प्रत्येकी तीन तीन अक्षरांचे आठ गण तयार करून त्यांची लयबद्ध आविष्करणे केली जातात त्यांना वृत्ते (किंवा अक्षरगणवृत्ते म्हणतात ह्यांचाच विचार इथे करावयाचा आहे.
vrutte marathi vyakran
अक्षर-गण-वृत्ते म्हणजे लघु-गुरुअक्षरांचे साचेबद्ध आणि व्याकरणनिष्ठ आविष्कार असतात. अक्षरगणवृत्तात लघु म्हणजे र्हस्व उच्चार होणारी अक्षरे आणि गुरू म्हणजे दीर्घ उच्चार होणारी अक्षरे असतात. त्यांचा क्रम, रचनेतल्या प्रत्येक ओळीत पाळण्याचा नियम आहे. यामध्ये एकूण ४ ओळींच्या कडव्यामधील, ४ ही ओळींची गणरचना एकसारखी असते त्यास समवृत्त, २ ओळींची एकसारखी असते त्यास अर्धसमवृत्त अथवा सर्वच ओळींची वेगळी असू शकते त्यास विषमवृत्त म्हणतात. गण म्हणजे तीन अक्षरांचा एक गट असतो. असे एकूण आठ गण आहेत. त्यातील गणांची नावे आणि गणांतील लघुगुरूक्रम खालील सारणीत दिलेले आहेत.
अक्र
गण
लघुगुरूक्रम
द्विमान
चिन्हांकित
१
य
यमाचा
०११
– ऽ ऽ
२
र
राधिका
१०१
ऽ – ऽ
३
त
ताराप
११०
ऽ ऽ –
४
न
नमन
०००
– – –
५
भ
भास्कर
१००
ऽ – –
६
ज
जनास
०१०
– ऽ –
७
स
समरा
००१
– – ऽ
८
म
मानावा
१११
ऽ ऽ ऽ
अक्षरगणवृत्तबद्ध कवितेच्या एका कडव्यात चार ओळी असतात. एका ओळीतील सर्व अक्षरांचे तीन तीनांचे गट पाडायचे. प्रत्येक गटाचा एक गण असतो. मात्र, अक्षरगणवृत्तात बांधलेल्या कवितांच्या ओळींत तीनच्या पटीत न बसणारी अक्षरेही कधी कधी असतात. अशा वेळी शेवटी अधिकतम दोन अक्षरे उरतील. लघु अक्षर उरल्यास त्याचा गण ल आणि गुरू अक्षर उरल्यास त्याचा गण ग धरावा.
थोडक्यात काय तर द्विमान गणितातील ००० ते १११ असे हे आठ संयोग आहेत. ० = लघु, १ = गुरू. अक्षरगणांची मांडणी, पारंपारिक यरतनभजसम अशी न करता (०००, ००१, ०१०, ०११, १००, १०१, ११०, १११) अशा प्रकारे नव्या वैज्ञानिक पद्धतीने केल्यास हीच किल्ली “न सजय भरतम” अशी मांडता येईल. (००० ते १११) याचा अर्थ ‘भारत (कधीही) विजयी होणार नाही‘ असा निघतो. म्हणूनच कदाचित, पारंपारिक मांडणी यरतनभजसम अशी करत असावेत.
बरे शोधल्यावीण बोलो नको हो, जनी चालणे शुद्ध नेमस्त राहो ॥
कृष्णाजी नारायण आठल्ये ह्यांची प्रख्यात कविता “प्रमाण” हीही ह्याच वृत्तात लिहिली आहे.
अतीकोपता कार्य जाते लयाला, अती नम्रता पात्र होते भयाला ।
अती काम ते कोणतेही नसावे, प्रमाणामधे सर्व काही असावे ।।
वसंततिलका वसंत ऋतू म्हणजे कुसुमाकर. त्याचा तिलक म्हणजे वसंततिलक, अर्थात पुष्पगंध. हे मराठीतील एक सुंदर अक्षरगणवृत्त आहे. ह्याच्या प्रत्येक ओळीत १४ अक्षरे आणि त भ ज ज ग ग हे गण येतात. त्यामुळे वृत्ताची चाल ठरलेली असते.
