प्रत्येक परीक्षेला एक अभ्यासक्रम असतो.त्याचप्रमाणे आपण या लेखात काही परीक्षांचा अभ्यासक्रम दिला आहे.तो प्रथम पहावा.त्यांनतर आपल्याला त्यातील किती भाग परिचयाचा आहे हे माहित होते.आपल्याला किती मेहनत घ्यावी हे समजते.काही वेळेस आपले काही विषय आवडते असल्याने त्याचा आपला चांगला अभ्यास झालेला असतो परंतु काही विषय अवघड वाटत असल्याने आपल दुर्लक्ष झालेले असते.येथे मात्र आपल्याला प्रत्येक विषयात पारंगत असणे गरजेचे असते.आपल्या कमकुवत बाजू हेरून त्यावर जास्तीत जास्त वेळ देऊन ते विषय ही मजबूत केले तरच आपण या स्पर्धेत चांगल्या प्रकारे तोंड देऊ शकतो.तर नवीन सुरवात करताना खलील प्रकारे सामोरे जावा.
❇ प्रथम अभ्यासक्रम पहा.
❇ आतापर्यंत कशाप्रकारे प्रश्न आलेत त्याचे विश्लेषण करा.यामध्ये प्रश्न कशाप्रकारे विचारण्यात येतात?त्याची कठिण्यपातळी किती आहे?प्रश्न कोणत्या विषयाचे आहेत?प्रश्न कोणत्या source मधून विचारले गेले आहेत? उदा.शालेय पुस्तक,ncert पुस्तक,referance पुस्तक,वर्तमानपत्र,शासनाची आणि इतर मासिके,शासनाची संकेतस्थळे इत्यादी. प्रश्न का यावेळी विचारला गेला असेल? उदा.एखाद्या विषयाला 25 वर्ष झाली असतील तर त्या संदर्भात प्रश्न विचारला असू शकतो. अशाप्रकारे विश्लेषण करा
❇ त्यानंतर त्या विषयासाठी कोणतेही सर्व अभ्यासक्रम कव्हर केले असलेले एक refrance पुस्तक घ्या.
❇ प्रत्येक विषयाला किती दिवस देता येतील या प्रमाणे नियोजन करा.शेवटी परिक्षेगोदर उजळणी साठी वेगळे दिवस बाजूला ठेवा (साधारणतः 20 ते 30 दिवस)
❇ ज्या विषयाचा अभ्यास करणार आहात तोच विषय अभ्यासाला घ्या आपण जेवढे दिवस नियोजनाला दिले आहेत तेवढे दिवस त्या विषयाला द्यावा.अभ्यास करताना जर तुम्हाला कंटाळा आला तर मग तुम्ही चालू घडामोडी चा अभ्यास करा.अथवा गणित बुद्धिमत्ता चा पण अभ्यास करू शकतो.एकच विषय केल्याने चांगली लिंक लागते.
❇ आता एक-एक टॉपिक घेऊन त्यावर आलेले प्रश्न पहा.आता असे टॉपिकनुसार मागील प्रश्नपत्रिकेचे विश्लेषण करणारे पुस्तके उपलब्ध आहेत.त्यानंतर त्या टॉपिक चे शालेय पुस्तकातील टॉपिक वाचा.नंतर रेफेरन्स पुस्तकातून तो टॉपिक वाचा.येथे फक्त वाचणे हे अपेक्षित नाही तर ते आत्मसात होणे आवश्यक आहे.त्यानंतर त्या टॉपिक वर काही चालू घडामोडी विषयक बाब असेल तर चालू घडामोडी मासिक अथवा पुस्तकातून ते आपल्या नोट्स मध्ये नोंदवा.नोट्स काढलेल्या कधीही उत्तम.परंतु नोट्स या खूप जास्त मोठ्या नसाव्यात नाहीतर परिक्षेगोदर उजळणी करताना कोणतेही दडपण येऊ नये.
❇ अभ्यास करताना मनातल्या मनात प्रश्न तयार करण्याची सवय लावा.त्यामुळे आपली एकाग्रता वाढते.आणि परीक्षेत काही गोंधळून टाकणारे प्रश्नांना सामोरे जाता येते.प्रत्येक topic नंतर प्रश्न सोङवा कारण हि objective प्रकाराची परीक्षा आहे.जेवढे जास्तीतजास्त प्रश्न सोडवाल तेवढा तुमचा confidence वाढेल.मला एवढे एवढे मार्क मिळायलाच हवेत तर च मी पास होईल हा विचार काढून टाका.cut off किती लागेल याचा विचार अत्ताच नका करू.चांगला performance कसा देता येईल याचा विचार करा.
❇ आपण जो टॉपिक केला आहे त्यावर त्याच दिवशी revision करा.त्यामुळे तो टॉपिक चांगला होतो.
❇ आणि जर तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही आणखी एखाद referance पुस्तक वाचायला घेऊ शकता.अथवा एखादा टॉपिक चांगल्या प्रकारे दुसऱ्या पुस्तकात दिला असेल तर तुम्ही जरूर त्यातून तो पूर्ण करा.
❇ अभ्यास करताना मनाची एकाग्रता चांगली असणे गरजेचे आहे .त्यामुळे अभ्यास करताना तुमचे मन विचलीत करणाऱ्या गोष्टीपासून दूर राहा.उदा-सोशल मीडिया,ज्या विषयाची चर्चा कधीच संपणार नाहीत अशा विषयावर चर्चा,कोणत्याही सामाजिक अथवा राजकीय संघटनेचे सदस्य होणे.
❇ study करताना तुमचे मन हे free असने गरजेचे आहे,त्यामुळे इतर problm निपटून अभ्यासाला लागा.अभ्यास एक burden म्हणून नका करू.जर असे असेल तर तुम्ही प्रशासनात पण काम करताना burden म्हणून काम कराल. नुकताच महेंदसिंह धोनी चित्रपट आला त्यामध्ये बिहार विरुध पंजाब match मध्ये बिहार ने 357 रन केले.match च्या तिसऱ्या दिवसाच्या आदल्या रात्री बिहार चे खेळाडू युवराज सिंह ला पाहतात आणि कसला भारी प्लेअर आहे म्हणतात.धोनीच्या मते आम्ही match त्याच क्षणी हरलो.आणि युवराजने 358 रन केले.त्याचप्रमाणे जर हा अभ्यास burden वाटत असेल,खूप अवघड वाटत असेल अथवा खूप मोठा वाटत असेल तर तुम्ही लढाई तेथेच हरली असणार.
❇ अभ्यासाबरोबर मनाची स्थिरता पण असने गरजेचे आहे त्यासाठी दररोज meditation, jogging,exercise करायला हवा.आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्वतःशी संवाद साधायला हवा.जेणेकरून आपल्याला प्रगती करता येईल.लक्षात ठेवा स्पर्धा परीक्षामध्ये खरी स्पर्धा तुमची स्वतःशीच आहे.शक्यतो study दिवसा करा आणि रात्र जागरण टाळा.अवघड विषय जर तुम्ही दिवसा हातळले तर सोपे होऊन जातील.कधीही तुमचा आत्मविश्वास ढळू देऊ नका ( स्पर्धा परिक्षा ही तुमच्या आत्मविश्वासाची परिक्षा आहे )