जगातला सर्वात उंच गर्डर रेल्वे सेतू मणिपूरमध्ये :
मणिपूर राज्यात जिरीबम-तुपूल-इम्फाळ दरम्यान 111-किलोमीटर लांबीचा नवा ब्रॉडगेज रेल्वेमार्ग प्रकल्प तयार करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. याला राष्ट्रीय प्रकल्प म्हणून घोषित करण्यात आले आहे.
111-किलोमीटर लांबीच्या या ब्रॉडगेज रेल्वेमार्गात 9 रेल्वे स्थानके, 148 सेतू आणि 45 बोगदे तयार केले जातील. यात 12 क्रमांकाचा बोगदा 11.55 किलोमीटर लांबीचा असून तो भारतामधील सर्वाधिक लांबीचा बोगदा ठरेल.
या व्यतिरिक्त, ‘नोने’ स्थानकापासून जवळच ‘इरिंग’ नदीवर 141 मीटर उंचीवर एक सेतू उभारला जात आहे, जो जगातला सर्वात उंच गर्डर रेल्वे सेतू ठरणार.
भोपाळचे नाव पुन्हा :
भोपाळमध्ये देशातले पाचवे आणि सर्वात मोठे ‘राष्ट्रीय डेटा सेंटर’ उभारण्याची योजना भारत सरकारच्या इलेक्ट्रोनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने तयार केली आहे.
हे राष्ट्रीय डेटा सेंटर पाच लाख व्हर्च्युअल सर्व्हरांना व्यवस्थापित करू शकणार. याच्या उभारणीसाठी दोन वर्ष लागतील आणि ते राष्ट्रीय माहितीशास्त्र केंद्र (NIC) कडून स्थापित केले जाईल.
सध्या भारतात भुवनेश्वर, दिल्ली, हैद्राबाद आणि पुणे येथे राष्ट्रीय डेटा सेंटर कार्यरत आहेत.
नाशिकचे योगतज्ज्ञ विश्वास मंडलिक यांना यावर्षीचा पंतप्रधान पुरस्कार :
21 जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या पार्श्वभूमीवर नाशिकचे योगतज्ज्ञ विश्वास मंडलिक व मुंबईतील योग इन्स्टिट्यूट या संस्थेला या वर्षाचे पंतप्रधान पुरस्कार दिले गेले आहेत. हे पुरस्कार योगविद्येचा प्रसार व विकासासात भरीव कामगिरीबाबत त्यांना दिले गेले.
विश्वास मंडलिक हे योग धाम विद्या (1978 साली), योग विद्या गुरुकुल (1983 साली) या संस्थांचे संस्थापक आहेत. योगविद्येवर त्यांनी 42 पुस्तके लिहिली आहेत. मुंबईतील योग इन्स्टिट्युट ही 1918 साली योगेंद्रजी यांनी स्थापन केली.
विविध क्षेत्रात लोककल्याणकारी उपक्रमांमध्ये मोलाचे योगदान देणार्या आणि आदर्श तयार करणार्या व्यक्तीला वा संस्थेला पंतप्रधान पुरस्कार दिला जातो. मानचिन्ह, मानपत्र व प्रत्येकी 25 लक्ष रुपये रोख असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.
केंद्र शासन BPO जाहिरात योजना विस्तारित करणार :
केंद्र शासनाने ‘BPO जाहिरात योजना’ विस्तारित करण्याची योजना आखत आहे, ज्यामधून एक लाख जागा निर्माण होतील.
‘भारत BPO जाहिरात योजना’ आणि ‘ईशान्य BPO जाहिरात योजना’ या योजनांच्या अंतर्गत केंद्र शासन आपली बिझनेस प्रोसेस आउटसोर्सिंग (BPO) क्षमता सध्याच्या 48,000 जागांवरून 1 लक्ष जागा पर्यंत वाढविणार आहे.
सध्या भारतात 27 राज्यांतील सर्व 91 शहरांमध्ये BPO सुरु आहेत आणि लवकरच गया आणि गाझीपूरसारख्या छोट्या शहरांमध्ये देखील BPO लवकरच सुरू होणार आहेत. लहान गावांमध्ये चालवलेल्या BPO साठी 31,732 जागांची निर्मिती झाली आहे.
वाणिज्य मंत्रालयाची ‘राष्ट्रीय मानकीकरण धोरण’ जाहीर :
वाणिज्य व उद्योग मंत्रालयाने दर्जेदार गुणवत्ता प्रदान करण्याच्या उद्देशाने ‘राष्ट्रीय मानकीकरण धोरण (National Strategy for Standardization)’ अंमलात आणण्यात येत असल्याची घोषणा 5 व्या ‘राष्ट्रीय मानक सभेत’ केली.
ही सभा वाणिज्य विभाग आणि भारतीय उद्योग संघ (CII) यांनी 19-20 जून 2018 रोजी नवी दिल्लीत आयोजित केली होती.
