भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी (वय ९३) यांचे निधन झाले.
श्री. अटल बिहारी वाजपेयी हे राजकीय वचनबद्ध्तेसाठी ओळखले जातात. 13 ऑक्टोबर 1999 रोजी त्यांनी सलग दुसऱ्यांदा राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारचे प्रमुख म्हणून पंतप्रधान पदाची सूत्रे स्विकारली. 1996 साली थोड्या कालावधीसाठी त्यांनी पंतप्रधान म्हणून काम पहिले होते. पंडित नेहरुनंतर सलग दोनदा पंतप्रधान होणारे ते पहिले पंतप्रधान ठरले. ज्येष्ठ संसदपटू असलेले अटल बिहारी वाजपेयी राजकारणात चार दशक सक्रीय होते. श्री. वाजपेयी नऊ वेळा लोकसभेवर तर दोनवेळा राज्यसभेवर निवडून आले होते हाही एक प्रकारचा विक्रमच आहे.
स्वातंत्र्योत्तर काळात भारताचे अंतर्गत व परकीय धोरणास आकार देण्यात एक पंतप्रधान, परराष्ट्र मंत्री, विविध स्थायी समित्यांचे अध्यक्ष व एक विरोधी पक्ष नेते म्हणून त्यांनी समर्थपणे भूमिका बजावली. ब्रिटीश सत्तेला भारतातून पायउतार करण्यात महत्वाच्या ठरलेल्या 1942 मधील भारत छोडो चळवळीमध्ये सहभागी होऊन विद्यार्थीदशेतच वाजपेयी यांनी राष्ट्रवादी राजकारणाचे धडे गिरवले. राज्यशास्त्र व कायद्याचे विद्यार्थी असलेल्या श्री. वाजपेयींना शालेय काळातच परकीय व्यवहारामध्ये रुची निर्माण झाली होती. त्यांनी ही आवड पुढे अनेक वर्ष जोपासली व विविध द्विपक्षीय व बहुपक्षीय व्यासपीठांवर भारताचे प्रतिनिधित्व करताना त्यांनी ह्या कौशल्याचा उपयोग केला. श्री. वाजपेयी यांनी एक पत्रकार म्हणून आपल्या कारकीर्दीची सुरुवात केली परंतु अल्पावधीतच म्हणजेच 1951 साली भारतीय जनसंघात प्रवेश करण्यासाठी त्यांनी पत्रकारिता सोडली. राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील महत्वाचा घटक असलेला भारतीय जनता पक्ष हा आधी जनसंघ म्हणून ओळखला जात होता. समीक्षकांकडून प्रशंसा मिळवलेले श्री. वाजपेयी एक ख्यातनाम कवी आहेत. शिवाय आपल्या व्यस्त कामातून वेळ काढून ते संगीत व पाक कलेतही विशेष रस घेतात.
Atal Bihari Vajpayee Mahiti in Marathi
25 डिसेंबर 1924 साली तत्कालीन ग्वालियर संस्थानातील (आताच्या मध्यप्रदेश राज्यात आहे) एका प्राथमिक शिक्षकाच्या घरात श्री. वाजपेयी यांचा जन्म झाला. अटल बिहारी वाजपेयी यांचा सामाजिक जीवनातील उदय हा भारतीय लोकशाही व त्यांच्या कुशाग्र राजकीय बुद्धिमत्तेचा गौरव आहे. उदारमतवादी जागतिक दृष्टीकोन व लोकशाही तत्वांशी असलेली बांधिलकी यामुळे जनसामान्यांना त्यांच्याबद्दल आदर वाटतो. महिला सबलीकरण व सामाजिक समानतेचे खंबीर समर्थक असलेले श्री. अटल बिहारी वाजपेयी भारताला आंतरराष्ट्रीय पातळीवर सर्व देशांमध्ये एक दूरदर्शी, विकसित आणि मजबूत राष्ट्र म्हणून बघू इच्छितात. 5000 वर्षांची ऐतिहासिक संस्कृती लाभलेल्या व आगामी 1000 वर्षांमध्ये येणारी आवाहने पेलण्यास तयार असलेल्या भारत देशाचे ते प्रतिनिधित्व करतात.
