‘ग्रीन बुक’ला सर्वाधिक ‘गोल्डन ग्लोब’ पुरस्कार

‘ग्रीन बुक’ या कालनाटय़ाधारित चित्रपटाला तीन पुरस्कार मिळाले आहेत. त्यात उत्तम चित्रपट, संगीत व विनोद या तीन प्रवर्गात या चित्रपटाने बाजी मारली आहे. राणी अॅनीच्या जीवनचरित्रावरील ‘बोहेमियन ऱ्हापसोडी’ चित्रपटाने उत्तम नाटय़प्रकारात ‘अ स्टार इज बॉर्न’ला मात दिली आहे. चित्रपट व दूरचित्रवाणी मालिका यांच्यासाठी हे पुरस्कार दिले जातात. अँडी सॅमबर्ग व सँड्रा ओह यांनी या हॉलिवूड पुरस्कार कार्यक्रमाचे संचालन केले.
golden%2Bglob%2Bawards
ग्रीन बुकला उत्तम नाटय़, उत्तम सहायक अभिनेता (महेरशाला अली), उत्तम पटकथा (लेखक पीटर, फॅरेली, ब्रायन क्युरी व निकल व्हॅलेलोंगा) हे तीन पुरस्कार मिळाले.
बोहेमियन ऱ्हापसोडीने उत्तम नाटय़ गटात (संगीत चरित्रपट), अ स्टार इज बॉर्न, ब्लॅक पँथर , इफ बिएल स्ट्रीट कुड टॉक, ब्लॅक्सान्समन यांना मागे टाकले. बनिर्माते ग्रॅहॅम किंग यांनी सांगितले, की पुरस्काराची अपेक्षा नव्हती, पण अभिनेता रामी मलेक याचा पुरस्कार अपेक्षित होता. मुंबईत जन्मलेल्या ब्रिटिश रॉकर फ्रेडी मक्र्युरीची भूमिका त्याने केली होती. मलेक व किंग यांनी आभाराच्या  भाषणात दिग्दर्शक ब्रायन सिंगर यांचे नाव घेतले नाही.
‘दी वाइफ’ या चित्रपटातील भूमिकेसाठी मिळालेल्या गोल्डन गोल्ब पुरस्कारावर भाषण करताना अभिनेत्री ग्लेन क्लोज यांनी रंगत आणली. ७१ वर्षांच्या ग्लेन यांना अश्रू आवरले नाहीत. यावर माझा विश्वासच बसत नाही असे त्या म्हणाल्या. स्त्री म्हणून आम्ही मुलाबाळांचे संगोपन करणे अपेक्षित असते, पण आम्ही आमची स्वप्नेही पूर्ण करू शकतो. मी हे करू शकते व मला ते करू दिले गेले पाहिजे असा हट्ट महिलांनी धरला पाहिजे असे त्या म्हणाल्या. याच वेळी विनोदी व संगीत पटांच्या वर्गात उत्कृष्ट अभिनेत्री ठरलेल्या ऑलिव्हिया कोलमन हिने राशेल वेझ, एम्मा स्टोन या सहअभिनेत्रींचे ऋण व्यक्त केले. राणी अॅनीची भूमिका करताना खाण्याचे स्वातंत्र्य अनुभवले.
गोल्डन ग्लोब पुरस्कार विजेते :
  • सर्वोत्कृष्ट चित्रपट (नाटय़)- बोरेमियन रापसोडी
  • सर्वोत्कृष्ट चित्रपट ( संगीत व विनोद)- ग्रीन बुक
  • सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक- अल्फान्सो क्युरॉ- रोमा
  • सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (नाटय़)- ग्लेन क्लोज (दी वाईफ)
  • सर्वोत्कृष्ट अभिनेता (नाटय़)- रामी मलेक (बोहेमियन रापसोडी)
  • सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (सांगितिक व विनोदी) – ऑलिव्हिया कोलमन ( द फेव्हराइट)
  • सर्वोत्कृष्ट अभिनेता  (सांगितिक व विनोदी)-ख्रिस्तीयन बेल (व्हाइस)
  • सर्वोत्कृष्ट सहअभिनेत्री- रेगिना किंग (इफ बिएल स्ट्रीट कुड टॉक)
  • सर्वोत्कृष्ट सहअभिनेता-महेरशाला अली (ग्रीन बुक)
  • सर्वोत्कृष्ट पटकथा- निक व्हॅलेलोंगा, ब्रायन क्युरी व पीटर फॅरेली (ग्रीन बुक)
  • सर्वोत्कृष्ट अॅनिमेशनपट- स्पायडर मॅन- इनटू दी स्पायडर व्हर्स
  • सर्वोत्कृष्ट परदेशी भाषा चित्रपट- रोमा
  • सर्वोत्कृष्ट मूळ संगीत- जस्टीन हुरवित्झ (फर्स्ट मॅन)
  • सर्वोत्कृष्ट मूळ गीत- शॅलो (अ स्टार इज बॉर्न)
दूरचित्रवाणी मालिका :
  • नाटय़- द अमेरिकन्स एफएक्स
  • सर्वोत्कृष्ट अभिनेत्री- सँड्रा ओह (कििलग फाइव्ह)
  • सर्वोत्कृष्ट अभिनेता- रिचर्ड मॅडेन (बॉडीगार्ड)
  • सर्वोत्कृष्ट मालिका (सांगीतिक किंवा विनोदी)- दी कोमेन्स्कीर मेथड- नेटफ्लिक्स
  • सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (सांगीतिक किंवा विनोदी)- राशेल ब्रॉसनहान (दी माव्‌र्हलस मिसेस मेसेल)
  • सर्वोत्कृष्ट अभिनेता (सांगीतिक किंवा विनोदी)- मायकेल डग्लस (दी कोमेन्स्की मेथड)
  • दूरचित्रवाणी चित्रपट किंवा मालिका- दी अॅसेसिनेशन ऑफ गियानी व्हेर्सेस अमेरिकन क्राइम स्टोरी- एफएक्स.
  • सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (दूरचित्रवाणी चित्रपट किंवा मालिका)-  पॅट्रिशिया अरक्वेट ( एस्केप अॅट डॅनेमोरा)
  • सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (दूरचित्रवाणी चित्रपट किंवा मालिका)- डॅरेन क्रिस (दी अॅसेसिनेशन ऑफ गियानी व्हेर्सेस अमेरिकन क्राइम स्टोरी- एफएक्स.)
  • सर्वोत्कृष्ट सहअभिनेत्री  (दूरचित्रवाणी चित्रपट किंवा मालिका)- पॅट्रिशिया क्लार्कसन (शार्प ऑब्जेक्ट्स)
  • सर्वोत्कृष्ट सहअभिनेता- बेन विशॉ (अ व्हेरी इंग्लिश स्कँडल)