स्पर्धा परिक्षा म्हणजे, “इसमें तेरा घाटा, मेरा कुछ नहीं जाता” नक्की वाचा

स्पर्धा परिक्षा देताना संयम हे सर्वात मोठे यश आहे, मी तर म्हणेल या जगात सुखी रहायचे असेल तर दु:खातही आनंद मानला पाहिजे. तुका म्हणे, “ठेवले अनंती तैसेच रहावे.चित्ती असू द्यावे समाधान.”
tera%2Bghata%2Bmera%2Bkuch%2Bnahi%2Bjaata

 

मुळातच मनुष्य हा सहनशील प्राणी आहे. पण आजच्या युगात आपण आपली सहनशक्ती कुठेतरी दूर ठेऊन आलो आहे. यातून बाहेर येण्यासाठी अनेक मार्ग विद्यवान, संत, महंतांनी सांगितले आहे. तरीही या दुष्टचक्रातून आपण बाहेर पडू शकलेलो नाही.
आयुष्यात असा एकही दिवस उगवत नाही ज्या दिवशी आपण दु:खी होत नाही, निराश होत नाही, तणावग्रस्त होत नाही. ही नित्यनेमाची गोष्ट झाली आहे आयुष्यात. तरीही आपण ती अजून पर्यंत सहन करु शकलो नाही.
मित्रांनो, मुळातच ज्याची सुखी होण्याची इच्छा असते त्याला कोणीही दु:खी करु शकत नाही. मग ती आयोगाची परीक्षा का असेना. सुख आणि दुख या भ्रामक कल्पना आहे. आपण आहे त्या क्षणात आनंद व समाधान मानले तर जगातील सर्व सुखे तुमच्या पुढे लोटांगण घालतील.
विद्यार्थी मित्रहो, परीक्षा जवळ आली अन अभ्यास झाला नाही असे म्हणून आता रडत बसू नका. कारण- ‘अश्रू दे दुबळ्या मनाचे प्रतीक आहे. जगातील कोणत्याही दुःखाची आग अश्रूंच्या पाण्याने कधीच विझत नसते.’ तसेच ‘संकट हे रडणाऱ्याला अधिक घाबरवते. पण लढणाऱ्याला भिऊन पळून जाते’. तेव्हा शांत मनाने परीक्षेची मजा घ्या. थोडा वेळ द्या, सेट व्हा, मग काय नुसते चौकार षटकार मारता येतील. शेवटी तुम्ही वर्षभर काय केले याला महत्व नाही. परीक्षेच्या दिवशी तुम्ही काय केले यावरच तुमचे यश अवलंबून आहे.

‘केल्याने होत आहे आधी केलिची पाहिजे’. तुका म्हणे, ”येथे पाहिजे जातीचे, येरा गबाळाचे काम नाही,”

मागील वर्षभर आपण अभ्यास करत आहोत पण आता प्रत्यक्ष परीक्षा देण्याची वेळ समीप आली आहे. तेव्हा अभ्यास करणे थांबवा व रिव्हिजन तसेच सरावाला महत्व द्या. हे करत असतांना ‘माझे हे चुकले, ते राहिले’ या गोष्टींवर आता लक्ष देऊ नका. जे होयचे आहे ते परीक्षेच्या दिवशी होईलच. फक्त आनंदी व समाधानी रहा. गरजेनुसार झोप घ्या, पोटापेक्षा कमी खा व तणाव विरहित जगा.
माझे काम सांगायचे आहे ऐकायचे की नाही ते तुमच्यावर सोडतो. शेवटी “इसमें तेरा घाटा. मेरा कुछ नहीं जाता.” लेखण – (आदित्य ॲकॅडमी)