PSI-STI-ASO पुर्व परिक्षेसाठी पुढील 30 दिवसांचे नियोजन कसे कराल…?

कोव्हीड, लाकडाऊन आणि यथावकाश पुढे जात राहीलेल्या MPSC परीक्षांच्या तारखा यामुळे निर्माण झालेलं नैराश्याचे वातावरण आणि आलेली मरगळ मागे सोडून 4 सप्टेंबरला असलेल्या संयुक्त(PSI-STI-ASO) पुर्व परिक्षेसाठी सर्वांनी सज्ज व्हायला पाहिजे , आता पर्यंत सर्व परीक्षार्थींनी खुप सहन केलं आहे पण आता या सगळ्या दबावाला उत्तर देण्याची वेळ आली आहे , या परिक्षेचे एक महिन्यापुर्वीचे नियोजन सदर लेखात पाहू

मागील किमान 2 ते 3 वर्षांहुन अधिक कालावधी पासुन स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करणा-या साठी सदर लेख आहे यात तुम्हाला संयुक्त पुर्व परिक्षेचा संपुर्ण अभ्यासक्रम आणि पटर्न माहीती असणे ग्राह्य आहे.

Combine 2Bexam 2BStudents

PSI-STI-ASO पदांसाठी पुर्वी वेगवेगळ्या पुर्व परिक्षा घेतल्या जायच्या आता संयुक्तपणे एकच पुर्व घेतली जाते, पुर्वी प्रत्येक पदांची गरज लक्षात घेऊन पुर्व‌ला एक विशिष्ट प्रश्नपध्दती होती उदाहरणार्थ STI पुर्व‌चा पेपर अर्थव्यवस्था आणि तथ्यात्मक अधिक असायचा.परंतु आता होणार्या संयुक्तपणे पुर्व परिक्षेचा अंदाज लावणे कठिण झाले आहे, मागील संयुक्त पुर्व परिक्षेचा अंदाज घेतल्यावर संयुक्त पुर्व परिक्षा ही “मीनी राज्यसेवा GS पूर्व” परिक्षा असते असे लक्षात येते. त्यामुळे चतुरस्त्र तयारी असणे महत्त्वाचे आहे.

21 मार्च च्या राज्यसेवा पूर्व परीक्षेवरुन‌ GS , गणित आणि बुध्दिमत्ता इत्यादी प्रश्र्नांच्या काठिण्य पातळी आधारे 4 सप्टेंबर च्या‌ येणाऱ्या परिक्षांसाठीचा अंदाज लावणे आवश्यक आहे. तेवढी काठिण्य पातळी किंवा त्यापेक्षा अधिकसाठी उरलेल्या दिवसात तयार‌ राहणे आवश्यक आहे‌.

MPSC चे विशेषत – PSI-STI-ASO परिक्षांना आतापर्यंत विचारलेले मागील सर्व प्रश्न विश्लेषण सहित सोडवुन घ्यावेत, परिक्षेच्या दिवसांपर्यंत दररोज एक तास या प्रश्र्नांच्या वाचन आणि आकलनला वेळ देणे अनिवार्य आहे हे प्रश्र्न सर्वात चांगले मार्गदर्शक तर आहेतच शिवाय 10% प्रत्यक्ष पुनरावृत्ती आणि 20-25% अप्रत्यक्ष पुनरावृत्ती होते तसेच मागील प्रश्र्नांच्या पर्यायावरुन पुढील परिक्षेत प्रश्न तयार होण्याचे स्वरुप ही दिसुन येते त्यामुळे संपूर्ण अभ्यासात मागील वर्षीच्या प्रश्नपत्रिकांना दुर्लक्षुन चालणारे नाही

अभ्यास साहित्य- ज्या विषयाला आतापर्यंत जे वाचलंय त्याचीच‌ आता उजळणी करावी नवीन साहित्य वाचु‌ नये, प्रत्येक विषयासाठी कमीत कमी साहित्य निवडणे
फक्त एक महिना राहील्याने बेसिक साहित्य आणि मुळ संकल्पना प्राधान्याने करायला पाहिजेत

गणित आणि बुद्धिमत्ता – हमखास गुण मिळवुन देणारा विषय आहे दररोज किमान दोन तास यांच्या तयारी साठी द्यावा. मागील परिक्षांमध्ये विचारलेले गणित आणि बुध्दिमत्तेचे सर्व प्रकाराची प्रत्येकी 25-30 प्रश्र्न सोडवुन सराव करावा जेणेकरून विचारले जाणारे सर्व प्रकार परिक्षेमध्ये सहज रित्या सुटतील.

