आज कोणतीही परीक्षा घ्या. त्यामध्ये चालू घडामोडी हा अतीशय महत्त्वाचा घटक ठरला आहे. ‘चालू घडामोडी’ शिवाय कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी होत नाही अशी परिस्थिती गेल्या काही वर्षामध्ये निर्माण झालेली आहे व त्यामुळेच ‘चालू घडामोडी’ या घटकाला स्पर्धा परीक्षेची तयारी करताना अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालेले आहे. स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासक्रमातील इतर घटकांची तयारी करताना ज्या अडचणी येतात त्यापेक्षा अधिक अडचणी ‘चालू घडामोडी’ या घटकाची तयारी करताना येत असते. कारण इतर घटकाचे अभ्यासक्रम साहित्य तयार असते आणि थोडेसे प्रयत्न केल्यास विविध स्तरावरील पाठ्य पुस्तकांमधून ही माहिती उपलब्ध होऊ शकते. पण ‘चालू घडामोडी’ घटकांची पाठ्य पुस्तके तयार नसल्यास आणि असली तरी ती काही मर्यादेपर्यन्त विद्यार्थ्यांच गरज भागवू शकतात. या मर्यादापलीकडे विद्यार्थ्याला स्वतःलाच स्वतःची तयारी करावी लागते. त्याकरीता अशा विषयांना वाहिलेली नियतकालीके, मासिके, साप्ताहीक आणि दै. वृत्तपत्रे यावरच सर्वस्वी अवलंबून राहावे लागते. वृत्तपत्रे आणि नियतकालीकांचे वाचन करीत असताना सर्वसाधारणपणे महत्त्वाच्या राजकीय घटना या घटकांशी जोडलेल्या व्यक्ती यांना महत्त्व प्राप्त होते.
आता पोलीस भरतीमध्ये जास्तीत जास्त चालू घडामोडीचे प्रश्न विचारण्याच पद्धत चालू केल्यामुळे अचूकतेला अतिशय महत्त्व प्राप्त झाले आहे. त्या दृष्टीकोनातून विचार केल्यास अंकगणिताबरोबर ‘चालू घडामोडी’ या घटकाला अनन्यासाधारण महत्व प्राप्त झाले आहे. सध्या ‘चालू घडामोडी’ घटकांवरील प्रश्न विचारण्याची पद्धत वारंवार बदलत आहे. हे नुकत्याच झालेल्या विविध स्पर्धा परीक्षेवरून लक्षात आले आहे. त्यामुळे ‘चालू घडामोडी’ घटकाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
पोलीस भरतीमध्ये आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय तसेच प्रादेशिक चालू घडामोडी व सामान्यज्ञान या घटकावर 12 ते 15 प्रश्न असतात, त्याप्रमाणे इतर स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडीवर प्रश्न विचारले जातात. यामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रातील चालू घडामोडी विचारल्या जातात. त्यातून विद्यार्थ्यांचे सामाजिक, आंतराराष्ट्रीय, राष्ट्रीय प्रश्नाविषयी त्याचे मत, त्याची विचार शक्ती पडताळून पाहतात. मित्रांनो हे गुण तुम्ही सहज मिळवू शकाल. परंतु अनेक विद्यार्थी यातच मागे पडतात अन बाकी कट ऑफ गुणापर्यन्त मजल मारू शकत नाही. चालू घडामोडी या विषयाचा जास्तीत जास्त गुण मिळविण्यासाठी मदत होईल. जेव्हा इतर विषय वाचून कंटाळा आलेला असतो तेव्हा चालू घडामोडी हा विषय वाचायचा, त्यासाठी दररोज वर्तमान पत्र वाचन, वर्तमानपत्रातील वेचक भागांची कटींग करणे, बातम्या पाहणे, ठराविक मासिके वाचने साप्ताहिक वाचणे उपयुक्त ठरेल.
चालू घडामोडीवरील प्रश्न बहुतांशी गेल्या एक-दोन वर्षात विविध क्षेत्रात घडलेल्या घटनांवर आधारित विचारले जातात. यात पुढील मुद्यावर भर दिला जातो.