भारताप्रती असलेले त्यांचे निस्वार्थ समर्पण व पन्नास वर्षाहून अधिक काळ देशासाठी दिलेल्या निस्पृह सेवेबद्दल त्यांना भारतातील दुसरा सर्वोच्च नागरी सन्मान असलेला पद्मविभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. 1994 साली उत्कृष्ट संसदपटूचा पुरस्कारही त्यांना मिळाला आहे. एका उल्लेखानुसार, अटल बिहारी वाजपेयी नावाप्रमाणेच एक ज्येष्ठ भारतीय नेते, निष्णात राजकारणी, निस्पृह सामाजिक कार्यकर्ते, बलवान वक्ते, कवी, साहित्यिक, पत्रकार व खऱ्या अर्थाने बहुआयामी व्यक्तिमत्त्व आहेत. जनसामान्यांच्या आशा आकांक्षा श्री. वाजपेयी यांनी पूर्ण केल्या. त्यांच्या कार्यातून आजही त्यांची राष्ट्राप्रती असलेली निष्ठा प्रतीत होते.
अटलबिहारी वाजपेयींच्या सार्वजनिक जीवनाची वाटचाल
- 1951 – संस्थापक सदस्य भारतीय जनसंघ (बी. जे. एस.)
- 1957 – दुसऱ्या लोकसभेवर निवड
- 1957 -77 – भारतीय जनसंघाच्या संसदीय पक्षाचे नेते
- 1962 – राज्यसभा सदस्य
- 1966- 67 – सरकारच्या ऍश्युरन्स कमिटीचे अध्यक्ष
- 1967 – चौथ्या लोकसभेवर फेरनिवड (दुसऱ्यांदा)
- 1967 – 70 – अध्यक्ष, सार्वजनिक लोकलेखा समिती
- 1971 – पाचव्या लोकसभेवर फेरनिवड (तिसऱ्यांदा)
- 1977 – सहाव्या लोकसभेवर फेरनिवड (चौथ्यांदा)
- 1977 – 79 – केंद्रीय परराष्ट्र व्यवहार मंत्री
- 1977 – 80 – संस्थापक सदस्य जनता पक्ष
- 1980 – सातव्या लोकसभेवर फेरनिवड (पाचव्यांदा)
- 1980 – 86 – अध्यक्ष, भारतीय जनता पक्ष
- 1980- 84, 1986 आणि 1993- 96 – भाजपच्या संसदीय पक्षाचे नेते
- 1986 – राज्यसभा सदस्य, जनरल पर्पज कमिटीचे सदस्य
- 1988 – 90 – हाऊस कमिटी आणि बिझनेस ऍडव्हायजरी कमिटी यांचे सदस्य
- 1990 -91 – अध्यक्ष, पिटीशन्स कमिटी
- 1991 – दहाव्या लोकसभेवर फेरनिवड (सहाव्यांदा)
- 1991 -93 – अध्यक्ष, सार्वजनिक लोकलेखा समिती
- 1993 -96 – लोकसभेतील विरोधी पक्ष नेते; अध्यक्ष, परराष्ट्र व्यवहार समिती
- 1996 – अकराव्या लोकसभेवर फेरनिवड (सातव्यांदा)
