शिक्षक अभियोग्यता परीक्षेची अल्पावधीतच परिपूर्ण तयारी करण्यासाठी D.Ed., B.Ed., M.Ed. विद्यार्थ्यांनी पुढील लेख संपूर्ण वाचावा.
शिक्षक अभियोग्यता परीक्षेचे अर्ज 2 नोव्हेंबर 2017 पासून भरण्यास सुरवात झाली असून ते 22 नोव्हेंबर 2017 पर्यंत भरता येतील. परीक्षा 12 डिसेंबर पासून सुरु होणार आहे. साधारणपणे 40 दिवस विद्यार्थ्यांना परीक्षेच्या अभ्यासासाठी हातात आहेत.
शिक्षक अभियोग्यता परीक्षा इतर स्पर्धा परिक्षांपेक्षा वेगळी आहे. राज्यसेवा परिक्षेतही मागील काळात CSAT पेपर समाविष्ट करण्यात आला तेव्हा या परिक्षेतही अधिकाऱ्यांची अभियोग्यता/कल पाहण्यासाठी आकलन व उपयोजनावर आधारित प्रश्न विचारल्याचेे आपण पहिले आहे. आता या शिक्षकांसाठीच्या परिक्षेचे नाव”अभियोग्यता”असल्याने परीक्षा देणाऱ्या शिक्षकांची एक चांगला शिक्षक म्हणून ज्ञानाचे असणारे आकलन, उपयोजन करण्याची क्षमता, अध्यापन कौशल्य, विविध परिस्थितीत ज्ञानाचा प्रभावीरित्या वापर करण्याची क्षमता यामधून पडताळली जाणार आहे.
अभियोग्यता परीक्षेत 200 प्रश्नासाठी 2 तास म्हणजेच 120 मिनिटे सोडविण्यासाठीे आहेत. परीक्षेला निगेटिव्ह मार्किंग नाही. साधारणपणे प्रत्येक प्रश्न सोडविण्यासाठी छत्तीस सेकंद मिळणार आहेत.
परीक्षेचे दोनशे प्रश्न सोडवण्यासाठी गणित व बुद्धिमापन चाचणीचा सराव आणि शिक्षक बनण्यासाठीचा चांगला दृष्टीकोन आवश्यक आहे.
विशिष्ट क्षेत्रात कृती करण्याची किंवा कृती करण्यासाठी आवश्यक शिक्षण घेण्याची क्षमता दर्शविणाऱ्या गुणास “अभियोग्यता”असे म्हणतात.
शिक्षक विषयक अभियोग्यतेत शिक्षक प्रशिक्षण, शिक्षक होण्यासाठी आवश्यक कल व आवड, व्यक्तिमत्व गुण , समायोजन, विविध परिस्थितीत विद्यार्थी केंद्री अध्यापन करण्याच्या गुणांचा समावेश होतो.
गणितीय क्षमतेत मूलभूत गणितीय कौशल्य योग्यपणे वापरता येतात किंवा नाही याचा पडताळा घेतला जाणार आहे यामध्ये बेरीज, वजाबाकी, गुणाकार ,भागाकार , संख्या, सरासरी, अपूर्णांक, लसावि मसावि, सरळ व्याज, चक्रवाढव्याज, शेअर,रास, वयवारी इत्यादी प्रश्न विचारले जातील.
गणित ही वेगाने अचूकरित्या सोडवता येण्यासाठी सराव आणि सराव हाच एक उपाय आहे.या घटकांवर जेवढे अधिक प्रभुत्व तेवढे परीक्षेत यशाची शक्यता अधिक आहे.
एखादी वस्तू कल्पनेने डोळ्यासमोर फिरवून तिची रचना कशा प्रकारे असेल हे जाणण्याची क्षमता अवकाशीय क्षमतेत समाविष्ट होते
या घटकांतर्गत घन, आकृतीची रचना, आकृत्याचे प्रकार, आकृतीचे विविध भाग परस्परांशी जोडणे , आकृतीची पाण्यातील प्रतिमा, आकृतीची आरशातील प्रतिमा,कागद मुडपून त्याचे इतर भाग ओळखणे इत्यादी प्रश्न या घटकांतर्गत विचारले जात.
या घटकांतर्गत शिक्षक म्हणून तुम्ही विद्यार्थ्यांशी कसे वागाल, विविध प्रसंगात तुमची काय प्रतिक्रिया असेल या बाबी तपासल्या जातील . या घटकाची तयारी करण्यासाठी विविध प्रसंगात तुम्ही कसे वागाल यावरील भरपूर प्रश्न सोडविणे आवश्यक आहे. यासाठी तुम्हाला के सागर पब्लिकेशन्सचे स्वतंत्र पुस्तक अतिशय उपयुक्त सिद्ध होईल.
या घटकात आकलन, समसंबंध, वर्गीकरण, क्रमश्रेणी, तर्क व अनुमान, कूटप्रश्न,सांकेतिक भाषा, लयबद्ध मांडणी यावर प्रश्न विचारले जाणार आहेत. प्रस्तुत प्रश्न सोडवताना वर्णमाला अक्षर क्रमांक पाठ करणे, वर्ग , घन पाठ करणे, अचूक दिशा लक्षात ठेवणे, वयाचे प्रश्न सोडवताना व्यस्त मांडणी करणे इत्यादी बाबी महत्वाच्या आहेत.
अतिशय महत्वाची बाब म्हणजे अभ्यासक्रम घटक देताना शेवटी “इत्यादी” असे दिल्यामुळे यासारखे आणखी काही घटक विचारले जाऊ शकतात हे विद्यार्थ्यांनी लक्षात घेणे गरजेचे आहे.
परीक्षेच्या संपूर्ण तयारीसाठी अत्यावश्यक संदर्भ
अभ्यासक्रमाची संपूर्ण व्याप्ती, परीक्षेतील काठिण्य पातळीचा दर्जा समजून घेण्यासाठी पुढील संदर्भ अतिशय उपयुक्त ठरतात.
2. मनापासून व समजून घेऊन अभ्यास करा.
3.गणित व बुद्धिमापन प्रश्न भरपूर वहीत सोडवा, वेळेत उत्तर येण्यासाठी भरपूर सराव करा.
4.वेळेचा अधिकाधिक सदुपयोग करा, व्यत्यय आणणाऱ्या बाबी टाळा, एकांतात अभ्यासात रहा.
5.एकाग्रतेने अभ्यास करा, त्यामुळे कमी वेळेत गुणवत्तापूर्ण अभ्यास होईल.
6.परीक्षेत मी अधिकाधीक चांगल्याप्रकारे प्रश्न योग्यरीत्या सोडविल, मला अधिकाधिक चांगले गुण मिळतील अशी मानसिकता ठेवा.