अर्थसंकल्प तयार करण्याची प्रक्रिया ही अत्यंत क्लिष्ट, जबाबदारीचे तसेच जोखमीचे काम आहे. त्यामुळे हे काम करणारे सर्वजण रात्र आणि दिवस एक करून अर्थसंकल्प तयार करतात. या अर्थसंकल्पाची सुरूवात ही एका सोहळ्याने होते. हलवा सोहळा असे या सोहळ्याचे नाव आहे. हा सोहळा वर्षानुवर्षापासून सुरू आहे.
✔ सर्क्युलरने होतो अर्थसंकल्पाचा श्रीगणेशा
प्रत्येक अर्थसंकल्पाची तयार ही सप्टेंबरपासून सुरू होते. म्हणजेच याची सुरूवात सर्क्युलरच्या माध्यमातून होते. देशातील सर्वात महत्वाच्या आणि सर्वच विभागात सरकारकडून एक सर्क्युलर पाठविण्यात येते. ज्यात त्या-त्या विभागाला आगामी वर्षभराच्या खर्चाची माहिती, त्यांच्या वर्षभरातील नव्या योजनांची आणि त्यावर होणाऱ्या खर्चाची इतंभूत माहिती देणे आवश्यक असते. प्रत्येक विभागातून देण्यात येणाऱ्या ही माहिती अर्थसंकल्पाच्या निर्मीतीत अत्यंत महत्वाचे मानले जाते. यानंतर कोणत्या वस्तूवर किती कर आकारला जायचा याविषयी स्टेकहोल्डर्स रायसीना हिल्सवर येवून याविषयी चर्चा करतात.
✔ अर्थसंकल्प म्हणजे काय ?
बजेट शब्दाची सुरूवात ही फ्रेंच बॉजेट शब्दापासून झाली. याचा अर्थ चामड्याची पिशवी असा आहे. केंद्रीय अर्थमंत्र्यांकडून वर्षभराच्या खर्चाचा हिशेब संसदेत मांडण्यात येतो त्यालाच अर्थसंकल्प म्हटले जाते. यात सर्व बॅंकेच्या खात्यांची माहिती, मंजूर करण्यात येणाऱ्या योजना तसेच 1 एप्रिलपासून पुढच्या वर्षीच्या मार्चपर्यंतच्या सर्वच आर्थिक गोष्टींचा लेखाजोखा या अर्थसंकल्पात सादर करण्यात येत असतो. तसेच यात सरकारकडून नवीन योजनांची माहिती देण्यात येते आणि त्याच्यावर संसदेतून अप्रत्यक्षपणे मंजूरीदेखील मिळावी हा याचा हेतु असतो. अर्थसंकल्पाच्या माध्यमातून अर्थमंत्री टॅक्स, ड्युटीज आणि व्याज आकारत सरकारी तिजोरीत रक्कम आणण्याचा प्रयत्न करत असतात.
✔ राजकीय आणि विरोधी पक्षांमध्ये समतोल
अर्थसंकल्पाच्या निर्मीतीमध्ये हा टप्पा अत्यंत महत्वाचा मानला जातो. कारण यामुळेच आगामी वर्षभरात देशात घडामोडी घडत असतात. त्यामुळे अर्थमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली हितचिंतकांची एक बैठक घेण्यात येते. या बैठकीत सरकार आणि त्यांच्या मित्रपक्षांना अपेक्षित असणारे सर्व बदल बैठकीनंतर करण्यात येत असतात.
✔ अर्थसंकल्पावर अधिकाऱ्यांची करडी नजर
जेव्हा अर्थसंकल्पासाठी आवश्यक असणारी सर्व माहिती गोळा केली जाते त्यानंतर पुढे सगळ्यात महत्वाचा टप्पा म्हणजे टाईपिंग आणि प्रिटींगचा. या टप्प्यावर सर्वच उच्च पदस्थ अधिकाऱ्यांची करडी नजर असते. यातम उच्च पदस्थ अधिकारी, प्रिंटींग टेक्निशियन आणि स्टेनोग्राफर एक प्रकारे शेवटचे सात दिवस तर कैद असल्याप्रमाणेच काम करत असतात. त्यांना त्यांच्या कुटुंबियांशीदेखील बोलण्याची परवानगी नसते. जर एखाद्या अधिकाऱ्याच्या कुटुंबात आपत्कालिन परिस्थिती आलीच तर त्यांना केवळ संदेशाच्या माध्यमातून माहिती देण्याची परवानगी असते. परंतू, संबंधित अधिकाऱ्याला त्याच्या कुटुंबियाशी बोलण्याचा अधिकार नसतो. काटेकोरपणे गोपनियता पाळली जाते. संयुक्त सचिवांच्या अध्यक्षतेखालील इंटेलिजन्स ब्युरोचे अधिकारी अर्थसंकल्प तयार करणाऱ्या टीमवर आणि त्यांच्या फोन कॉल्सवर बारिक नजर ठेवतात. खास करून स्टेनोग्राफरवर जास्त पाळत ठेवली जाते. अर्थसंकल्पाची कोणतीही माहिती बाहेर जाऊ नये यासाठी त्यांचे संगणक नॅशनल इन्फॉर्मेशन सेटरच्या सर्व्हरपासून वेगळे ठेवले जातात. एवढेच नाही तर नॉर्थ ब्लॉकमध्ये एक पावरफुल मोबाईल जॅमर लावण्यात येते जेणेकरून कोणत्याही अधिकाऱ्याकडून इथली माहिती बाहेर पडता कामा नये.
