उठावाचे क्षेत्र मर्यादित :
१८५७ चा उठाव सर्व हिंदुस्थानात एकाच वेळी झाला नाही दिल्ली औंध, बिहार, मध्य प्रदेश, बुंदेलखंड इ. प्रदेशात या बंडाचा फैलाव झाला. नर्मदेच्या दक्षिणेकडे मोठया प्रमाणात उठाव झाला नाही. त्यामूळे इंग्रजांनी आपली शक्ती उत्तरेस एकवटून उठाव दडपून टाकाला.
योग्य नेतृत्वाचा अभाव :
उठावाला सर्वसामान्य नेता मिळू शकला असता तर उठाव यशस्वी होऊ शकला असता. इंग्रजांकडील सेनापती हे अत्यंत दक्ष व अनूभवी होते. उठाववाल्यांचे नेते त्यांची बरोबरी करु शकले नाहीत. नानासाहेब, तात्या टोपे, झाशीची राणी, कुंवरसिंह यांनी शिपायांचे नेतृत्व स्वीकारले परस्परांना सहकार्यही केले. यामधून सर्वमान्य नेतृत्व तयार होऊ शकले नाही. क्रांतीला योग्य दिशा देण्याची कामगिरी पार पाडणारा नेता पुढे येऊ शकला नाही.
एकाच ध्येयाचा अभाव :
१८५७ चा उठाव उच्च राष्ट्रीय ध्येयाने प्रेरित होऊन झालेला नव्हता उठाववाल्यांच्यात समान ध्येयाचा अभाव होता. हिंदी सैनिकांना ब्रिटिशांवरती सूड उगवायचा होता. बादशहा बहादूरशहहा यास आपली बादशाही पुन्हा निर्माण करावयाची होती. तर नानासाहेब पेशव्यांस आपली पेशवाई पुन्हा मिळवायची होती. झाशीची राणी मेरी झांशी मै नही दूंगी अशी गर्जना करुन रणमैदानात उतरली होती. सर्व नेत्यांमध्ये एकाच ध्येयाचा अभाव असल्यामुळे उठाव यशस्वी होऊ शकला नाही.
नियोजनाचा अभाव :
ब्रिटिशांच्या विरूध्द उठाव करण्याबाबत कोणत्या ठिकाणी कोणी उठाव कराव तसेच उठाव यशस्वी झाल्यानंतर पुढची वाटचाल कशी असावी, याबाबत नियोजनबध्द तयारी नव्हती इतिहासकारांच्या मतानुसार ३१ मे १८५७ ही उठावाची नियोजित तारीख होती. परंतु तत्पुर्वीच मिरतमधील सैनिकांनी व त्यापाठोपाठ इतर ठिकाणच्या सैनिकांनी उठाव केले. एकाच वेळी नियोजनबध्द उठाव न झाल्याने इंग्रजांनी उठाव दडपून टाकला.
जनतेच्या पाठिंब्याचा अभाव :
१८५७ च्या उठावात सामान्य जनता सहभागी झाली होती. परंतु ज्या प्रमाणात सामान्य माणसांचा पाठिंबा उठावास मिळावयास हवा होता. त्या प्रमाणात तो मिळाला नाही. दक्षिणेकडे सामान्य जनतेबरोबर सरंजामदार ही तटस्थ राहिले उठाववाल्यांनी प्रदेश आपल्या ताब्यात आल्यानंतर लुटालुट सुरू केली यामुळे सामान्य जनतेची त्यांना सहानुभुती मिळाली नाही.
स्वार्थी व फुटीर लोकांची इंग्रजांना मदत :
फोडा आणि झोडा ही ब्रिटिशांची राजकीय नीती होती. या धोरणाचा अवलंब ब्रिटिशांनी क्रांतीकारकांच्या हालचाली त्यांचे डावपेच सैन्य याबबतची माहिती पुरविणार्यांना बक्षिसे जहागीर, देण्याचे धोरण स्वीकारले. दुर्दैवाने स्वार्थापोटी क्रांतीकारकांची माहिती पुरविणारे देशद्रोही तयार झाले. फितुरीमुळे तात्या टोपेसारखे रणधूरंधुर सेनानी ब्रिटिशांच्या हाती लागले.
लष्करी साहित्यातील तफावत :
लष्करी साहित्यांच्या बाबतीत इंग्रज वरचढ होते. त्यांच्याकडे बंदुका, तोफा व इतर आधुनिक पध्दतीची शस्त्रास्त्रे होती. तर बंडवाल्यांकडे पारंपारिक शस्त्रास्त्रे होती. शस्त्रास्त्रामधील या तफावतीमुळे सर हयु रोज केवळ २ हजार सैन्यानिशी लढून तात्या टोपे यांच्या २० हजार फौजेचा त्याने पराभव केला लखनौममधील ब्रिटिश रेसिडेन्सीमधील अडकलेल्या २ हजार इंग्रजांनी १ लक्ष बंडवाल्यांच्या अपयशास कारणीभूत ठरली. १८५७ च्या उठावामधून पळून आलेला एक सैनिक म्हणतो. मला गोर्या इंग्रजांनी भीती वाटत नाही पण, त्यांच्या हाती असणार्या दोन नळीच्या बंदुकीची भीती वाटते.
१८५७ च्या उठावाच्या अपयशाची कारणे कोणती? |
दळणवळणाच्या साधनातील प्रगती :
र्लॉड डलहौसीने दळणवळणामध्ये अभूतपूर्व क्रांती केली. रेल्वे तारायंत्र पोस्ट, रस्ते, यांच्या सोयी उपलब्ध केल्या १८५७ चा उठाव दडपून टाकण्यासाठी या साधनांचा उपयोग झाला तारायंत्राच्या द्वारे ठिकठिकाणच्या बंडाची बातमी त्यांना मिळू शकली तर रेल्वेच्याद्वारे उठावाच्या ठिकाणी लष्कारी कुमक पाठविणे ब्रिटिशांना शक्य झाले.
अनुभवी ब्रिटिश सेनापती :
उठावाचे नेतृत्व करणारे नानासाहेब तात्या साहेब टोपे बहादूर शहा, झाशीची राणी, हे पराक्रमी साहसी होते. परंतु रणनीतीत ते मागे पडले. याउलट इंग्रजांकडे असणारे सेनानी हॅव, लॉक, कॅम्बेल, नील, लॅरेन्स, हयू, रोज, हे अत्यंत पराक्रमी अनुभवी व मुत्सदी होते. त्यांच्या लष्करी हालचाली अत्यंत जलद व नियोजनबध्द होत्या त्यामुळे त्यांचा विजय झाला.
इंग्लडची मदत :
१८५७ चा उठाव दडपून टाकण्यासाठी गव्हर्नर जनरल र्लॉड कॅनिनंने इंग्लंडमधून १ लक्ष १२ हजाराची फौज आणली आंतरराष्ट्रीय परिस्थिती ब्रिटिशांना अनुकुल होती. ब्रिटिश साम्राज्यात यावेळी शांतता होती त्यामुळे १८५७ च्या उठावाकडे बारकाईने लक्ष देऊन हा उठाव दडपून टाकता आला.