भारतीय उद्योग संघ (Confederation of Indian Industry -CII) ही भारतातील एक व्यवसाय संघटना आहे. याची स्थापना 1895 साली झाली आणि त्याचे 8,300 सदस्य आहेत. याचे मुख्यालय नवी दिल्लीत आहे. CII धोरणाबाबत मुद्द्यांमध्ये भारत सरकारसोबत कार्य करते.
रेल्वे मंत्रालय गुजरातमधील पाच अरुंद गेज रेल्वेमार्गांचे जतन करणार :
पूर्वी बडोद्याच्या राजघराण्याच्या कारकिर्दीत बांधलेल्या, आता गुजरातमध्ये असलेल्या, पाच अरुंद गेज रेल्वेमार्गांचे जतन करण्याचा निर्णय भारत सरकारच्या रेल्वे मंत्रालयाने घेतला आहे.
एकूण 204 किलोमीटर लांबी असलेले हे पाच रेल्वेमार्ग मूळचे बडोद्याच्या राजघराण्याच्या गायकवाड बडोदा राज्य रेल्वे (GBSR) यांच्या मालकीचे होते. आता ते सध्या पश्चिम रेल्वे (WR) विभागाअंतर्गत व्यवस्थापित केले जात आहेत. 33 किलोमीटर लांबीचा दाभोइ-मियागम मार्ग देशाचा पहिला अरुंद गेज रेल्वेमार्ग आहे. यावर 1862 साली पहिल्यांदा ट्रेन धावली होती.
‘वारसा दत्तक घ्या’ योजनेच्या अंतर्गत 3 सामंजस्य करारांवर स्वाक्षर्या :
भारत सरकारच्या ‘वारसा दत्तक घ्या’ (Adopt a Heritage) योजनेच्या अंतर्गत 3 सामंजस्य करारांवर स्वाक्षर्या झाल्या तसेच 6 करार होण्याच्या मार्गावर आहेत. सोबतच या योजनेंतर्गत आणखी 31 आदर्श स्मारकांना ओळखण्यात व सूचीबद्ध करण्यात आले आहे.
27 सप्टेंबर 2017 रोजी जागतिक पर्यटन दिनी पर्यटन मंत्रालयाच्या ‘वारसा दत्तक घ्या’ (Adopt a Heritage) योजनेचा शुभारंभ करण्यात आला. या योजनेमधून विविध खाजगी, सार्वजनिक क्षेत्राच्या कंपन्या आणि कॉरपोरेट व्यवसायिकांकडून वारसा स्थळांना दत्तक घेणे तसेच त्यांचे संरक्षण तसेच विकासाच्या माध्यमातून स्मारकांना आणि पर्यटन स्थळांना स्थायी बनविण्याची जबाबदारी सोपविण्यात येत आहे. हा संस्कृती मंत्रालय आणि भारतीय पुरातत्व सर्वेक्षण यांच्या सहकार्याने चालविला जाणारा पर्यटन मंत्रालयाचा महत्त्वपूर्ण कार्यक्रम आहे.
भारतात राष्ट्रपातळीवर आरोग्यसेवा आस्थापनांची पहिली-वहिली गणना प्रसिद्ध :
केंद्रीय आरोग्य गुप्तचर खात्याकडून (Central Bureau of Health Intelligence -CBHI) तयार करण्यात आलेला ‘नॅशनल हेल्थ प्रोफाइल (NHP)-2018’ या वार्षिक दस्तऐवजाला केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने प्रसिद्ध केले आहे.
NHP-2018 हे भारतात राष्ट्रपातळीवर केली गेलेली आरोग्यसेवा आस्थापनांची पहिली-वहिली गणना आहे. यामध्ये वैद्यकीय पायाभूत सुविधा आणि आरोग्यासंबंधी मनुष्यबळ याविषयी व्यापक माहितीसह लोकसंख्याशास्त्रीय, सामाजिक-आर्थिक, आरोग्य स्थिती आणि आरोग्यासंबंधी वित्त निर्देशके अश्या विषयांचा समावेश करण्यात आला आहे.
शिवाय केंद्रीय आरोग्य मंत्री जे. पी. नड्डा यांनी राष्ट्रीय आरोग्य संसाधन भांडार (National Health Resource Repository -NHRR) सुरू केली. ही देशाची पहिली-वहिली व्यवस्था आहे, ज्यामध्ये देशभरातील सर्व सार्वजनिक आणि खाजगी आरोग्यसेवा संस्थांचा प्रमाणित, मानकीकृत आणि अद्ययावत भू-स्थानिक माहिती साठवली जाईल.
भारतीय ‘राष्ट्रीय डिजिटल ग्रंथालय’ राष्ट्राला समर्पित :
19 जून रोजी ‘राष्ट्रीय वाचन दिना’निमित्त नवी दिल्लीत केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते ‘भारतीय राष्ट्रीय डिजिटल ग्रंथालय’ या नव्या डिजिटल उपक्रमाचे अनावरण करण्यात आले आहे.
भारतीय राष्ट्रीय डिजिटल ग्रंथालय (National Digital Library of India -NDLI) हा माहिती व दळणवळण तंत्रज्ञानाच्या माध्यमातून राष्ट्रीय शिक्षण मोहीम (NMEICT) अखत्यारीत मनुष्यबळ विकास मंत्रालयाचा एक प्रकल्प आहे. हे डिजिटल ग्रंथालय IIT खरगपूरने विकसित केले आहे.
