गुणोत्तर म्हणजे नेमके काय तर दोन संख्या भागाकाराच्या रूपात संक्षिप्त लिहणे होय.
- उदाहरणार्थ
35 चे 80 शी गुणोत्तर किती ?
स्पष्टीकरण –
35 35 7
———- = ——— = —–
80 80 16
35 चे 80 शी गुणोत्तर = 7 :16 होय. वाचण = 7 स 16 असे करतात.
गुणोत्तर लिहणात हे
चिन्ह वापरतात ➡ ( : )
गुणोत्तर करताना काही नियम
- गुणोत्तर करताना ज्या दोन राशी किंवा संख्या दिलेल्या असतात त्यांची एकक समान करूनन घेवूनच गुणोत्तर करावीत.
- गुणोत्तर केलेल्या उत्तरास कोणतेही एकक नसते.
प्रमाण
प्रमाण म्हणजे च संख्या प्रमाणात आहेत कि नाहीत हा भाग आपण अभ्यासणार आहोत.
व्याख्या –
a, b , c या तीन संख्या तेव्हा प्रमाणात / प्रमाणित असतील जेव्हा ….
b² = a × c असेल .
a, b, c, व d या चार संख्या तेव्हा प्रमाणात / प्रमाणित असातील जेव्हा ……….
a × d = b × c असेल .
यालाच परंपरित प्रमाणात असाही शब्द वापरतात.
- उदाहरणार्थ –
1) 9, 12 , 16 या संख्या प्रमाणात आहेत का ?
स्पष्टीकरण –
येथे a = 9 , b = 12 , c = 16
b² = 12² = 144
a × c = 9 × 16 = 144
म्हणून …..b² = a × c
9, 12 , 16 या संख्या प्रमाणात आहेत .
- उदाहरणार्थ –
8 , 12 , 20 , 30 या संख्या प्रमाणात आहेत का ?
स्पष्टीकरण –
येथे…. a = 8 , b = 12
c = 20 व d = 30 होय .
a × d = 8 × 30 = 240
b × c = 12 × 20 = 240
म्हणून …..a × d = b × c
a, b, c, d या प्रमाणित संख्या आहेत ?
सरावासाठी उदाहरणे
प्रश्न क्रमांक 001
3 तासाचे 4 तास 24 मिनीटा शी गुणोत्तर किती ?
प्रश्न क्रमांक 002
4 , 5 , 6 या संख्या प्रमाणात आहेत का ?
प्रश्न क्रमांक 003
15 , 30 , x , 50 या चार संख्या प्रमाणात असतील तर x ची किंमत शोधा ?