चालु घडामोडी – 1 जानेवारी 2019 पासुन 31 डिसेंबर 2019 पर्यंतंचे सर्व चालु घडामोडी उजळणी तुम्ही राज्यसेवा परीक्षांसाठी केली असेल तर ती पुन्हा एकदा जलद उजळणी करावी, 1 जानेवारी 2020 ते 31 डिसेंबर 2020 च्या चालु घडामोडी आपल्या साठी विशेष महत्वाच्या आहेत,त्याची उजळणी करावी . 1 जानेवारी 2021 ते 30 मार्च 2021 चे चालु घडामोडी तुम्ही गट ब पुर्व च्या (11 एप्रिल 2021 आधीची तारीख)साठी केलेच असेल त्याचीही उजळणी करणे अपेक्षित आहे. चालु घडामोडी चे प्रश्न आणि तयारी याबाबत यावर्षी हा घटक पेपर ला जरा रिस्की आहे परंतु सावध राहुन चतुरस्त्र तयारी ठेवा. येणाऱ्या दिवसांत चालु घडामोडी बाबतीत तसेच इतरही आयोगाच्या सुचनांकडे विशेष लक्ष द्यावे.

महाराष्ट्र माझा – महाराष्ट्र भुगोल, इतिहास आणि समाजसुधारक इत्यादी घटकांची विशेष उजळणी या महिन्यात करुन घ्यावी, या घटकांवरील प्रश्न विशेष तयारी असणार्यांचेच बरोबर येतात.

गुण देणारे विषय – भुगोल, राज्यव्यवस्था, चालु घडामोडी आणि गणित बुद्धिमत्ता चाचणी या हमखास विषय देणारे विषय प्राधान्याने उजळणी करुन ठेवा. त्यातील फॅट्स पाठ करुन ठेवा . सतत उजळणी करत रहा

आऊटपुट कमी देणारे विषय – सामान्य विज्ञान, इतिहास या विषयांच्या बाबतीत मागील वर्षी विचारलेले सर्व प्रश्न पाठ करुन घ्या, त्यांचे विश्लेषण करीत रहा. या विषयांसाठी कमीत कमी साहीत्य निवडुन तेच उजळणी करीत रहा .

वेळ व्यवस्थापन – PSI-STI-ASO पुर्व परिक्षेचे आव्हान म्हणजे एक तासांत पेपर सोडविणे होय. इथुन पुढे त्या वेळेचे व्यवस्थापन करण्यावर विशेष भर दिला पाहिजे. एक महिनाभर 11 ते 12 या परिक्षेच्या वेळेतच जमेल तसे दररोज एक सराव प्रश्नपत्रिका सोडवण्याचा प्रयत्न करावा. 30 दिवसांत 30 चुका(वेळ, मानसिकता, रणनीती संबंधित) सापडल्या आणि त्यावर तयारी केली तरी प्रत्यक्ष पेपर ला प्रभावी वेळ व्यवस्थापन होईल. (अभ्यास कमी असणाऱ्या परीक्षार्थींनी उजळणी वर अधिक भर देऊन किमान 5 ते 10 प्रश्नपत्रिका तरी सोडवा आणि त्यांचे विस्तृत विश्लेषण करा )

प्रश्नपत्रिका सराव – आयोगाच्या मागील प्रश्नपत्रिका आणि उपलब्ध सर्व संस्थांच्या सराव प्रश्नपत्रिका सोडवुन घेणे चूकलेले आणि न सोडवलेले प्रश्नांच्या विश्लेषणा आधारे कच्चे घटक दररोजच्या दररोज पक्के करत रहा.

परिक्षेची तयारी – दररोजचा अर्धा तास परिक्षा रणनीती, नियोजन, मानसिकता आणि आपला अभ्यास यांच्या अवलोकनासाठी द्यायला हवा जेणेकरून आपल्यातील कमतरता कमी होत जाऊन परिक्षेसाठी आपण सक्षम होत जाऊ.

हा एक महिना एवढी जीव लावुन तयारी करा की पुर्व परीक्षेच्या संध्याकाळी मुख्य परीक्षेची तयारी सुरू करता आली पाहिजे. हा एक महिना सिनीअर परीक्षार्थींसाठी स्वतः ला सिद्ध करण्यासाठीची सर्वोत्तम संधी आहे. त्यामुळे वस्तुस्थिती चे भान ठेवून नियोजन करा आणि बेभान होऊन अंमलात आणा. यश नक्कीच मिळेल….!

नितिन बऱ्हाटे
9867637685
(लेखक “लोकनीति IAS, मुंबई”चे मुख्य समन्वयक असुन स्पर्धापरिक्षा मार्गदर्शक आहेत)