✔ संसदेत अथसंकल्पाचे सादरीकरण
दरम्यान, यासर्व प्रक्रियेनंतर संसदेत अर्थसंकल्पाचे केंद्रीय अर्थमंत्री फेब्रवारीच्या शेवटच्या आठवड्यात सादरीकरण करतात. तसेच संसदेत अर्थसंकल्प सादर करण्यापुर्वी राष्ट्रपतींच्या मंजूरी घेणेही बंधनकारक असते. तसेच संसदेत सादर करण्याच्या अगोदर युनियन कॅबिनेटच्या समोर अर्थसंकल्प सादर करण्यात येते. दरम्यान,सकाळी 11 वाजता अर्थसंकल्पाचे अर्थमंत्री वाचन करतात. दोन सत्रात अर्थसंकल्प सादर करण्यात येते. पहिल्या सत्रात सामान्य आर्थिक सर्वे आणि योजनांची माहिती देण्यात येते तर दुसऱ्या सत्रात आगामी वर्षातील प्रत्यक्ष आणि प्रस्तावीत योजनांची माहिती देण्यात येते. दरम्यान, यानंतर संसदेत सादर झालेल्या अर्थसंकल्पावर सविस्तर चर्चा होते. साधारण ही चर्चा अर्थसंकल्प सादर झाल्यापासून पुढे चार दिवस चालते. या चर्चेनंतर संसदेचे अध्यक्ष संसदेत सरकारकडून सादर करण्यात आलेल्या अनुदानवर मतदान घेते आणि त्यांनतर विनीयोग विधेयक मंजूर करण्यासाठी मतदान होते. या मतदानानंतर 75 दिवसांच्या आत हे विधेयक मंजुरीसाठी राष्ट्रपतिकडे पाठविण्यात येते.त्यानंतर राष्ट्रपतींच्या मंजूरीनंतरच अर्थसंकल्पाची प्रक्रिया पुर्ण होते.
✔ प्रिटींगची प्रक्रिया-अधिकाऱ्यांचा अचानक दौरा
केंद्रीय अर्थमंत्र्यांचे संसदेतील अर्थसंकल्पाचे भाषण हे सर्वात गोपनिय कागदपत्रे असतात. त्यामुळे याची छपाई अर्थसंकल्पाच्या दोन दिवस अगोदर मध्यरात्रीच करण्यात येते. दरम्यान, ज्याठिकाणी या भाषणाची तयारी करण्यात येते त्या स्टेनोग्राफरच्या विभागात अर्थमंत्र्यासह इंटेलिजन्स ब्युरोचे अधिकारी कधीही भेट देवू शकतात त्यामुळे याठिकाणची सुरक्षितता ही देशातील सर्वोच्च मानली जाते. पुर्वी अर्थसंकल्पाची छपाई ही राष्ट्रपती भवनातून होत होती मात्र 1950 मध्ये अर्थसंकल्प संसदेत सादर होण्याच्या अगोदर लिक झाल्यानंतर इथून होणारी छपाई थांबविण्यात आली. त्यानंतर मिंट रोडच्या एका ठिकाणी याची छपाई करण्यात येत होती. मात्र 1980 पासून ते आजपर्यंत अर्थसंकल्पाची छपाई ही नॉर्थ ब्लॉकच्या बेसमेंटमध्ये करण्यात येत आहे.
✔ त्यानंतरच अधिकाऱ्यांची सुट्टी
अर्थसंकल्पाच्या कागदपत्रांची निर्मीती ही नॉर्थ ब्लॉकमध्ये करण्यात येते. अर्थसंकल्प सादर करणाऱ्या अधिकाऱ्यांना नॉर्थ ब्लॉकमध्ये पुर्णपणे वेगळे ठेवण्यात येते. त्यांना जोपर्यंत अर्थमंत्री संसदेत अर्थसंकल्प सादर करत नाहीत तोपर्यंत सुट्टी देण्यात येत नाही ज्यावेळी अर्थसकंल्पाचे संसदेत वाचन पुर्ण होते त्याचवेळी या अधिकाऱ्यांना त्यांच्या घरी जाण्याची परवानगी देण्यात येते.
✔ बजेट संबंधी काही महत्वाच्या गोष्टी
- भारतीय राज्यघटनेत बजेट नावाचा शब्द नाही. कलम ११२ नुसार सरकार ‘Annual Financial Statement’ सादर करतं ज्यालाच बजेट म्हटलं जातं.
- बजेट हे काही मोजक्या अधिकारी आणि नोकरवर्ग यांच्याकडून तयार केलं जातं.
बजेट तयार करण्यासाठी वापरण्यात येणारी कॉम्प्युटर्स सर्व networks पासून तोडली जातात.
- अर्थ खात्याच्या तळघरात असलेल्या छापखान्यात बजेट ची छपाई केली जाते.
- बजेट तयार करणाऱ्या आणि छापणाऱ्या सर्व स्टाफ ची राहण्याची सोय अर्थ मंत्रालयाच्या नॉर्थ ब्लॉक मध्ये केली जाते.
- बजेट संसदेत सादर केल्यानंतरच या स्टाफला घरी जाण्याची परवानगी दिली जाते.
- या सर्व स्टाफ च्या हालचालींवर आणि फोने कॉल्स वर आयबी कडून बारीक नजर ठेवली जाते. आणि त्यांना देण्यात येणाऱ्या खाण्याची तपासणी केली जाते.
- बजेट सीक्रेट ठेवण्यासाठी पत्रकारांना अर्थ मंत्रालयात येण्यास मनाई केली जाते.