डॉ. अभय बंग पद्मश्री पुरस्कार विजेते
जन्म : २३ सप्टेंबर, १९५०
जन्म ठिकाण : वर्धा, महाराष्ट्र
निवासस्थान : शोधग्राम, गडचिरोली
राष्ट्रीयत्व : भारतीय
नागरिकत्व : भारतीय
शिक्षण : एम.बी.बी.एस., एम.डी., एम.पी.एच
प्रशिक्षणसंस्था : जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठ, बाल्टिमोर, अमेरिका
व्यवसाय : वैद्यकीय
कारकिर्दीचा काळ : इ.स.१९८५ पासून
पत्नी : राणी बंग
अपत्ये : आनंद, अमृत
वडील : ठाकुरदास
आई : सुमन
पुरस्कार
महाराष्ट्रभूषण, टिळक महाराष्ट्र विद्यापीठाकडून डी.लिट. ही सन्माननीय पदवी, पद्मश्री अभय बंग हे मराठी डॉक्टर आहेत. ते सर्च या संस्थेमार्फत गडचिरोलीतील ग्रामीण भागात वैद्यकीय सेवा आणि संशोधन असे कार्य करतात. बालमृत्यू नियंत्रणावरील त्यांच्या संशोधनाची दखल भारतासोबतच अनेक देशांनी घेतली असून पाकिस्तान, नेपाळ, बांग्लादेश व अनेक आफ्रिकन देश त्यानी तयार केलेले बालमृत्यू नियंत्रणाचे प्रतिरूप (मॉडेल) वापरतात. वैद्यकीय नियतकालिक द लॅनसेटमध्ये त्यांचे अनेक लेख छापून आलेले आहेत. त्यांचे स्वतःच्या हृदयरोगावरील अनुभवकथनाचे माझा साक्षात्कारी हृदयरोग हे पुस्तक प्रसिद्ध आहे.

बालपण व उच्च शिक्षण
अभय बंग हे ठाकुरदास आणि सुमन बंग यांचे पुत्र आहेत. ते दोघेही गांधीवादी कार्यकर्ते होते. ठाकुरदास बंग हे गांधीजींना भेटले होते आणि गांधीजींच्या सांगण्यावरून त्यांनी अर्थशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी इंग्लंडला जाण्याऐवजी खेड्यांमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. अभय बंग हे वर्ध्याच्या सेवाग्राम आश्रमाच्या वातावरणात वाढले. गांधीजीनी सुरू केलेल्या नयी तालीम या शिक्षणपद्धतीत त्यांचे शिक्षण झाले. अभय बंग हे ठाकुरदास आणि सुमन बंग यांचे पुत्र आहेत. ते दोघेही गांधीवादी कार्यकर्ते होते. ठाकुरदास बंग हे गांधीजींना भेटले होते आणि गांधीजींच्या सांगण्यावरून त्यांनी अर्थशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी इंग्लंडला जाण्याऐवजी खेड्यांमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. अभय बंग हे वर्ध्याच्या सेवाग्राम आश्रमाच्या वातावरणात वाढले. गांधीजीनी सुरू केलेल्या नयी तालीम या शिक्षणपद्धतीत त्यांचे शिक्षण झाले.
त्यांनी नागपूर मेडिकल कॉलेजमधून एम.बी.बी.एस. ची पदवी मिळवली. यात त्यांना तीन विषयात सुवर्णपदके मिळाली. त्यानंतर भारतातील अग्रगण्य समजल्या जाणार्या पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (पी.जी.आय.) या संस्थेत त्यानी काम केले. सार्वजनिक आरोग्य या विषयाचे शिक्षण देणार्या संस्था शोधत ते भारतभर फिरले परंतु त्यांना तसले शिक्षण देणारी एकही संस्था सापडली नाही. नंतर त्यांनी अमेरिकेच्या जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठातून मास्टर्स इन पब्लिक हेल्थ ही पदवी इ.स. १९८४ साली सुवर्णपदकासह मिळवली. तेथे त्यांनी कार्ल टेलर यांच्याकडून सार्वजनिक आरोग्याचे धडे घेतले. यामध्ये ते ९९टक्के गुणांसह प्रथम आले. ते या संस्थेमध्ये संचालकही होऊ शकले असते. त्यांना अत्याधुनिक रुग्णालयात किंवा रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये काम करण्याच्या संधी चालून आल्या होत्या. पण त्यांनी शहरी, श्रीमंती आणि आरामशीर जीवनशैली नाकारली आणि गडचिरोलीसारख्या दुर्लक्षित भागाला आपले कार्यक्षेत्र म्हणून निवडले.
कार्य
- गडचिरोली जिल्ह्यात दारूबंदी चळवळ.
- नवजात बालकांच्या मृत्यूच्या कारणांचा अभ्यास आणि उपाययोजना.
- स्त्रियांच्या आरोग्याच्या प्रश्नावरील संशोधन.
- सिकल सेल अनिमियावरील संशोधन.
- १९८८ साली त्यांनी ‘सर्च’ नावाची बिगर सरकारी संघटना ५८ गावातील ४८,००० लोकसंख्येसाठी स्थापन केली.