भारतीय बेटे – मुख्य भूमीपासून अलग असलेली बेटे ही देशाच्या प्राकृतिक रचनेचा एक भाग आहेत. अरबी समुद्रातील बेटे, बंगालच्या उपसागरातील बेटे, अंदमान मधिल बेटांचे नामकरण, व भारतातील अन्य बेटे सर्वांची सविस्तर माहिती.
✽ अरबी समुद्रातील बेटे (लक्षद्वीप, मिनिकॉय व अमिनीदिवी बेटे)
- लक्षद्वीप, मिनिकॉय व अमिनदीवी बेटें ही प्रवाळांच्या संचयनातून निर्माण झालेली बेटे आहेत.
- लक्षद्वीप, मालदीव व छागोस द्वीपसमूह ही अरबी समुद्रातील बेटे म्हणजेच जलमग्न पर्वतीय रांगेचे अतिउत्तरेकडील भाग आहेत.
- लक्षद्वीप यांचा शब्दश: अर्थ ‘एक लाख बेटे’ असा असला तरी प्रत्यक्षात अरबी समुद्रातील द्वीप समूहात केवळ 36 बेटांचा किंवा शैला भित्तीचा समूह आढळतो.
- अरबी समुद्रात ज्वालामुखी पर्वतांच्या शिखरावरांभोवती किटकांच्या संचयलाणामुळे निर्मिती झालेल्या लक्षद्वीप बेटांना प्रवाळांची कंकण द्वीपे म्हणतात.
- लक्षद्वीप बेट समूहात मिनीकाॅय ,कावरती, लखदीव, अमिनी, किलतान, कादमत इत्यादी बेटांचा समावेश होतो.
- लक्षद्वीप बेटांचे क्षेत्रफळ 32 चौकिमी असून तो भारतातील सर्वात लहान केंद्रशासित प्रदेश आहे.
- लक्षदीप मधील एकमेव विमानतळ ‘अगाती विमानतळ’ हा मुख्य भूमीवर केरळमधील कोची या शहरास जोडला गेला आहे.
- लक्षद्विप परिसरात स्कूबा डायव्हिंग, विंडसर्फिंग, वॉटरस्किइंग इत्यादी जलक्रीडा यांच्या माध्यमातून हा परिसर पर्यटकांचे आकर्षण स्थान बनवण्यात आले आहे.
- Indian Island Information in Marathi कॅनेनोर बेटे व अमिनदीवि बेटे हे लक्षद्वीप बेटांचे भाग आहेत.
✽ बंगालच्या उपसागरातील बेटे (अंदमान- निकोबार बेटे)
- बंगालच्या उपसागरातील बेटे ही समुद्रात बुडालेल्या ‘आव्हाकानयोमा’ या पर्वताची शिखरे आहेत.
- अंदमान निकोबार बेटे ही प्रामुख्याने ज्वालामुखी निर्मित असून या भागातील एकूण 552 बेटांपैकी 34 बेटांवर मानवी वस्ती आहे.
- अंदमान बेट समूहात लहान-मोठी सुमारे 304 बेटे आहेत तर निकोबार बेट संवाद सुमारे 22 बेटे आढळतात.
- अंदमान बेटे निकोबार बेटें पासून 10 अंश चॅनेल द्वारा विभागली गेली आहे.
- अंदमान बेटाचे मोठे अंदमान व लहान अंदमान असे दोन भाग आहेत.
- मोठी अंदमान चे उत्तर ,मध्य व दक्षिण अंदमान असे भाग आहेत.
- दहा अंश खाडीच्या दक्षिणेकडील निकोबार हा 22 बेटांचा समूह असून त्यातील 10 बेटांवर मानवी वस्ती आहे.
- अंदमान निकोबार ची राजधानी असलेले पोर्टब्लेअर मुख्य भूमीशी चेन्नई, विशाखापटनम व कोलकाता या शहरांना जोडलेले आहेत.
- अंदमान निकोबार मधील लक्षद्वीप च्या तुलनेत पर्यटन क्षेत्र पोर्टब्लेअर व त्याच्या जवळच्या काही बेटांपुरतेच मर्यादित आहे. कारण या भेट समूहातील कमी होत चाललेल्या आदिवासी जमातींना संरक्षण देणे हे सरकारने मुख्य ध्येय मानले आहे.
- अंदमान बेट समूहात प्रवाळ बेटे आढळत नाहीत.
✽ अंदमान मधील तीन बेटांचे नामकरण :-
नेताजी सुभाष चंद्र बोस यांनी स्थापन केलेल्या आझाद हिंद सेनेस 2018 मध्ये 75 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 30 डिसेंबर 2018 रोजी अंदमान मधील तीन बेटांचे नामकरण केले.
1) राज आयलँड:-नेताजी सुभाष चंद्र बोस द्वीप
2) निल बेटे:-शहीद द्वीप
3) हॅवलाॅक बेटे:-स्वराज द्वीप
✽ भारतातील अन्य बेटे :-
- भारतात समुद्रातील सुमारे 1,382 बेटे आहेत.
- बंगालच्या उपसागराच्या किनाऱ्यावर ‘अवसादी बेटे’ आहेत.
- कच्छच्या आखातात झालेल सदृश्य प्रवाळांच्या शैल भिंतीच्या स्वरूपातील बेटे आहेत.
- कोकण व मलबार किनार्यालगत छोटी बेटे आढळतात.
- Bhartiya Betanbaddal mahiti Marathi information
- न्यू -मरे हे बंगालच्या उपसागरातील बेट (हरिभंगा नदीलगत) भारताच्या मालकीचे आहे. या बेटावरून भारत व बांगलादेश या राष्ट्रांमध्ये वाद सुरू आहे.
- ‘बॅरियर आयलंड’ आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यावर वाळूच्या संचलनाने श्रीहरीकोटा येथे तयार झालेला आहे.