आहे.

मोहविलगता

  • शिलावरण व प्रावरण यांच्या दरम्यान मोहविलगता आहे. मोहविलगतेचा शोध मोहविन्सेस या शास्त्रज्ञाने १९०९ मध्ये लावला.

प्रावरण

  • ४२ ते २९०० किमी पर्यंत प्रावरणाचा भाग आहे.
  • प्रावरणाच्या थराची जाडी सुमारे २८६० किमी आहे.
  • शिलावरण आणि गाभा यांच्या दरम्यान प्रावरण आहे.
  • प्रावरणामध्ये १०० ते २०० किमी अंतरावर एक ‘मंदगामी शंकूचा’ पट्टा आहे.
  • प्रावरणामध्येच भूकंप आणि ज्वालामुखीचे केंद्र असतात.
  • प्रावरण लोह व मॅग्नेशियम च्या संयुगाने तयार झालेले आहे.
  • प्रावरण यालाच मध्यावरण असेही म्हणतात.
  • पृथ्वीचा ८०% भाग प्रावरणाने व्यापला आहे.
  • प्रावरणाचे दोन भाग पडतात. १.बाह्य प्रावरण २.आंतर प्रावरण
  • बाह्य प्रावरण आणि आंतर प्रावरण यांच्यात रेपट्टी विलगता आहे.

बाह्य प्रावरण

  • बाह्य प्रावरणात ओलीवील ६० ते ७०% असते.
  • बाह्य प्रावरणात पायरोक्सीन १५ ते २०% असते.
  • बाह्य प्रावरणाची खोली ४२ ते ७०० किमी आहे.

आंतर प्रावरण

  • आंतर प्रावरणाची खोली ७०० ते २९०० किमी आहे.
  • या ठिकाणी सिलिका व विविध ऑक्साइडे सापडतात.
  • आंतर प्रावरणाचा खालचा भाग द्रायू स्वरुपात आढळतो.
  • प्रावरण आणि गाभा यांच्या दरम्यान गटेनबर्ग विलगता आहे.

गाभा

  • प्रावरणाच्या खाली गाभा असून याची जाडी ३४७१ किमी आहे.
  • गाभ्याची खोली २९०० ते ६३७१ किमी
  • या थराचे बाह्यगाभा व अंतर्गाभा असे दोन भाग पडतात.
  • बाह्यगाभा द्रवरूप तर अंतर्गाभा घनरूप आहे.
  • अंतर्गाभ्यामध्ये निकेल व लोह (फेरस) चे प्रमाण अधिक आढळत असल्याने यास निफे असेही म्हणतात. पृथ्वीचा १९% भाग गाभ्याने व्यापला आहे.
  • पृथ्वीच्या एकूण वस्तुमानापैकी एक तृतीयांश वस्तुमान गाभ्याने व्यापले आहे.
  • गाभ्याचे दोन भाग पडतात. १.बाह्यगाभा २.आंतरगाभा
  • बाह्यगाभा आणि आंतरगाभा यांच्यात लेहमन विलगता आहे.

बाह्यगाभा

  • बाह्यगाभ्याची खोली २९०० ते ५१५० किमी
  • बाह्यगाभा हा द्रवस्वरुपात आहे.
  • बाह्यगाभ्यातून भूकंपाच्या दुय्यम लहरी प्रवास करू शकत नसल्याने हा भाग द्रव स्वरुपात आहे असे सांगितले जाते.

आंतर गाभा

  • खोली ५१५० ते ६३७१ किमी
  • हा गाभा घन स्वरूपाचा आहे, कारण यातून भूकंपाच्या प्राथमिक लहरी प्रवास करतात.
  • चुंबकत्व, लवचिकपणा आणि लिबलिबीतपणा हे वैशिष्ट्यपूर्ण असे गुणधर्म या आंतरगाभ्याचे आहेत.
  • निकेल आणि फेरस मोठ्या प्रमाणात सापडतात. ८०% निफे आणि २०% इतर ऑक्साइडे.
  • घनता १३.३ ते १३.६ ग्राम/घसेमी
  • तापमान २५०००°C