-
पृथ्वीवर एकूण ९२ मूलद्रव्ये आढळतात. अणुक्रमांक आणि अणुभार यांच्या चढत्या क्रमाने त्यांची
-
मांडणी केल्यास त्यांचा क्रम हैड्रोजन (अणु क्रमांक १) ते युरेनियम (९२) असा लागतो.
-
यांतील एकूण ३३ मूलद्रव्ये माणसाच्या शरीरात आढळतात. एकूण शरीरातील मूलद्रव्यांची
-
संख्या ३३ असली तरी मानवी शरीराचा बव्हंशी भाग अवघ्या सहा मूलद्रव्यांचाच बनलेला
-
आहे. ५० किलोग्रॅम वजनाचा माणूस घेतला तर या पन्नास किलोग्रॅममध्ये ३२.५ किलो
-
ऑक्सिजन , ९ किलो कार्बन, ५ किलो हैड्रोजन, दीड किलो नायट्रोजन, एक किलो
-
कॅल्शियम आणि अर्धा किलो फॉस्फरस ही सहा मूलद्रव्ये असतात. या सहा मूलद्रव्यांचे वजनच
-
साडे एकूण पन्नास किलो झाले. उरलेल्या अध्र्या किलोग्रॅम वजनात लोह, जस्त, सोडियम,
-
पोटॅशियम, क्लोरिन, फ्ल्युओरिन, ब्रोमीन, आयोडीन, मॅग्नेशियम, मॅंगनीज, तांबे,
-
क्रोमियम, मॉलिब्डेनम, टिटॅनियम, रुबिडीयम, स्ट्रॉन्शियम, सेलेनियम, अलयुमिनियम,
-
लिथियम, बेरियम, निकले, कथील, बोरॉन, सिलीकॉन, कोबाल्अ, आर्सेनिक, गंधक इत्यादी
-
धातू आणि अधातू मूलद्रव्ये असतात. अर्थात शरीरात त्यांचे प्रमाण अत्यल्प असले तरी ती
-
असणे अत्यावश्यक असते. उदा. रक्तातील हेमोग्लोबिन हे शरीरातील सर्व पेशींना ऑक्िसजनचा
-
पुरवठा करते. या हेमोग्लोबिनसाठी लोह अत्यावश्यक आहे. संयुगांचा विचार केला तर मानवी
-
शरीरात सर्वात जास्त प्रमाण पाण्याचे असते. मानवी शरीर हे सरासरीने ६५% पाणी आहे
-
असे म्हणावयास हरकत नाही. मेंदू, प्लीहा (स्प्लीन) आणि मज्जारज्जू या अवयवात त्यांच्या
-
वजनाच्या पाऊण भाग पाणी असते. रक्तात ८०% भाग पाण्याचा असतो. डोळयातील
- बुबुळाच्या आत असणारा द्राव म्हणजे तर ९९% पाणीच होय.
मूलद्रव्यांना रंगाचे नाव
- इंडियम (In)
मूलद्रव्यांना नावे देताना आवर्तसारणीतील एक ते सोळा ग्रुपमधील मूलद्रव्याच्या नावाच्या शेवटी ‘इयम’ यायला हवे, सतराव्या ग्रुपसाठी ‘इन’ यावे आणि अठराव्या ग्रुपमधील मूलद्रव्यांच्या नावाचा शेवट ऑन’ या अक्षराने व्हावा, असे ठरले होते.
मूलद्रव्यांना देशाची/प्रांताची/शहराची नावे
- अमेरिकियम (Am), कॅलिफोर्नियम (Cf), जर्मेनियम (Ge), टेनिसीन (Ts), डब्नियम (Db), निहोनियम (Nh), फ्रान्सियम Fr), मॉस्कोव्हियम (Mc).