भारतात आतापर्यंत ज्या घटना घडल्यात त्यापैकी सर्वात अगोदर कोणती घटना घडली यांची थ्योडक्यात माहिती पाहूया.
- भारतातील पहिला मेडिकल पार्क – चेन्नई (तमिळनाडू)
- सांडपाणी व मलजल धोरण जाहीर करणारे पहिले राज्य – राजस्थान
- आधार कार्डवर चालणारे पहिले एटीएम – डीसीबी बँक, मुंबई.
- पहिली विमान पार्क – बगोदरा (गुजरात)
- स्वाईन फ्ल्यूची लस मोफत देणारे राज्य – महाराष्ट्र
- पहिले सेंद्रिय कृषी विद्यापीठ – गुजरात
- बेटावरील पहिला जिल्हा – माजुली (आसाम)
- पहिले आधार गाव – टेंभली (नंदुरबार)
- पहिले केरोसिन मुक्त शहर – चांदीगड
- पहिले झोपडीमुक्त शहर – चांदीगड
- पहिली फूड बँक – दिल्ली
- इ- गव्हर्नन्स धोरण राबविणारे पहिले राज्य- महाराष्ट्र
- इ- कॅबिनेट वापरणारे पहिले राज्य – आंध्र प्रदेश
- जन सुरक्षा कायदा करणारे पहिले राज्य – आंध्र प्रदेश
- वायफाय सुविधा देणारे पहिले रेल्वे स्थानक – बंगळुरू
- राज्य फुलपाखरू घोषित करणारे पहिले राज्य – महाराष्ट्र
- भारतातील पहिली स्त्री बटालियन – हडीरानी (राजस्थान)
- पहिले ई-पंचायत सुरू करणारे राज्य – महाराष्ट्र
- ग्रामपंचायतीमध्ये ई-बँकिंग सुविधा देणारे पहिले राज्य – महाराष्ट्र
- सिकलसेल आजार ग्रस्तांना मोफत एसटी प्रवास सुविधा देणारे राज्य – महाराष्ट्र
- क्रीडा धोरण जाहीर करणारे पहिले राज्य – महाराष्ट्र
- युवा धोरण जाहीर करणारे पहिले राज्य – महाराष्ट्र
- भूजलसंबंधी कायदे करणारे पहिले राज्य – महाराष्ट्र
- स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ईव्हीएमवर नोटा पर्याय देणारे पहिले राज्य – महाराष्ट्र
- सामाजिक बहिष्काराविरुद्ध कायदा करणारे पहिले राज्य – महाराष्ट्र
- सेवा हमी कायद्यातील 369 सेवा ऑनलाइन देणारे पहिले राज्य – महाराष्ट्र
- डिजिटल लॉकर सुविधा देणारी पहिली नगरपालिका – राहुरी (अहमदनगर)
- ऑनलाइन मतदान सुविधा देणारे पहिले राज्य – गुजरात
- ई-रेशन कार्ड देणारे पहिले राज्य – नवी दिल्ली
- पंचायत निवडणुकीसाठी शैक्षणिक पात्रता बंधनकारक करणारे पहिले राज्य – राजस्थान
- देशातील पहिले ग्रीनफील्ड खाजगी विमानतळ – अंदल (पश्चिम बंगाल)
- पहिले धूम्रपानमुक्त शहर – कोहिमा (नागालँड)
- आशियातील सर्वांत स्वच्छ गाव – मेलीनॉन्ग (मेघालय)
- पदवीपर्यन्त लैंगिक शिक्षण सक्तीचे करणारे राज्य – तेलंगणा
- बालकच्या जन्मानंतर लगेच आधार नोंदणी करणारे पहिले राज्य – हरियाणा
- शहर प्राणी घोषित करणारे पहिले शहर – गुवाहाटी (गंगेतील डॉल्फिन)
- गुन्हेगारांची डीएनए रेखाचित्रित करून ठेवणारे पहिले राज्य – आंध्रप्रदेश
- पहिले महिला न्यायालय – माल्डा (पश्चिम बंगाल)
- फॅट कर लागू करणारे पहिले राज्य – केरळ (14.5%)
- खाणींचा ई-लिलाव करणारे पहिले राज्य – राजस्थान
- आनंदी विभाग सुरू करणारे पहिले राज्य – मध्य प्रदेश
- जीएसटी पारित करणारे पहिले राज्य – आसाम
- अन्न सुरक्षा कायदा पारित करणारे पहिले राज्य – छत्तीसगड
- शेतीसाठी अर्थसंकल्प राबविणारे पहिले राज्य – कर्नाटक
- तृतीय पंथीयांसाठी धोरण जाहीर करणारे पहिले राज्य – केरळ
- तृतीय पंथीयांना पेन्शन सुविधा देणारे पहिले राज्य – ओडिशा
- सौर ऊर्जेवर चालणारे पहिले विमानतळ – कोची
- सौर ऊर्जेवर चालणारे न्यायालय – कुंटी (झारखंड)
- ई-सिगरेटवर बंदी घालणारे पहिले राज्य – पंजाब
- प्लॅस्टिक पिशव्यांवर बंदी घालणारे पहिले राज्य- हिमाचल प्रदेश
- थर्मोकोलच्या ताटांवर बंदी घालणारे पहिले राज्य – झारखंड
- पहिले पोलिओमुक्त राज्य – केरळ
- पहिले मोफत एयायफाय शहर – कोलकाता
- पहिले सेंद्रिय शेती करणारे राज्य – सिक्किम
- श्लोक बेटी गार्डन (फक्त मुलींसाठीचे पहिले गार्डन) – उदयपूर (राजस्थान)
- पहिले त्सुनामी केंद्र – हैदराबाद
- पहिले ई-न्यायालय – हैदराबाद उच्च न्यायालयात
- एलएनजी इंधंनावरील पहिली बस – केरळ
- पहिला बँकिंग रोबो – लक्ष्मी (सिटी युनियन बँक)
- विमुद्रिकरण ठराव पारित करणारे पहिले राज्य – छत्तीसगड
- पहिली पेमेंट बँक – एरटेल पेमेंट बँक (राजस्थान)
- पहिले हरित शहर – आगरताळा (त्रिपुरा) (दुसरे – नागपूर)
- रॅगिंग विरोधात कायदा करणारे पहिले राज्य – तमिळनाडू
- सेवा हमी कायदा लागू करणारे पहिले राज्य – मध्य प्रदेश
- पहिले हगणदारी मुक्त राज्य – सिक्किम
- निर्मल भारत अभियानांतर्गत 100% स्वच्छता झालेले राज्य – सिक्किम
- सर्वाधिक पोलिस असणारे राज्य – तमिळनाडू