चालू घडामोडी व सामान्य ज्ञानाचा अभ्यासक्रम-
राजकीय व संरक्षण क्षेत्रातील राष्ट्रीय चालू घडामोडी – विविध आयोग आणि अध्यक्ष, लोकसभा निवडणुका, विविध घटना दुरूरस्त्या व त्याचे विषय, राष्ट्रीय पातळीवर सुरू असलेल्या विविध चळवळी व त्याचा उद्देश, विविध राजकीय पक्ष व त्याचे संस्थापक अध्यक्ष, घोटाळे, विविध, आंदोलने (उदा.नर्मदा बचाव, चिपको आंदोलन, भारत छोडो इत्यादी) भारताची विविध क्षेपणास्त्रे, महत्त्वाची विधेयक अधिनियम, वादग्रस्त कायदे.
आर्थिक व औद्योगिक क्षेत्रातील चालू घडामोडी – औद्योगीक संस्था, उद्योग, प्रकल्प, सार्वजनिक उपक्रम, परकीय गुंतवणूक विविध आयोगाच्या स्थापणेचे दिवस, बँकेचे स्थापणेचे दिवस, पिक बीमा योजना.
सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील चालू घडामोडी – राष्ट्रीय स्तरावरील चळवळी, दृर्घटना, नैसर्गिक आपत्ती, आंतरराष्ट्रीय दिनविशेष, जातीय दंगली, धार्मिक आंदोलने, राष्ट्रीय साक्षरता मोहीम, विद्यपीठाचे कुलगुरू व कुलपती, शिक्षणमंत्री इत्यादी.
सांस्कृतिक क्षेत्रातील चालू घडामोडी – वेगवेगळ्या राज्यातील नृत्यप्रकार, विविध चित्रपट महोत्सवात सहभागी चित्रपट, महत्त्चाच्या पुस्तकाचे लेखक, संगीत क्षेत्रातील कलाकार ई घडामोडी.
क्रिडा क्षेत्रातील चालू घडोमोडी – क्र्रिकेटपटूच्या कारकिर्दीचा क्रम, खेळाशी संबंधीत चषक व ट्रॉफी, क्रिडा प्रकारविषयी माहिती खेळाडूविषयी माहिती, क्रिडा स्पर्धा इत्यादी.
प्रसिद्ध व्यक्ती, स्थळे, परिषदा व त्यांची वैशिष्ट्ये – विविध क्षेत्रातील प्रसिद्ध व्यक्ती व त्यांचे कार्य, महत्त्वाची स्थळे, सौंदर्य स्पर्धेचे ठिकाण, प्रसिद्ध स्थळाचे महत्त्व इत्यादी.
पुरस्कार व पारितोषीके – राष्ट्रीय पातळीवरील पुरस्कार (भारतरत्न, पद्मविभूषन, दादासाहेब फाळके, क्रिडा पुरस्कार, राजीव गांधी सद्भावना पुरस्कार) प्रादेशिक पुरस्कार, (महाराष्ट्र भूषन, शाहू महाराज, जनस्थान पुरस्कार, व्ही शांताराम पुरस्कार) आंतरराष्ट्रीय पुरस्कार (नोबेल, बुकर, रॅमन मॅगसेेसे) शौर्य पुरस्कार (परमवीर चक्र, वीरचक्र).
नेमणूका – भूदलप्रमुख, साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, जागतीक संघटनेचे प्रमुख व महासचिव, विविध देशाचे राष्ट्राध्यक्ष व पंतप्रधान, विविध राजकीय संघटना व त्यांचे प्रमुख व महासचिव, विविध देशाचे राष्ट्राध्यक्ष व पंतप्रधान, विविध राजकीय संघटना व त्यांचे प्रमुख, नियोजन व निवडणुक आयुक्त, राज्य व संघ लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष, अनुसूचित जाती व जमाती महामंडळ व प्रादेशिक पातळी वरील संस्थाचे पदाधिकारी इत्यादी.
सामान्यज्ञान चालू घडामोडी – महत्त्वाचे दिवस (पर्यावरण दिवस, शिक्षक दिन, एड्स दिन, ग्राहक दिन, साक्षरता दिन) सर्वात जास्त सुर्यप्रकाशाचा दिवस, सर्वात मोठे सर्वात लहान, पहिल्या महिला, मानवनिर्मित उपग्रह इत्यादी.