लक्षणगीतः
जाणा वसंततिलका व्हय तेचि वृत्त । येती जिथे त भ ज जा ग ग हे सुवृत्त ॥
तुझी वाणी कोणी म्हणत गुण हा अद्भुत असे ।मला वाटे मोठा तुजजवळ हा दोषच वसे ॥
शुका तीच्या योगे सतत पिंजर्यामाजि पडशी ।गड्या स्वातंत्र्याच्या अनुपम सुखा सर्व मुकशी ॥
मंदाक्रांता
कालीदासाने मेघदूत हे महाकाव्य मंदाक्रांता वृत्तात रचले आहे. पूर्वमेघ (६३) आणि उत्तरमेघ (५४) मिळून, एकूण चार चार ओळींची १२७ कडवी ह्या महाकाव्यात आहेत. रामगिरीवरील आश्रमात शापित यक्ष, अलकापुरीतील आपल्या वास्तव्याची आठवण करत असता, तिथून अलकापुरीस जाणारे मेघ त्याला दिसतात. त्या मेघांतील एकालाच आपला दूत करून त्याचेजवळ आपल्या प्रियतमेस केवळ सजीवाकरवीच पाठवावा असा प्रीतीचा संदेश तो पाठवतो. मेघमार्गावरील, भरतवर्षातील सर्व ठिकाणांची वर्षाकालीन सुंदर वर्णने हे ह्या महाकाव्याचे देखणे अलंकार आहेत. त्या यक्षाला शाप कसा मिळाला, काय मिळाला इथपासून सुरू होणारी काव्यात्मक कथा, मेघाला वर्षावैभव प्राप्त होऊन सौदामिनीसोबत रत होत असता, विरहाची अनुभूती कधीही न येवो अशी कामना यक्ष व्यक्त करतो, तिथवर जाऊन थांबते!
पदी गण जसा जसा यलग वृत्त पृथ्वी म्हणा ।पदी गण जसा जसा यलग वृत्त पृथ्वी म्हणा ॥
उदाहरणः
कड्यावरूनिया उड्या धडधडा पये टाकिती ।करून गुरुगर्जना निकट देश नादावती ॥
दुधापरी जलौघ ते मज बघावया ते कदा ।फिरून मिळतील गा कधी तरी उदरांबुदा ॥ – भा.रा.तांबे
शार्दूलविक्रीडित
लग्नाची मंगलाष्टके सामान्यतः शार्दूलविक्रीडितात रचली गेलेली असल्याने हे वृत्त सर्वात अधिक लोकप्रिय वृत्त आहे. लग्नात जरी हे वृत्त एका विशिष्ट चालीत म्हणत असले, तरी ह्या वृत्तातली कविता, वृत्ताच्या पारंपारिक लक्षणगीताने व्यक्तवलेल्या चालीतच म्हटली जात असते.
लक्षणगीतः
आहे वृत्त विशाल त्यास म्हणती शार्दूलविक्रीडित
मा सा जा स त ता ग येति गण हे पादास की जोडित
मानावा समरा जनास समरा ताराप ताराप गा
मानावा समरा जनास समरा ताराप ताराप गा
उदाहरणः
सन्तप्तायसि संस्थितस्य पयसो नामापि न ज्ञायते ।
मुक्ताकारतया तदेव नलिनीपत्रस्थितं राजते ॥
स्वात्यां सागरशुक्तिमध्यपतितं तन्मौक्तिकं जायते ।
प्रायेणाधममध्यमोत्तमगुणः संसर्गतो जायते ॥
– नीतिशतक, राजा भर्तृहरी, ख्रिस्तपूर्व-५६
तोयाचे परि नावही नच उरे संतप्त लोहावरी ।
ते भासे नलिनीदलावरि पहा सन्मौक्तिकाचे परी ॥
ते स्वातीस्तव अब्धिशुक्तिपुटकी मोती घडे नेटके ।
जाणा उत्तममध्यमाधमदशा संसर्ग योगे टिके ॥
– नीतिशतकाचा मराठी अनुवाद, वामन पंडित (वामन नरहरी शेष), ख्रिस्तोत्तर १७-वे शतक
मंदारमाला
लक्षणगीतः
मंदारमाला कवी बोलती हीस, कोणी हिला अश्वघाटी असे ।
साता तकारी जिथे हा घडे पाद, तेथे गुरू एक अंती वसे ॥
ताराप ताराप ताराप ताराप, ताराप ताराप ताराप गा ।
उदाहरणः
ना.वा. ऊर्फ रेव्हरंड टिळक ह्यांची एक अतिशय नादमय रचना आहे, “माझ्या मातृभूमीचे नाव”.
सृष्टी तुला वाहुनी धन्य माते, अशी रूपसंपन्न तू निस्तुला ।
तू कामधेनू ! खरी कल्पवल्ली, सदा लोभला लोक सारा तुला ॥
या वैभवाला तुझ्या पाहुनीया, मला स्फूर्ति नृत्यार्थ होई जरी ।
सामर्थ्य नामी तुझ्या आर्यभूमी, तसे पाहिले मी न कोठे तरी ! ॥