जगातला सर्वात उंच गर्डर रेल्वे सेतू मणिपूरमध्ये उभारला जात आहे :
मणिपूर राज्यात जिरीबम-तुपूल-इम्फाळ दरम्यान 111-किलोमीटर लांबीचा नवा ब्रॉडगेज रेल्वेमार्ग प्रकल्प तयार करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. याला राष्ट्रीय प्रकल्प म्हणून घोषित करण्यात आले आहे.
111-किलोमीटर लांबीच्या या ब्रॉडगेज रेल्वेमार्गात 9 रेल्वे स्थानके, 148 सेतू आणि 45 बोगदे तयार केले जातील. यात 12 क्रमांकाचा बोगदा 11.55 किलोमीटर लांबीचा असून तो भारतामधील सर्वाधिक लांबीचा बोगदा ठरेल. या व्यतिरिक्त, ‘नोने’ स्थानकापासून जवळच ‘इरिंग’ नदीवर 141 मीटर उंचीवर एक सेतू उभारला जात आहे, जो जगातला सर्वात उंच गर्डर रेल्वे सेतूठरणार.
कृषी संदर्भात धोरणात्मक दृष्टीकोनाशी समन्वय साधण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या उपगटाची स्थापना :
कृषी आणि महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा/MGNREGS) संदर्भात धोरणात्मक दृष्टीकोनाशी समन्वय साधण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या उपगटाची स्थापना केंद्र शासनाने केली आहे.
मध्यप्रदेशाचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चव्हाण हे या मुख्यमंत्र्यांच्या उपगटाचे संयोजक आहेत. गटाच्या अन्य सदस्यांमध्ये आंध्रप्रदेश, बिहार, गुजरात, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल आणि सिक्कीम असे सात राज्यांचे मुख्यमंत्री आणि NITI आयोगाचे रमेश चंद यांचा समावेश आहे. हा गट शेतकर्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी आणि MGNREGS अंतर्गत संभाव्य संधीचा शोध घेण्याकरिता उपाययोजना सुचविणार आणि शिफारसी करणार.
सन 2018: कर्तव्य बजावताना अपंगत्व आलेल्या सैनिकांचे वर्ष :
भारतीय लष्कर सन 2018 हे ‘कर्तव्य बजावताना अपंगत्व आलेल्या सैनिकांचे वर्ष’ म्हणून साजरा करीत आहे.
देशाच्या सन्मानार्थ अश्या सैनिकांचे दुःख/वेदना/चिंता दूर करण्याचा मुख्य हेतूने भारतीय लष्कराकडून विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. अश्या सैनिकांना वैद्यकीय सेवा, पुनर्वसन, विविध लाभार्थी योजना, व्यावसायिक संधी आणि त्यांना रोजगार अश्या बाबतीत मदत करण्यासंदर्भात संघटनात्मक पाठबळाविषयी जागृती निर्माण करण्याची योजना आहे.
अनुकृती व्यास मिस इंडिया 2018 :
अनुकृती व्यास या तामिळनाडूच्या ब्युटीने आपल्या ब्रेनच्या जोरावर फेमिना मिस इंडिया 2018 स्पर्धेचा मुकुट पटकावला आहे. 29 स्पर्धकांना मागे टाकत अनुकृतीने हा मान पटकावला. हरियाणाची मीनाक्षी चौधरी प्रथम उपविजेती तर आंध्र प्रदेशची श्रेया राव दुसरी उपविजेती ठरली आहे.
19 जून 2018 रोजी मुंबईत एका प्रतिष्ठित सोहळ्यात ‘मिस वर्ल्ड 2017’ मानुषी छिल्लरने अनुकृतीला ‘मिस इंडिया’चा मुकुट घातला.
19 वर्षांची अनुकृती व्यास ही मूळ तामिळनाडूची असून ती एक अथलिट आणि नृत्यांगनाही आहे. बॉलिवुड नाईटमध्ये तिने माधुरी दीक्षितच्या गाण्यावर डान्स केला होता.
अनुकृती व्यास ही आपल्या आईचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी फ्रेंच भाषेत B.A. करत आहे. चेन्नईच्या लोयोला कॉलेजमध्ये ती सेकेंड ईयरला आहे.व पुढे तिला सुपर मॉडल व्हायचं आहे.
दिनविशेष
✓मृत्यू :
१९९३ विष्णूपंत जोग – चित्रपट अभिनेते (पहिली मंगळागौर – लता मंगेशकर यांनी अभिनय केलेला पहिला चित्रपट, सरकारी पाहुणे, जय मल्हार, नवरा बायको, देव पावला, बायको पाहिजे, वरदक्षिणा), रंगभूमीवरील अभिनेते (नाटक झाले जन्माचे) (जन्म: ? ? ????)
१९५५ सदाशिव ऊर्फ ’सदू’ शिंदे – लेगस्पिनर व गुगली गोलंदाज (जन्म: १८ ऑगस्ट १९२३)