दख्खनचे पठार थंड हवेचे ठिकाण Deccan Plateau

हा प्रदेश सह्याद्री पासून पूर्वेकडे सुरजगड, भामरागड, व चिरोली टेकड्यांपर्यंत विस्तारलेला आहे. हा अतिशय प्राचिन प्रदेश असून याची निर्निती ७ कोटी वर्षांपूर्वी झाली आहे. २९ वेळा भेगी उद्रेक होऊन लाव्हा रसाचे थरावर थर साचून याचि निर्मिती झाली. हे पठार मुख्यतः बेसॉल्ट क्डकापासून झाली आहे. पठाराची सरासरी पश्च्मिमेकडील उंची ६० मी. व पूर्वेकडील उंची ३०० मी. म्हणजेच एकूण सरासरी उंची ४५० मी. आहे.
  • पश्चिमेकडून पूर्वेकडे जातांना बेसॉल्टची जाडी – कमी होत जाते. 
  • दक्षिण कोकणात बेसॉल्टचे थर खनन क्रियेने निघून गेल्याने वालुकास्म व गारगोटी हाडक उघडे पडले आहे.
  • गोंडवाना क्षितीज स्मांतर थर थिजून सपाट घाटमाथे व पाय-या पाय-यांची रचना असणारी भूरुपे निर्माण होतात.

 

थंड हवेचे ठिकाण जिल्हा थंड हवेचे ठिकाण जिल्हा
तोरणमाळ नंदुरबार पाचगणी सातारा
खंडाळा पुणे माथेरान रायगड
रामटेक नागपूर चिखलदरा (गाविलगड) अमरावती
महाबळेश्वर सातारा लोणावळा, भिमाशंकर पुणे
जव्हार ठाणे मोखाडा, सुर्यामाळ ठाणे
आंबोली सिंधुदुर्ग येड्शी उस्मानाबाद
पन्हाळा कोल्हापूर म्हैसमाळ औरंगाबाद

 

          दख्खनच्या पठारावर विस्तारलेल्या सह्याद्री किंवा सातमाला या सारख्या पर्वतराजी आणि सौराष्ट्रातील गिरनार पर्वत यांच्या कडेकपारींमध्ये, इ.स. पूर्वकालात खोदल्या गेलेल्या बौद्ध गुंफाना भेटी देण्याचा एक उपक्रम मी वर्ष दोन वर्षांपूर्वी राबवला होता. दख्खनच्या पठारावर त्या काळात राज्य करीत असलेल्या सातवाहन साम्राज्याने या बौद्ध गुंफांमध्ये मागे सोडलेल्या खाणाखुणा शोधण्याचा एक यत्न करणे हा त्या उपक्रमामागे असलेला माझा हेतू होता व तो बर्‍यापैकी सफल करण्यात मी यशस्वी झालो होतो असे मी आता समाधानाने म्हणू शकतो. माझ्या या भेटींमुळे व त्यांच्या अनुषंगाने केलेल्या या गुंफातील शिलालेखांच्या अध्ययनांमुळे, एक गोष्ट मला स्पष्टपणे लक्षात आली होती की सातवाहन साम्राज्याच्या कीर्तीचे आणि वैभवाचे दिवस इ.स. नंतरचे दुसरे किंवा तिसरे शतक या कालखंडात खात्रीलायकपणे हरपले होते. कार्लें आणि नाशिक येथील गुंफांमध्ये असलेल्या शिलालेखांत प्रख्यात सातवाहन सम्राट गौतमीपुत्र याच्या नंतर त्याचा पुत्र असलेला वशिष्ठिपुत्र पुळुमवी हा सातवाहनांच्या राजसिंहासनावर आरूढ होता असा स्पष्ट संदर्भ मिळतो. परंतु पश्चिम महाराष्ट्रातील बौद्ध गुंफांमधील शिलालेखांतील सातवाहन राजघराण्यासंबंधीचे सर्व उल्लेख पुळुमवी याच्या राज्यकालाबरोबरच संपल्याचे आढळून येते आणि माझ्या (अपुर्‍या असलेल्या) ज्ञानानुसार तरी सातवाहन राजघराण्याच्या याच्या पुढच्या पिढ्यांतील कोणत्याही सम्राटाचे नाव या बौद्ध गुंफांमधील कोणत्याच शिलालेखात दिसत नाही. यामुळे सातवाहन साम्राज्याच्या खाणाखुणा शोधण्याचा माझा यत्न या पुढे पश्चिम महाराष्ट्र किंवा पश्चिम दख्खनमध्ये चालू ठेवण्याने आणखी काहीच प्राप्त होणार नाही हे लक्षात आल्याने येथेच थांबणे मला आवश्यक वाटले.
dakkhan%2Bpathar%2Bempsckida%2B