समान सारखाच अर्थ असणाऱ्या शब्दांना समानार्थी शब्द असे म्हणतात. प्रत्येक स्पर्धा परिक्षेत या घटकावर प्रश्न विचारले जातात. त्यामुळे जास्त सराव करा.
- संहार – विनाश, नाश.
- ब्राम्हण – विप्र, द्बिज.
- तोंड – मुख, तुंड, वदन, आनन.
- डोके – मस्तक, शीर्ष, माथा, शिर.
- पाय – चरण, पद, पाय.
- डोळे – नयन, नेत्र, चक्षू, लोचन, अक्षी.
- शरीर – काया, देह, तन, वपू, तनू.
- हात – भुज, हस्त, कर, बाहू.
- कपाळ – ललाट, कपोल, भाळ, निढळ.
- सूर्य – भास्कर, रवी, दिनकर, प्रभाकर, चंडाशू, दिनमणी, अरुण, मित्र, आदित्य,अर्क, भानू.
- वायू – वारा, वात, पवन, अनिल, समीर, मरुत, समीरण.
- अग्नी – विस्तव, अंगार, पावक, अनल.
- अमृत – पीयूष, सुधा.
- दूध – दुग्ध, पय, क्षीर.
- पाणी – जल, उदक, तीर, जीवन, तोय, पय.
- नदी – तटिनी, सरिता, जलवाहिनी.
- समुद्र – रत्नाकर, सागर, दर्या, सिंधू, जलधी, अर्णव.
- तलाव – सारस, तटाक, तडाग, कासार.
- जमीन – भूमी, भू, भुई.
- पर्वत – अचलगिरी, नग, शैल.
- अरण्य – वन, जंगल, कानन, विपिन.
- बेडूक – मंडूक, भेक, दर्दुर.
- कावळा – एकाक्ष, काक, वायस.
- गरुड – खगेंद्र, वैनतेय, द्विजराज.
- पोपट – राघू, शुक, रावा.
- मासा – मत्स्य, मीन.
- भुंगा – भ्रमर, मिलिंद, मधुप, मधुकर, अली.
- पक्षी – अंडज, विहंगम, द्विज, विहंग.
- सिंह – केसरी, वनराज, मृगराज, शार्दूल, वनेंद्र.
- हत्ती – कुंजर, गज, सारंग, पीलू.
- घोडा – अश्व, वारु, हय, तुरंग.
- साप – सर्प, भुजंग, व्याळ.
- आकाश – नभ, आकाश, अंबर, आभाळ, अंतरिक्ष, गगन.
- चांदणे – चंद्रिका, कौमुदी, जोत्स्ना.
- किरण – कर, रश्मी, अंशू.
- वीज – बिजली, विद्युत, चपला, सौदामिनी, विद्युल्लता.
- दिवस – वार, दिन, वासर.
- रात्र – रजनी, यामिनी, निशा, विभावरी, शर्वरी.
- कमल – नलिनी, पंकज, पद्म, नीरज, सरोज.
- झाड – वृक्ष, विटप, पादप, तरु, द्रुम.
- वेल – वल्लरी, लता.
- आश्चर्य – नवल, विस्मय, अचंबा.
- आठवण – स्मरण, स्मृती, याद.
- प्रेम – अनुराग,प्रीती.
- शक्ती – सामर्थ, बल.
- राग – रोष, संताप, क्रोध, तम.
- क्षेम – कुशल, कल्याण, हित.
- सुरुवात – आरंभ, प्रारंभ, श्रीगणेशा.
- सुंदर – मनोहर, ललित, रम्य, सुरेख, रमणीय.
- शेतकरी – कृषिक, कृषीवल.
- फूल – पुष्प, कुसुम, सुमन.
- पान – पल्लव, दल, पत्र, पर्ण.
- बाग – उपवन, उद्यान, बगीचा, वाटिका.
- हरिण – मृग, कुरंग, सारंग.
- ढग – घन, मेघ, अभ्र, नीरद, पयोधर.
- अंधार – काळोख, तम, तिमिर.
- नवरा – पती, नाथ, वल्लभ, कांत, भ्रतार, दादला
- पत्नी – बायको, अर्धांगी, भार्या, दारा, सहधर्मचरिणी, कांता, जाया.
- आई – जन्मदा, माता, जननी, जन्मदात्री.
- मुलगा – पुत्र, सुत, नंदन, आत्मज.
- मुलगी – कन्या, तनुजा, नंदिनी, तनया, दुहिता, आत्मजा.
- इंद्र – देवेंद्र, वज्रपाणी, वासव, सुरेंद्र, पुरंदर.
- शंकर – महेश, शिव, महादेव, नीलकंठ, सांब, सदाशिव.
- विष्णू – चक्रपाणी, नारायण, शेषशायी, रमापती, रमेश, केशव, गोविंद, मधु्सूदन, हृषीकेश.
- लक्ष्मी – कमला, रमा, इंदिरा, पद्मा.
- गणपती – विनायक, गजानन, विघ्नहर्ता, गजमुख, वक्रतुंड, लंबोदर, गणेश.
- पृथ्वी – वसुंधरा, धरित्री, धरणी, वसुधा, क्षमा, अवनी, धरा.
- चंद्र – शशी, सुधाकर, सुधांशू, हिमांशू, शशांक,विधू, इंदू.
- मित्र – दोस्त, सखा, स्नेही.
- वाटसरु – मार्गिक, पथिक, यात्रिक.
- सर्व – समस्त, अखिल, सकल.
- युध्द – समर, लढाई, संग्राम.
- यज्ञ – होम, याग, मख, हवन.
- घर – निवास, सदन, गृह, भवन, धाम, आलय, निकेतन.
- आनंद – प्रमोद, हर्ष, मोद, तोष.
- वडील – तात, पिता, जनक, जन्मदाता, तीर्थरुप.
- स्त्री – ललना, रमणी, नारी, अंगना, वनिता, महिला.
- भाऊ – बंधू, भ्राता, सदोहर.
- माणुस – मानव, मनुष्य.
- देऊळ – देवालय, मंदिर, राऊळ.
- अर्जुन – पार्थ, धनंजय, भारत, फाल्गुन.
- राजा – नृप, भूपती, नरेश, भूपाल भूप, नरेन्द्र.
- ब्रह्मदेव – प्रजापती, कमलासन, विधाता, चतुरानन.