सचिन हा स्वाती पेक्षा 5 वर्षांनी मोठा आहे. 5 वर्षापूर्वी सचिनचे वय 11 वर्षे होते ; तर 5 वर्षांनंतर सचिन व स्वाती यांच्या वयातील फरक किती?
1. 15 वर्षे 2. 10 वर्षे 3. 5 वर्षे 4. 20 वर्षे उत्तर : 5 वर्षे
स्पष्टीकरण :- वय वाढले तरी दोघांच्या वयांतील फरक तेवढाच राहतो. सचिन स्वाती पेक्षा 5 वर्षांनी मोठा म्हणजे
फरक 5 वर्षेच राहील.
2).जान्हवी तिच्या आईपेक्षा 27 वर्षांनी लहान आहे. त्या दोघांच्या वयांची बेरीज 49 वर्षे असल्यास जान्हवीच्या आईचे वय किती ? 1. 11 वर्षे 2. 36 वर्षे 3. 34 वर्षे 4. 38 वर्षे उत्तर : 38 वर्षे क्लृप्ती :-दोन संख्यांपैकी मोठी संख्या = (दोन
संख्यांची बेरीज+दोन संख्यातील फरक)÷2(49+27) ÷ 2 = 38
लहान संख्या = (दोन संख्यांची बेरीज – दोन संख्यांतील फरक) ÷ 2 (49-27) ÷ 2 = 11
3).रामचे वय हरीच्या वयाच्या तिप्पट आहे.
दोघांच्या वयांतील फरक 16 वर्षे असल्यास;
त्या दोघांच्या वयांची बेरीज किती?
1. 24 वर्षे
2. 32 वर्षे
3. 40 वर्षे
4. 48 वर्षे
उत्तर : 32 वर्षे
स्पष्टीकरण :-राम व हरीच्या वयांचे प्रमाण = 3x : x
दोघांच्या वयांची बेरीज = 3x + x = 4x
फरक = 3 x – x = 2x =16,
:: x=8
:: 4x = 4×8 = 32