- 16 मे 1996 – 31 मे 1996 – तेरा दिवसांचे पंतप्रधान. या काळात त्यांच्याकडे रसायन आणि खते, सार्वजनिक वितरण आणि ग्राहक व्यवहार, कोळसा, वाणिज्य, दळणवळण, पर्यावरण आणि वने, अन्नप्रक्रिया उद्योग, मानव साधनसंपत्ती विकास, कामगार, खाणी, अपारंपरिक उर्जा स्त्रोत, सार्वजनिक तक्रार निवारण आणि निवृत्तीवेतन, पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू, नियोजन आणि कार्यअंमलबजावणी, उर्जा, रेल्वे, ग्रामीण आणि रोजगार, विज्ञान आणि तंत्रज्ञान, पोलाद, भूपृष्ठ वाहतूक, वस्त्रोद्योग, जलसंपत्ती, अणू उर्जा, इलेक्ट्रॉनिक्स, जम्मू आणि काश्मिर व्यवहार, सागरी विकास, अंतराळ एवढ्या खात्यांचा कार्यभार होता
- 1996 -97 – लोकसभेतील विरोधी पक्षनेते
- 1997- 98 – अध्यक्ष, परराष्ट्र व्यवहार समिती
- 1998 – बाराव्या लोकसभेवर फेरनिवड (आठव्यांदा)
- 1998- 99 – भारताचे पंतप्रधान, परराष्ट्र व्यवहारमंत्री
- 1999 – तेराव्या लोकसभेवर फेरनिवड (नवव्यांदा)
- 13 ऑक्टोबर 1999 – 13 नोव्हेंबर 2004 – भारताचे पंतप्रधान
अटल बिहारी वाजपेयींना मिळालेले पुरस्कार
- 1992 – पद्मविभूषण
- 1993 – कानपूर विद्यापिठाची मानद डॉक्टरेट
- 1994 – लोकमान्य टिळक पुरस्कार
- 1994 – सर्वोत्कृष्ट संसदपटू
- 1994 – भारतरत्न पंडीत गोविंद वल्लभ पंत पुरस्कार
- 2015 – भारतरत्न किताबाने सन्मानीत
- 2015 – बांगलादेश मुक्तीयुद्ध सन्मान
अटल बिहारी वाजपेयी यांची वाङ्मयसंपदा आणि ग्रंथनिर्मित
- नयी चुनौती, नया अवसर (हिंदी आवृत्ती), 2002
- इंडियाज् पर्स्पेक्टिव्ह ऑन एशियान अँड एशिया- पॅसिफिक रिजन (2003)
- न्यू डायमेन्शन्स ऑफ इंडियाज फॉरेन पॉलिसी (1979)
- डिसीशिव्हज् डेज् (1999)
- व्हेन वुईल ऍट्रोसिटिज ऑन हरीजन स्टॉप ः अटल बिहारी वाजपेयी यांचे राज्यसभेतील भाषण (1988)
- हिल द वुन्ड : वाजपेयीज अपिल ऑन आसाम ट्रॅजिडी टू पार्लमेंट (1983)
- नॅशनल इंटिग्रेशन (1961)
- शक्ती से शांती (1999)
- राजनिती की रपतिली रहेम (1997)
- विकारा बिंदू (हिंदी आवृत्ती) (1997)
- कुछ लेख, कुछ भाषण (1996)
- बॅक टू स्क्वेअर (1998)
- डायनॅमिक्स ऑफ ऍन ओपन सोसायटी (1977)
- सेक्युलरवाद : भारतीय परंपरा (डॉ. राजेंद्र प्रसाद स्मारक व्याख्यानमाला) (1996)
अटल बिहारी वाजपेयी कवितासंग्रह
- ट्वेन्टीवन पोएम्स (2003)
- क्या खोया, क्या पाया : अटलबिहारी वाजपेयी, व्यक्तीत्व और कविताएँ (हिंदी आवृत्ती) (1999)
- मेरी इक्यावन कविताएँ (1995)
- श्रेष्ठ कविता (1997)
अटल बिहारी वाजपेयी अल्बम
- नयी दिशा – जगजितसिंह यांच्यासोबत अल्बम (1999)
- संवेदना – जगजितसिंह यांच्यासोबत अल्बम (2002)