पुरस्काराविषयी :
- जोसेफ पुलित्झर हे त्यांच्या काळातले अमेरिकेचे एक प्रसिद्ध पत्रकार होते. त्यांच्या मृत्युपत्रानुसार, उत्तम लिखाणास प्रोत्साहन प्रदान करण्याच्या हेतूने 1917 साली पुलित्झर पारितोषिकाची स्थापना करण्यात आली.
- पत्रकारितेमध्ये चार, पत्र आणि नाटक प्रवर्गात चार, शिक्षण प्रवर्गात एक पुरस्कार आणि सोबतच पाच शिष्यवृत्त्या दिल्या जातात. हा पुरस्कार अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठाकडून दिला जातो.
- अरेथा फ्रँकलिन यांना संगीतात विशेष मानपत्र देण्यात आले.
- मेरीलँड येथील 2018 सालाच्या गोळीबारात पाच कर्मचारी गमावलेल्या अॅनापोलिसच्या ‘कॅपिटल गॅझेट’ वृत्तपत्राला गौरवण्यात आले.
- न्यूयॉर्कच्या कोलंबिया विद्यापीठात आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात ‘पुलित्झर पारितोषिक 2019’ या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली.
- अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्याबाबत शोधपत्रकारितेवर आधारित बातम्या देणाऱ्या ‘द न्यूयॉर्क टाइम्स’, ‘द वॉल स्ट्रीट जर्नल’ या पत्रकारिता संस्थांनी पुलित्झर पारितोषिक पटकावले आहेत.
इतर प्रवर्गातले पुरस्कार विजेते :
❇ लोकसेवा – ‘द साऊथ फ्लोरिडा सन सेटिंनल’
❇ ब्रेकिंग न्यूज – पिट्सबर्ग पोस्ट गॅझेट
❇ ब्रेकिंग न्यूज फोटोग्राफी – रॉयटर्स
❇ कथा – रिचर्ड पॉवर्स (द ओव्हरस्टोरी कथेसाठी)
❇ नाटक – जॅकी सिब्लिस ड्ररी
❇ इतिहास – डेव्हीड ब्लाइट (“फ्रेड्रिक डग्लस – प्रॉफेट ऑफ फ्रीडम” या पुस्तकास)
❇ जीवनचरित्र – जेफ्री स्टेवर्ट (“द न्यू नेग्रो – द लाइफ ऑफ अलेन लॉकी” या पुस्तकासाठी)
❇ कविता – फॉरेस्ट गँडर (“बी विथ” या काव्यसंग्रहासाठी)
❇ ललित लेखन – एलिझा ग्रिसवोल्ड (“अॅमिटी
❇ अँड प्रॉस्परिटी – वन फॅमिली अँड द फ्रॅक्चरिंग ऑफ अमेरिका” या पुस्तकासाठी)
❇ संगीत – एलेन रीड (‘प्रिझ्म’ या रचनेस)
❇ आंतरराष्ट्रीय वार्ताकन पुरस्कार – असोसिएटेड प्रेस (येमेन युद्धाच्या वार्ताकनासाठी)
❇ आंतरराष्ट्रीय वार्ताकन पुरस्कार – रॉयटर्स (म्यानमारमधील रोहिंग्या मुस्लिमांवर झालेल्या अत्याचारप्रकरणी वार्ताकनासाठी)